नवी दिल्ली - आज संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा 15 वा दिवस आहे. परंतु आतापर्यंत सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांच्यातील चर्चेवर एकमत होत नाही. विरोधकांना पेगासस हेरगिरीच्या मुद्द्यावर चर्चा सुरू करायची आहे. तर सरकार या मुद्द्यापासून दूर जात असल्याचे दिसत आहे. हेच कारण आहे, की विरोधक दररोज दोन्ही सभागृहात खूप गोंधळ घालत आहेत. यामुळे अनेकदा दोन्ही सभागृहाची कार्यवाही स्थगित करावी लागली आहे. विरोधी पक्षांनी एकत्र येत सरकारविरोधात मोर्चा उघडला आहे.
गेल्या 19 जुलै रोजी संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सरुवात झाली आहे. अधिवेशन सुरू झाल्यापासून पेगासस हेरगिरी, कोरोना आणि कृषी कायद्यावरुन संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधक प्रचंड गदारोळ घालत आहेत. केंद्र सरकारने संसदेच्या दोन्ही सभागृहात महत्त्वपूर्ण कायदे पारित केले आहेत. विधेयक पारित होत आहेत. मात्र, चर्चा होत नसल्याने विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. संसदेचे सत्र 13 ऑगस्टपर्यंत चालणार आहे.
हेही वाचा - संसदेत महाराष्ट्र : जाणुन घ्या राज्यातील खासदार संसदेत काय बोलले?
हेही वाचा - सभागृहात गोंधळ घातल्याने तृणमूलच्या सहा खासदारांचे एका दिवसासाठी निलंबन