- राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंतपाटील आज बुलडाणा जिल्हा दौऱ्यावर
सकाळी 9 ते 9.45 वाजता बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालय येथे नियोजन समिती सभागृह येथे जिल्हा जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक, सकाळी 9.45 ते 10.30 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा कार्यकारिणी बैठकीस उपस्थिती, सकाळी 11.15 वा बुलडाणा विधानसभा मतदारसंघाची आढावा बैठक, सायंकाळी 5 ते 5.30 वाजता सिंदखेडराजा येथे आगमन व राजमाता जिजाऊ जन्मस्थळास भेट, सायंकाळी 6.30 ते 7.15 वाजता सिंदखेडराजा विधानसभा मतदार संघाची आढावा बैठक
- मेघालयमध्ये सहावी ते बारावीपर्यंतच्या शाळा आजपासून सुरू
कोरोना च्या काळात बंद असलेल्या शाळा सुरु होत आहेत. मेघालय राज्यात आजपासून शाळेची घंटा वाजणार आहे. शहरी व ग्रामीण भागातल्याही सहावी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरु करण्यात येणार आहेत.
- बिहार राजस्थानमध्येही सहावी ते आठवीच्या शाळेची आज वाजणार घंटा
कोरोनाच्या काळात बंद असलेल्या शाळा सुरु होत आहेत. बिहार आणि राजस्थान या दोन राज्यातदेखील आजपासून शाळेची घंटा वाजणार आहे. याचबरोबर ओडिशामध्ये नववी ते अकरावी आणि उत्तराखंडमध्ये सहावी ते नववी आणि अकरावीच्या शाळा सुरू होणार आहेत.
- भारत विरुद्ध इंग्लड कसोटी सामन्याचा आज चौथा दिवस
पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारताची ६ बाद २५७ अशी धाव संख्या आहे. आघाडीची फळी कोसळल्यावर ऋषभ पंत (९१) आणि चेतेश्वर पुजाराने (७३) डावाला स्थैर्य देण्याचा प्रयत्न केला. आता फॉलोऑन टाळण्यासाठी भारताला १२२ धावांची गरज आहे.
- ऑस्टेलियन ओपन मेलबर्नमध्ये आजपासून सुरू होणार आहे
ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेला आज पासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत महिला दुहेरीमध्ये भारताची अंकिता रैना ही रोमानियाच्या मिहेला बुझार्नेकूसह खेळणार असून या दोघींना थेट मुख्य फेरीत प्रवेश देण्यात आला आहे. भारताकडून ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या मुख्य फेरीत खेळणारी अंकिता पाचवी महिला खेळाडू ठरली आहे.
- मद्रास न्यायालयात आजपासून प्रत्यक्ष सुनावणी सुरू
कोरोना काळात न्यायालयीन कामकाज हे व्हिडिओ कॉन्फरर्सिंगच्या माध्यमातून सुरू होते. मात्र, आजपासून प्रत्यक्ष उपस्थितीमध्ये न्यायालयीन कामकाजाला सुरुवात होणार आहे.
- तामिळनाडू, गुजरात राज्यात महाविद्यालये आजपासून सुरू होणार
कोरोनाच्या लॉकडाऊन काळात शाळा महाविद्यालये बंद ठेवण्यात आली होती. तब्बल १० महिन्यानंतर आता तामिळनाडूतील सर्व महाविद्यालये सुरु होणार आहेत. तर गुजरात राज्यात पदवीच्या पहिल्या वर्षाचे वर्ग आज सुरु होणार आहेत.