ETV Bharat / bharat

Breaking News Live : जॉन्सन्स बेबी पावडरच्या उत्पादनाचा परवाना रद्द महाराष्ट्र सरकारकडून रद्द - आजच्या लेटेस्ट न्यूज

breaking news
ब्रेकिंग न्यूज फाईल फोटो
author img

By

Published : Sep 16, 2022, 6:48 AM IST

Updated : Sep 16, 2022, 10:01 PM IST

22:00 September 16

जॉन्सन्स बेबी पावडरच्या उत्पादनाचा परवाना रद्द महाराष्ट्र सरकारकडून रद्द

महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने जॉन्सन्स अँड जॉन्सन्स प्रायव्हेट लिमिटेडच्या जॉन्सन्स बेबी पावडरच्या उत्पादनाचा परवाना रद्द केला आहे. लि., मुलुंड, मुंबई पुणे आणि नाशिक येथे काढलेल्या पावडरचे नमुने सरकारने "नॉट ऑफ स्टँडर्ड क्वालिटी" म्हणून घोषित केले होते.

18:57 September 16

शिवसेना खासदार संजय राऊत विरोधात ईडीकडून आरोपपत्र दाखल

18:00 September 16

...त्यांनी आम्हांला शहाणपण शिकवू नये; वेदांता प्रकल्पावरुन फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल

मुंबई - राज्यात सध्या वेदांता प्रकल्पावरुन जोरदार आरोप प्रत्यारोप सुरु आहे. महाविकास आघाडीकडून शिंदे फडणवीस सरकारवर टीका केली जात आहे. अशातच आज ( शुक्रवारी ) राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार टीका करत प्रतिउत्तर दिलं आहे. वेदांतासाठी ज्यांनी काहीच केलं नाही त्यांनी आम्हाला शहाणपण शकवू नये, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. शिवाय येत्या दोन वर्षात महाराष्ट्राला गुजरातच्या पुढे नेणार असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

17:35 September 16

राष्ट्रवादी पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर; 'या' नेत्यांवर मोठी जबाबदारी

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन दिवशीय अधिवेशनानंतर पक्षाने आता नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली आहे. यात राष्ट्रीय अध्यक्ष पदी शरद पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर उपाध्यक्ष पदी प्रफुल्ल पटेल यांनी वर्णी लागली आहे. तर दुसरीकडे कार्यकारी सदस्य म्हणून सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

17:04 September 16

लंम्पी बाधित गुरांच्या उपचाराचा सर्व खर्च शासन करणार; पशुसंवर्धन मंत्र्यांची माहिती

लंम्पी आजाराने बाधित गुरांच्या उपचाराचा संपूर्ण खर्च महाराष्ट्र सरकार उचलेल आणि सर्व जिल्ह्यांना त्वचारोगाच्या उपचारासाठी आवश्यक औषधांची ड्रग बँक दिली जाईल, अशी माहिती पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे.

16:02 September 16

ठाण्यात मुसळधार पावसामुळे अनेक भागात साचलं पाणी; रेल्वे ट्रॅकही पाण्याखाली

ठाणे - राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये सध्या जोरदार पाऊस सुरु आहे. मुंबईतही अनेक भागात पाणी साचले आहे. अशात ठाण्यातही अनेक सखल भागात पाणी साचले आहे. संततधार सुरुच असल्यामुळे ठाणे रेल्वे स्थानकावरील काही रेल्वे ट्रॅकही पाण्याखाली गेले आहेत.

15:38 September 16

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी घेतली दिवंगत अभिनेते कृष्णम राजू गरू यांच्या कुटुंबीयांची भेट

14:09 September 16

पत्राचाळ आर्थिक घोटाळा प्रकरण

पत्राचाळ आर्थिक घोटाळा प्रकरण

पत्राचाळ आर्थिक घोटाळा प्रकरण

शिवसेना नेते संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर सुनावणी

कोर्टानं ईडीला रिप्लाय देण्यास दिली आहे आजची मुदत

विशेष PMLA कोर्टात झाली सुनावणी

रिप्लाय आजच सादर करणार ईडी, वकील कविता पाटील यांनी कोर्टासमोर केलं स्पष्ट

19 सप्टेंबरला या घोटाळा प्रकरणाची नियमित सुनावणी

19 ला नियमित आणी 23 सप्टेंबरला जामीन अर्जावर सुनावणी घ्यावी असं कोर्टानं नोंदवलं मत

19 सप्टेंबर रोजी जामीन अर्जावरही सुनावणी घेण्याचासंजय राऊत यांच्या वकिलांचा आग्रह

मात्र हा निर्णय 19 लाच होणार

न्यायाधीश एम जी देशपांडे यांनी केलं स्पष्ट

संजय राऊत सध्या आर्थर रोड कारागृहात

19 सप्टेंबर पर्यंत न्यायालयीन कोठडी

12:46 September 16

वडाळ्यात अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन बलात्कार; आरोपीचा शोध सुरु

मुंबई - मुंबईतील वडाळा परिसरातून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. शिवाय नवी मुंबईतील कळंबोली परिसरात नेऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आला. आयपीसीच्या कलम ३७६, ३२३, आणि ५०६ आणि पॉस्कोच्या कलमांखाली आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींचा शोध सुरु आहे.

12:30 September 16

लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याचे रशियात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण

मुंबई - रशिया, मॉस्कोतील रुडमिनो मागरिटा फॉरेन लँग्वेज स्टडी या संस्थेने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारला आहे. या पुतळ्याचे अनावरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे देखील उपस्थित होते. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा हा पुतळा मॉस्कोच्या शासकीय वाचनालयात लावला जाणार आहे.

12:30 September 16

कळवा, मुंब्रा, दिवा अनधिकृत बांधकामाचे हॉटस्पॉट; कारवाई नंतरही बांधकामे सुरूच

ठाणे - महानगरपालिकेवरती प्रशासक नेमला असताना ठाणे महापालिकेच्या हद्दीत अनधिकृत बांधकामांनी हैदोस घातला Large number of illegal construction in Thane आहे. पालिकेचा कार्यकाळ संपल्यामुळे लागू झालेल्या प्रशासकीय राजवटीचा फायदा घेत ठाण्यात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरु असून पालिकेकडून केवळ कारवाईचा फार्स सुरू असल्याचे उघड झाले आहे. ज्या ज्या ठिकाणी अनाधिकृत बांधकामांवर महापालिकेच्यावतीने करावी करण्यात Action on illegal construction येत आहे. त्या ठिकाणी पुन्हा ही अनधिकृत बांधकामे उभी राहत असल्याचे उघड कारवाई नंतरही बांधकामे पूर्ण झाले आहे.

12:30 September 16

मुंबईत पुढील ३ ते ४ तासात मध्यम स्वरूपाचा पाऊस, हवामान विभागाची माहिती

मुंबई - मुंबईत पुढील ३ ते ४ तासात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. मुंबईसह ठाणे, रायगड, पालघर आणि पुण्याच्या घाट परिसरात मध्यम स्वरूपाचा पाऊस ( Heavy Rains Mumbai Thane Pune Raigad Ratnagiri Kolhapur Nashik on alert ) पडेल अशी शक्यता मुंबई हवामान विभागाने आज सकाळी १० वाजता वर्तवली आहे. दरम्यान मुंबईत आज ढगाळ वातावरण राहील अशीही शक्यता हवामान विभागाने ( Meteorological Department ) वर्तवली आहे. ( Maharashtra Heavy Rains Mumbai Thane Pune Raigad Ratnagiri Kolhapur Nashik on alert )

11:34 September 16

जात पडताळणी प्रकरणी खासदार नवनीत राणांची मुंबई सत्र न्यायालयात धाव

नवनीत राणा यांच्या जात पडताळणी संदर्भातील शिवडी अधिकारी न्यायालयात सुरू असलेला खटला लवकरात लवकर निकाली काढण्याकरिता सत्र न्यायालयात याचिका

नवनीत राणा यांच्यावर अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी शाळा सोडल्याचा दाखला खोटा केल्याचा आरोप

वरिष्ठ वकील रिजवान मर्चंट यांच्यामार्फत दाखल केली याचिका

या अर्जावर 30 सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे

11:01 September 16

गर्दीच्या ठिकाणी मोबाईल चोरी करणाऱ्या अंतरराज्यीय टोळीला अटक, ७२ मोबाईल जप्त

नागपूर - शहरातील गर्दीच्या परिसरातुन लोकांचे महागडे मोबाईल चोरायचे आणि नंतर चोरीच्या मोबाईलची थेट बांगलादेशात विक्री करणाऱ्या अंतरराज्यीय टोळीच्या मुसक्या अवळण्यात नागपूर गुन्हे शाखेच्या युनिट-क्रमांक दोनच्या पथकाला यश मिळाले आहे. पोलिसांनी एकूण सहा आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडे चोरीचे ७२ मोबाईल आढळून आले आहेत, ज्याचे बाजारमूल्य १६ लाख रुपये इतके आहे.

11:01 September 16

जळगाव येथील सोनाराला पोलीस कर्मचाऱ्याने लुटले, गुन्हा दाखल

औरंगाबाद - लुटमार करणाऱ्यांना पकडण्याचे काम असणाऱ्या पोलिसानेच लुटमार केल्याची धक्कादायक घटना सोयगाव परिसरात समोर आली. पोलिस ठाण्याच्या अंमलदाराने चक्क एका सहकाऱ्याच्या साह्याने तब्बल साडेबारा लाखांचे सोन्याचे दागिने आणि साडेआठ लाखांची रोकड अशी सुमारे २१ लाखांची लूट केल्याचे प्रकरण समोर आले आहे. सिडको एमआयडीसी पोलिसांनी या लुटारू पोलिसाच्या मुसक्या आवळल्या असून, संतोष तेजराव वाघ असे आरोपी पोलिसाचे नाव आहे.

09:45 September 16

लम्पी आजाराचा प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकार अलर्ट मोडवर; टास्क फोर्स तयार

मुंबई - राज्यातील लम्पी आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी (Lumpy Skin Disease) महाराष्ट्र सरकारने राज्यस्तरीय टास्क फोर्सची स्थापना केली (state level task force to control lumpy) आहे. त्याबाबत पशुसंवर्धन विभागाने शासन निर्णय जारी केला आहे. 12 सदस्यीय टास्क फोर्सचे नेतृत्व आयुक्त, पशुसंवर्धन, पुणे हे करणार आहेत.

09:45 September 16

मुंबईत आज ढगाळ वातावरण, काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता

मुंबई - मुंबईत १४ ते १६ सप्टेंबर दरम्यान पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईत गेले काही दिवस पाऊस पडत असून आज ढगाळ वातावरण असणार आहे. साधारण पाऊस पडणार असून काही ठिकाणी जोरदार पाऊस पडेल अशी शक्यता मुंबई हवामान विभागाने वर्तवली आहे.

09:05 September 16

ग्राहकांसाठी खूशखबर! आज बाजारात सोने-चांदीच्या किमती उतरल्या

मुंबई : सोने चांदीच्या दागिन्यांचे ( Gold Silver Rates ) आकर्षण प्रत्येकालाच असते. महिलांना सोने-चांदी दागिन्यांची आवड सर्वाधिक असते. त्यामुळेच सोने दर चांदी दर किती आहेत, ते पाहण्याची सर्वांनाच उत्सुकता असते. मुंबई शहरात सोने दर ( 16 Septembar 2022 Gold Silver Rates ) आणि चांदी दर ( Gold rate News Mumbai ) किती आहे याची माहिती जाणून घ्या. त्याशिवाय जाणून घ्या महाराष्ट्रासह देशातील अन्य महत्त्वाच्या शहरांमधील ( Maharashtra Todays Gold Silver Rates ) सोने चांदीचे दर.

09:05 September 16

पावसामुळे भिंत पडल्याने लखनौमध्ये 9 जणांचा मृत्यू

लखनौ - पावसामुळे भिंत पडल्याने लखनौमध्ये 9 जणांचा मृत्यू झाला आहे. मागील काही दिवसांपासून उत्तर प्रदेशातील विविध भागात जोरदार पाऊस सुरू आहे.

08:06 September 16

लखीमपूर खेरी खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालणार, पीडित कुटुंबाला २५ लाखांची आर्थिक मदत

लखनौ (उत्तरप्रदेश ) : Lakhimpur Kheri Case मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लखीमपूर येथील घटनेतील पीडितेच्या lakhimpur sisters rape murder case नातेवाईकांना 25 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचे निर्देश दिले आहेत. यासोबतच पक्के घर आणि शेतजमिनीचे पट्टे देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. उत्तर प्रदेश सरकारनेही फास्ट ट्रॅक कोर्टात खून खटल्यासाठी प्रभावी लॉबिंग करून आरोपींना महिनाभरात शिक्षा करण्याचे आश्वासन पीडित कुटुंबाला दिले cm yogi order fast track court आहे.

08:02 September 16

हैदराबाद मुक्ती दिन.. गृहमंत्री अमित शाह राहणार उपस्थित.. भाजपचा 'मेगा प्लॅन'

हैदराबाद (तेलंगणा ) : Hyderabad Liberation Day केंद्रीय गृहमंत्री अमित शहा Union Home Minister Amit Shah 'हैदराबाद मुक्ती दिन' सोहळ्याचे उद्घाटन करतील आणि 17 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या Narendra Modi Birthday उत्सवाला उपस्थित राहतील.

08:01 September 16

लंम्पीसदृश्य आजाराचे नागपुरात एकूण वीस बाधित, तर एका बैलाचा मृत्यू

नागपूर - लंम्पी हा आजार जनावरातील कोरोना प्रादुर्भावासारखा असून त्यावर उपाययोजना करताना ज्या ठिकाणी उद्रेक झाला त्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. नागपूर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत वीस जनावरांना लागण झाली असून त्यापैकी एका बैलाचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली आहे. जिल्ह्यात दहा हजार जनावरांचे लसीकरणाचे उद्दिष्ट घेतले असून आतापर्यंत 4 हजार लसीकरण पूर्ण झाल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली.

07:09 September 16

लेहच्या उत्तरेस १८९ किमी अंतरावर ४.८ रिश्टर स्केलचा भूकंप

लेह ( लडाख ) : Earthquake in Leh नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, अल्ची (लेह) पासून 189 किमी उत्तरेस पहाटे 4.19 च्या सुमारास 4.8 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. भूकंपाची खोली जमिनीखाली 10 किमी होती. सध्या कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. earthquake in ladakh

07:09 September 16

NTA ने CUET UG निकाल केला जाहीर.. 'या' ठिकाणी येईल पाहता

नवी दिल्ली: CUET Result 2022 नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने कॉमन युनिव्हर्सिटी एन्ट्रन्स टेस्ट अंडरग्रेजुएटचा निकाल जाहीर केला आहे. उमेदवार cuet.samarth.ac.in या अधिकृत वेबसाइटवर त्यांचा निकाल पाहू शकतात. याशिवाय उमेदवार https://cuet.samarth.ac.in/ या लिंकवर क्लिक करून त्यांचा निकाल थेट पाहू शकतात.

06:46 September 16

सलमान खान धमकी प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग

मुंबई : पंजाबमधील प्रसिद्ध गायक सिद्धू मूसेवाला याची गोळ्या झाडून हत्या केल्यानंतर प्रसिद्ध अभिनेता सलमान खान याला जीवे मारण्याची धमकी देणारे पत्र सलमानचे वडील सलीम खान यांना सापडले. या प्रकरणी जून महिन्यात वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आता हे प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. आता गुन्हे शाखेचे पथक दिल्लीला जाऊन अटक आरोपींची चौकशी करणार आहे. धमकी मिळाल्यानंतर सलमान खान आणि त्याचे वडील लेखक सलीम खान यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. सलमान आणि सलीम यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर महाराष्ट्र सरकारने लागलीच कारवाई केली.

06:33 September 16

Maharashtra Breaking News : सर्व प्रकारचे अपडेट वाचा येथे

यवतमाळ - येथील तहसील चौकातील पोलीस मुख्यालयाच्या गेटवर बुधवारी रात्री १२ वाजताच्या सुमारास पोलीस नाईक रक्तबंबाळ व मृतावस्थेत आढळून आला. बारमधील वादानंतर पोलीस पुत्रासह त्याच्या सहकाऱयाने पोलीस नाईकाचे हत्याकांड घडविल्याचे समोर आले आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

Last Updated : Sep 16, 2022, 10:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.