World Smile Day 2022 : असे म्हटले जाते की, आपल्या हसण्याने दुसऱ्याचाही दिवस छान जाऊ शकतो, दुःखी लोकांना आनंद मिळू शकतो, घाबरलेल्यांना सांत्वन मिळू शकते आणि कधीकधी हृदयाला शांती देखील मिळू शकते. पण, हसण्याचे फायदे इथेच संपत नाहीत, तर त्याचे आरोग्यासाठी इतरही अनेक फायदे (just smile and keep healthy mentally and physically yourself) आहेत. आज 'जागतिक हास्य दिवस' (Today is world smile day) दरवर्षीच हा दिवस 7 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. मनमा येथे या दिवसाची सुरुवात 1963 मध्ये झाली, जेव्हा ग्राफिक आर्टिस्टने ग्राहकांसाठी काम करताना हा दिवस साजरा करण्यास सुरुवात केली.
हसण्याचे काय फायदे आहेत जाणुन घेऊया -
1. ताण कमी करणे : अनेक अभ्यासातून असे दिसून आले आहे की, हसल्याने तणाव कमी होण्यास मदत होते. जेव्हा तुम्ही तणावात असता तेव्हा हसण्याचा प्रयत्न करा. हसणे खरे असो वा खोटे, तणाव कमी करता येतो.
2. वय वाढते : एका अभ्यासात असे दिसून आले आहे की, जे लोक प्रत्येक क्षण आनंदी आणि हसत असतात त्यांचे आयुष्य जास्त असते. तसेच आरोग्य चांगले ठेवण्यासाठी ते चांगले आहे.
3. चांगला मूड : मूड सेट करण्यासाठी हसण्याचा प्रयत्न करा. हसणे म्हणजे तुम्ही आनंदी राहण्याचा प्रयत्न करत आहात. हा प्रयत्न देखील तुमचा मूड ठीक करू शकतो. तुम्ही याला मूड ठीक करण्याची युक्ती देखील म्हणू शकता.
4. रोगप्रतिकारक शक्ती चांगली असते : तुम्ही कधी विचार केला आहे की, हसण्याचा संबंध प्रतिकारशक्तीशी असू शकतो? खरे तर हसल्याने शरीराचे कार्य योग्य प्रकारे होण्यास मदत होते. त्याचा प्रतिकारशक्तीवरही चांगला परिणाम होतो.
5. रक्तदाब कमी होऊ शकतो : तणावामुळे रक्तदाब वाढू शकतो. त्याच वेळी, हसण्याचा प्रभाव रक्तदाब कमी करण्यावर दिसून येतो. थोडावेळ शांत बसा, काहीतरी वाचा किंवा गाणे ऐका आणि हसा. असे रोज केल्याने तुम्ही शांत राहता आणि तुमचे आरोग्य चांगले राहते.
6. सकारात्मक राहण्यास मदत करा : तुम्ही सकारात्मक राहिल्यास तुमचे आरोग्य आंतरिकरित्या निरोगी राहते. यामुळे शरीराला नि:संशय अनेक फायदे मिळतात. म्हणून जेव्हा जेव्हा तुम्हाला वाईट वाटेल किंवा नकारात्मक वाटत असेल तेव्हा हसत रहा.
7. वेदनांना मिळतो आराम : हसल्याने शरीरात एंडोर्फिन आणि सेरोटोनिन हार्मोन्स बाहेर पडतात. हे हार्मोन्स नैसर्गिक वेदनाशामक म्हणूनही काम करतात. हसल्याने तुमचा मूड सुधारतो आणि वेदनाही कमी होतात. आपण हे नैसर्गिक औषध म्हणून देखील विचारात घेऊ शकता.
चला तर मग आपला दिवस दररोज हसुन कसा आऩंदी घालवता येईल, त्यासाठी प्रयत्नरत राहु या.