तौक्ते चक्रीवादळ गुजरातमध्ये दाखल आज गुजरातमध्ये जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता -
महाराष्ट्रानंतर आता तौक्ते चक्रीवादळ गुजरातमध्ये धडकलं आहे. गुजरातमधील बहुतांश भागाला या चक्रीवादळाचा फटका बसला आहे. शिवाय आज या वादळामुळे पावसाचीही शक्यता वर्तविण्यात आली आहे.

तौक्ते चक्रीवादळ नुकसानीबाबत आज राज्य मंत्री मंडळाच्या बैठकीची शक्यता -
तौक्ते चक्रीवादळाचा महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांना जोरदार फटका बसला आहे. याच नुकसानीबाबत आज मंत्री मंडळाची बैठक होण्याची शक्यता आहे.

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी साधणार विविध राज्य व जिल्ह्यातील फिल्ड अधिकाऱ्यांशी संवाद-
भारतातील बहुतांश जिल्ह्यामध्ये कोरोना स्थितीच्या नियंत्रणासाठी स्थानीक अधिकारी मोठी कसरत करतांना दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज विविध राज्यातील, जिल्ह्यातील फिल्ड अधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहे.

सांगलीत आजपासून पुढील सात दिवस राहणार कडक लॉकडाऊन -
सांगली शहरासह जिल्ह्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आजपासून पुढील सात दिवस कडक लॉकडाऊन राहणार आहे. यात अत्यावश्यक सेवांना परवानगी देण्यात आली आहे.

मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिचा आज वाढदिवस-
मराठी सिनेसृष्टीत मराठमोळी अभिनेत्री आणि महाराष्ट्रातील घराघरात 'अप्सरा' म्हणून परिचीत असलेल्या सोनाली कुलकर्णीचा आज वाढदिवस. 'नटरंग, मितवा, पोश्टर गर्ल' यासह विविध मराठी चित्रपट सोनाली कुलकर्णी यांनी गाजविले आहे.
