नागपूर - अमरावती-नागपूर रोडवरील बाजारगाव जवळ झालेल्या अपघातात चार ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. रस्त्यावर असलेला खड्डा चुकविण्याच्या नादात अनियंत्रित कार दुभाजकावर धडकली. त्यानंतर कारने सर्व्हिस रोडवर बसची प्रतीक्षा करीत उभ्या असलेल्या पाच प्रवाशांना जबरी धडक दिली. यात गंभीर जखमी झालेल्या पाच जणांपैकी चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये सख्ख्या भाऊ-बहिणीसह एका मुलाचा समावेश आहे.
BIG BREAKING :क्रूझ ड्रग्स पार्टी प्रकरणात तिघांना एक दिवसाची एनसीबी कोठडी, आर्यन खानची आजची रात्र कोठडीत - maharastra breaking news
22:53 October 03
खड्डा चुकविण्याच्या नादात भीषण अपघात; सख्ख्या बहीण-भावासह चार ठार, एक गंभीर
19:31 October 03
उद्यापासून शाळा होणार सुरु! मुख्यमंत्री शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांशी साधणार संवाद
मुंबई - उद्यापासून राज्यातील शाळा सुरू होणार आहेत. या निमित्ताने सोमवारी दुपारी 12 नंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे 'माझे विद्यार्थी माझी जबाबदारी' या कार्यक्रमांतर्गत सर्व शाळा, शिक्षक, मुख्याध्यापक यांच्याशी ऑनलाइन संवाद साधणार आहेत. विद्यार्थ्यांना सुद्धा हा कार्यक्रम दखविण्यात यावा अशा सूचना करण्यात आल्या आहेत.
16:15 October 03
क्रूझ रेव्ह पार्टी : आर्यन खानसह चौघांना वैद्यकीय तपासणीसाठी जे.जे. रुग्णालयात नेले
मुंबई - क्रूझवरील रेव्ह पार्टी प्रकरणी ताब्यात घेतलेल्यांपैकी ४ जणांना मेडिकल टेस्टसाठी जे जे रुग्णालयात नेण्यात आले आहे. एनसीबी ऑफिसर समीर वानखेडे स्वतः या प्रकरणाचा तपास करत आहेत. मेडिकल तपासणीनंतर त्यांना किला कोर्टात हजर करण्यात येणार आहे. आता चार जणांना तपासणीसाठी घेऊन गेले असून यामध्ये शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचा समावेश आहे.
16:11 October 03
दांडिया गरबाचे आयोजन केल्याने आयोजक व बँक्वेट हॉल मालकावर गुन्हा दाखल
मुंबई - जेसीसी बँक्वेट हॉल येथे प्रशासनाची कोणतीही परवानगी न घेता सुमारे साडेतीनशे ते चारशे लोकांचा जनसमुदाय जमवून दांडिया गरबाचे आयोजन करून covid-१९ च्या नियमांचे उल्लंघन केल्याने आयोजक व बँक्वेट हॉल मालक यांच्यावर सदर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाईंदर पोलीस स्टेशन भाग ५ गुन्हा रजिस्टर नंबर ४०१/२०२१ भादंवि कलम २६७, २७० सह कलम (३७ (१) (३)उल्लंघन म्हणून कलम १३५ महाराष्ट्र पोलीस अधिनियमनुसार गुन्हा दाखल झाला आहे.
15:08 October 03
क्रूजवरील रेव्ह पार्टी प्रकरणी एनसीबीकडून दिल्लीचा एक डीसीपीही ताब्यात
मुंबई - क्रूजवरील रेव्ह पार्टी प्रकरणी दिल्लीच्या एका डीसीपीलाही एनसीबीने ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे. सबंधित डीसीपी गुरुग्रामचा असल्याचेही समजते. एनसीबीने ताब्यात घेतलेल्या सर्वांची जे.जे. रुग्णालयात आरोग्य चाचणी करण्यात येणार आहे. त्यानंतर सर्वांना किल्ला कोर्टात हजर केले जाणार आहे. कोर्ट यावर काय ॲक्शन घेणार हे पहावे लागणार आहे.
15:04 October 03
रेव्ह पार्टीवर एनसीबीने मारलेल्या छाप्यावर अभिनेता सुनील शेट्टी यांची प्रतिक्रिया..
मुंबई - जेव्हा एखाद्या ठिकाणी छापा टाकला जातो तेव्हा अनेक लोकांना ताब्यात घेतले जाते. आम्ही असे गृहीत धरतो की एखाद्या विशिष्ट मुलाने ते (ड्रग्ज) सेवन केले असावे. पण या प्रकरणाचा तपास सुरू आहे. तपास यंत्रणेचा अहवाल बाहेर येऊ द्या, मग एखाद्या मुलावर आरोप करा अशी प्रतिक्रिया अभिनेता सुनील शेट्टी यांनी रेव्ह पार्टीवर एनसीबीने मारलेल्या छाप्यावर व्यक्त केली.
15:01 October 03
क्रुझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणी आर्यन खानसह उद्योगपतींच्या दोन मुलीही ताब्यात
मुंबई - एनसीबीने ताब्यात घेतलेल्यांमध्ये दोन महिलांचाही समावेश आहे. आर्यन खानसह ताब्यात घेतलेल्या इतरांची नावंही समोर आली आहेत. मुनमुन धामेचा, नुपूर सारिका, इस्मीत सिंग, मोहक जसवाल, विक्रांत छोकर, गोमित चोप्रा आणि अरबाज मर्चंट यांचा यात समावेश आहे. एमडीएमए, एक्स्टेसी, कोकेन, एमडी (मेफेड्रोन) आणि चरस यासारखी अंमली पदार्थ शनिवारी संध्याकाळी छाप्यांदरम्यान जप्त करण्यात आली आहे, अशी माहिती एनसीबीचे मुंबईचे संचालक समीर वानखेडे यांनी दिली.
14:42 October 03
ममता बॅनर्जीं यांची मुख्यमंत्रीपदाची खुर्ची राहणार कायम.. भवानीपुरातून 58 हजार मतांनी विजय
मुंबई - मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भवानीपूर मतदारसंघातून भाजपच्या प्रियांका टिबरेवाल यांच्यावर 58 हजार मतांनी विजय मिळवला आहे. या विजयामुळे त्यांची मुख्यमंत्रीपदाची खुर्ची कायम राहिली असून त्यांच्या घरासमोर तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी जल्लोश सुरु केला आहे.
14:04 October 03
ड्रग्स पार्टीनंतर आता बेलापूरमध्ये एनसीबीची धाड
ड्रग्स पार्टीतून ताब्यात घेण्यात आलेल्यांच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीच्या आधारे एनसीबी आता नवी मुंबईतील बेलापूरमध्ये धाड टाकत असल्याची माहिती समोर येत आहे.
13:02 October 03
- मुंबई - क्रूझ पार्टी केसमध्ये आठ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पुढील छापे टाकले जातील, अशी माहिती एनसीबीचे प्रमुख एसएन प्रधान यांनी दिली.
10:13 October 03
क्रुझवरील ड्रग्स पार्टी : एनसीबीचे आयोजकांना समन्स
समुद्रातील क्रुझवरील ड्रग्स पार्टी प्रकरणी एनसीबीने पार्टी आयोजकांना समन्स बजावले आहे. या सर्वांना एनसीबीसमोर सकाळी 11.30 ला हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले आहे. या कारवाईत एकूण 13 जण ताब्यात घेतले असून यात तीन महिलांचा समावेश आहे. या तिन्ही महिला दिल्लीच्या रहिवासी आहेत आणि व्यवसायिक व्यक्तींची मुलगी असल्याचे सांगितले जात आहे. ताब्यात घेतलेल्या बॉलिवूड अभिनेत्याच्या मुलाचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, सूत्रांच्या माहितीनुसार ही पार्टी 6 लोकांनी आयोजित केल्याचे समजते आहे.
06:14 October 03
big breaking : हाय प्रोफाईल ड्रग्स पार्टीनंतर आता बेलापूरमध्ये एनसीबीची धाड
मुंबई - मागील काही दिवसांपासून राज्यात पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे आज पहाटे अमरावती, येवला (नाशिक), नांदेडसह राज्यातील अनेक भागात सकाळी मोठ्या प्रमाणावर धुक्याची चादर पसरलेली पाहायला मिळाली. मात्र, या धुक्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. आधी कोरोना, नंतर पाऊस आणि गारपीठ आणि आतात धुक्यामुळे पिकांचे नुकसान होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.