आज स्व. गोपीनाथ मुंडे यांची जयंती
गोपीनाथ मुंडे यांचा ३ जून २०१४ ला अपघातात मृत्यू झाला. आज महाराष्ट्रासह देशभरातील मुंडे यांचे कार्यकर्ते आपल्या लोनेत्याला श्रद्धांजली वाहतात.
मेहुल चोक्सीला भारताकडे सुपूर्द करायचे की नाही ? याबाबतचा निर्णय आज होण्याची शक्यता आहे.
पंजाब नॅशनल बँकेत १३ हजार ५०० कोटींचा घोटाळा करून फरार झालेल्या मेहुल चोक्सिविरोधात डोमिनिका कोर्टात सुनावणी सुरू आहे
आज आंतरराष्ट्रीय सायकल दिवस
दरवर्षी 3 जून रोजी आंतरराष्ट्रीय सायकल दिवस साजरा करण्यात येतो. हा दिवस सायकलची वैशिष्ट्ये आणि उपयुक्तता ओळखण्यासाठी तसंच त्याचा प्रसार करण्यासाठी साजरा केला जातो.
आरएसएस च्या दहा वरिष्ठ नेत्यांची ३ जून ते ५ जून पर्यंत
दिल्लीत बैठक
या तीन दिवसांच्या बैठकीला सरसंघचालकांसह दहा वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत राजकीय चर्चा होण्याची शक्यता आहे.
आज परदेशी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे होणार लसीकरण
कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात परदेशात शिक्षण घेण्यासाठी प्रवेश निश्चित झालेल्या 18 ते 44 वयोगटातील विद्यार्थ्यांना कोविशील्ड लस दिली जाणार आहे. आज (2 जून) आणि उद्या (3 जून) असे दोन दिवस कल्याण पश्चिमेकडील आर्ट गॅलरी इथे सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हे लसीकरण सुरु राहणार आहे. 20 फॉर्म अथवा DS 160 फॉर्म किंवा प्रवेश निश्चित झाल्याचे परदेशी विद्यापीठाचे/शिक्षण संस्थेचे पत्र या दोन्हीपैकी एक यासह आवश्यक कागदपत्रे जवळ बाळगण्याचे आवाहन पालिकेने केलं आहे.