ETV Bharat / bharat

Today Horoscope : 'या' राशीच्या व्यक्तींचे नवे संबंध तयार होतील ; वाचा राशीभविष्य - जीवनाशी निगडित प्रत्येक गोष्ट

कोणत्या राशीचे दैनंदिन जीवन चांगले राहील हे आपण ईटीव्ही भारतवरील या राशी भविष्यात आपण जाणून घेणार आहोत. सर्व 12 राशींचा दिवस कामाच्या ठिकाणी कसा जाईल. जोडीदाराची साथ कोणाला मिळेल कशी मिळेल. तुमची कुंडली चंद्र राशीवर आधारित आहे. चला तुमच्या जीवनाशी निगडित प्रत्येक गोष्ट 25 ऑक्टोबर 2023च्या दैनिक कुंडलीत राशी भविष्य कसे असेल ते जाणून घेऊ.

Today Horoscope
राशीभविष्य
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 25, 2023, 1:32 AM IST

मेष : आज चंद्र 25 ऑक्टोबर 2023 बुधवारी कुंभ राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र लाभ स्थानी असेल. आजचा दिवस समाजकार्य व मित्रांसोबत धावपळीत जाईल. त्यांच्यासाठी खर्च करावा लागेल. सरकारी कामात मात्र यश मिळेल. वडीलधारी व आदरणीय व्यक्तींचा सहवास लाभेल. दूरवर राहणार्‍या संततीकडून आनंददायी बातम्या मिळतील. पर्यटनाला जाण्याची शक्यता आहे. अविवाहितांचे विवाह ठरतील.

वृषभ : आज चंद्र 25 ऑक्टोबर 2023 बुधवारी कुंभ राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र दशम स्थानी असेल. आज आपण नवे काम सुरू करू शकाल. नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे. नोकरीत पदोन्नती व पगार वाढीची बातमी मिळेल. सरकार कडून लाभ मिळेल. सांसारिक जीवनात सुख - शांती मिळेल. वरिष्ठ अधिकार्‍यांकडून प्रोत्साहन मिळाल्याने आपला उत्साह वाढेल. अपूर्ण कामे तडीस जातील. दांपत्य जीवनात गोडी वाटेल. सरकार कडून लाभ मिळतील.

मिथुन : आज चंद्र 25 ऑक्टोबर 2023 बुधवारी कुंभ राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र भाग्य स्थानी असेल. आजचा दिवस प्रतिकूलतेचा असल्याने आपल्या कामास विलंब होईल. शरीरात स्फूर्ती व मनात उत्साह असणार नाही. पोटाचे विकार सतावतील. नोकरीत वरिष्ठांची नाराजी ओढवून घ्यावी लागेल. राजकीय अडचणी व्यत्यय आणतील. महत्वाचे काम किंवा निर्णय आज स्थगित ठेवणे हिताचे राहील. संततीशी मतभेद होतील. प्रतिस्पर्धी व विरोधक ह्यांचा त्रास होईल.

कर्क : आज चंद्र 25 ऑक्टोबर 2023 बुधवारी कुंभ राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र अष्टम स्थानी असेल. आज आपल्या मनातील नकारात्मकता नैराश्य निर्माण करेल. बाहेरील पदार्थांच्या खाण्या पिण्यामुळे आरोग्य बिघडेल. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. कुटुंबियांशी भांडण होईल. नवे संबंध त्रासदायक ठरतील. आर्थिक चणचण भासेल. एखादी दुर्घटना किंवा शस्त्रक्रिया संभवते. मनाला शांतात लाभण्यासाठी प्रयत्न करावेत.

सिंह : आज चंद्र 25 ऑक्टोबर 2023 बुधवारी कुंभ राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र सातव्या स्थानी असेल. आज पती - पत्नीत किरकोळ कारणांनी खटका उडून मतभेद होतील. जोडीदाराच्या प्रकृतीची चिंता राहील. प्रापंचिक गोष्टींबाबत उदासीन राहाल. सार्वजनिक जीवनात अपयश किंवा मानभंग होण्याची शक्यता आहे. भागीदारांशी मतभेद होतील. भिन्नलिंगी व्यक्तीचा सहवास त्रासदायक ठरेल. कोर्ट - कचेरीतील प्रश्न सुटायला विलंब होईल.

कन्या : आज चंद्र 25 ऑक्टोबर 2023 बुधवारी कुंभ राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र सहाव्या स्थानी असेल. आज आपणास शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम लाभेल. कुटुंबातील शांती - सुखाचे वातावरण मनाला प्रसन्ना देईल. आर्थिक लाभ व कामात यश मिळेल. आजारातून मुक्त व्हाल. नोकरीत फायदा होईल. आपल्या हाता खालचे कर्मचारी व सहकारी यांचे सहकार्य मिळेल. प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल.

तूळ : आज चंद्र 25 ऑक्टोबर 2023 बुधवारी कुंभ राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र पाचव्या स्थानी असेल. आज कल्पनाशक्ती व सृजनशक्ती यांचा चांगला उपयोग आपण कराल. संततीची प्रगती होईल. प्रिय व्यक्तीचा सहवास आनंददायी ठरेल. तन व मन तरतरी व स्फूर्तीचा अनुभव घेईल. विचारांचा अतिरेक मन विचलित करेल. आज एखाद्याशी बौद्धिक चर्चा किंवा वादविवादाची संधी येईल पण त्यात फार खोलात उतरू नका.

वृश्चिक : आज चंद्र 25 ऑक्टोबर 2023 बुधवारी कुंभ राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र चवथ्या स्थानी असेल. आज शारीरिक व मानसिक दृष्टया भीतीचा अनुभव आपण घ्याल. आज कोणती ना कोणती चिंता सतावेलच. कुटुंबीय, नातलग व संबंधित यांच्याशी पटणार नाही. आईची प्रकुती बिघडेल. जमीन, वाहन इत्यादींच्या खरेदीपत्रा बद्दल सावध राहा.

धनू : आज चंद्र 25 ऑक्टोबर 2023 बुधवारी कुंभ राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र तिसऱ्या स्थानी असेल. आज आपल्यावर गूढ व रहस्यमय विद्येचा विशेष प्रभाव राहील. त्याचा अभ्यास व संशोधन यांत गोडी राहील. मन शांत व प्रसन्न राहील. भावंडांशी सुसंवाद साधाल. आज नवे काम सुरू कराल. आप्तेष्ट व मित्रांच्या आगमनामुळे आपणाला आनंद वाटेल. जवळपासच्या प्रवासाची शक्यता आहे. नशिबाची साथ लाभेल.

मकर : आज चंद्र 25 ऑक्टोबर 2023 बुधवारी कुंभ राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र दुसऱ्या स्थानी असेल. आज संयमित बोलणे आपणाला अनेक संकटातून वाचवेल. म्हणून विचारपूर्वक बोला. कुटुंबियांशी गैरसमज झाल्याने मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. शेअर सट्टा यांत पैसे गुंतविण्याचे नियोजन कराल. गृहिणींना मानसिक असंतुष्टता जाणवेल. विद्यार्थ्यांचे अभ्यासात मन लागणार नाही.

कुंभ : आज चंद्र 25 ऑक्टोबर 2023 बुधवारी कुंभ राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आजचा दिवस शारीरिक व मानसिक स्वास्थ्य व उत्साहाचा आहे. आर्थिक दृष्टया लाभदायक दिवस आहे. आप्तेष्ट व मित्र यांच्यासह रुचकर व स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल. एखाद्या पर्यटनाचा बेत ठरवाल. आज आपणाला गूढ शक्तीचा प्रभाव जाणवेल. नकारात्मक विचार दूर ठेवल्याने लाभ होईल.

मीन : आज चंद्र 25 ऑक्टोबर 2023 बुधवारी कुंभ राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र बाराव्या स्थानी असेल. आज आपल्या मनाची एकाग्रता राहिल्यामुळे मानसिक व्यग्रता जाणवेल. मंगल कार्यावर खर्च होईल. स्वकीयांपासून दूर जावे लागेल. कोर्ट - कचेरीच्या कामात किंवा एखाद्याला जामीन राहण्याच्या बाबतीत खूप सावधपणे वागा. वाणीतील असंयम भांडणे निर्माण करील. झटपट लाभ मिळविण्याची लालसा महागात पडेल.

हेही वाचा :

  1. Today Love Horoscope : या राशींच्या व्यक्तींना प्रियजनांच्या भेटीनं मिळेल आनंद ; वाचा लव्हराशी
  2. Today Panchang : सूर्योदय आणि सूर्यास्ताची वेळ, शुभ मुहूर्त, राहुकाल तिथी, वाचा आजचे पंचांग
  3. Today Horoscope : 'या' राशीच्या व्यक्तींना दसऱ्याच्या निमित्तानं भेटतील मित्र व नातलग; वाचा राशीभविष्य

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.