ETV Bharat / bharat

JMMU AND KASHMIR :जम्मू-काश्मीरच्या कोकेरनागमध्ये शस्त्रासह 3 दहशतवाद्यांना अटक; सुरक्षा दलाची कारवाई - सुरक्षा दलाची कारवाई

जम्मू-काश्मीर पोलीस आणि लष्कराकडून करण्यात येणाऱ्या संयुक्त मोहिमेत मोठे यश हाती आले आहे. कोकेरनाग येथे सुरक्षा दलाने 3 दहशतावाद्यांना शस्त्रासह अटक केली आहे.

तीन दहशतवाद्यांना अटक
तीन दहशतवाद्यांना अटक
author img

By

Published : Aug 10, 2023, 2:09 PM IST

कोकेरनाग: दक्षिण काश्मीरमधील कोकेरनाग येथे सुरक्षा दलाने दारुगोळ्यासह 3 दहशतवाद्यांना अटक केली. सुरक्षा दलाच्या जवानांनी त्यांच्या ताब्यातून 2 एके मॅगझिनसह 1हँडग्रेनेड आणि 56 जिवंत राउंड जप्त केली आहेत. ही कारवाई बुधवारी रात्री लष्कार आणि जम्मू-काश्मीर पोलिसांकडून करण्यात आली.

पोलिसांनी दिली माहिती: या कारवाईनंतर माध्यमांशी बोलताना पोलिसांनी सांगितले की, या शोध मोहीमेदरम्यान दहशतवाद्यांनी घेराव तोडण्यासाठी ग्रेनेड फेकले. यात सुरक्षा दलाच्या 3 जवानांसह 2 नागरिक जखमी झाले असून त्यांना कोकेरनाग रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही कारवाई जम्मू-काश्मीर पोलीस आणि सुरक्षा दलाने संयुक्तपणे केली. खानसाहिब पोलीस स्टेशनच्या अंतर्गत असलेल्या वागर परिसरात या दहशतवाद्यांना अटक करण्यात आली. एका अधिकाऱ्याने ट्विटमध्ये सांगितले की, दहशतवाद्यांकडून शस्त्रे आणि दारुगोळा जप्त करण्यात आला आहे.

विविध ठिकाणी नाकाबंदी: याआधी सोमवारी लष्कराने पूँछ जिल्ह्यातील देगवार टेरवानच्या नियंत्रण रेषेजवळ (एलओसी) घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावला होता. यावेळी लष्कराच्या दलाने दोन दहशतवाद्यांना ठार केले. 15 ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांकडून विविध भागात नाकाबंदी केली जात आहे. या दरम्यान नागरिकांची तपासणी केली जात आहे. जेणेकरुन 15 ऑगस्टला कोणताच अनुचित प्रकार घडून नये. दरम्यान या नाकेबंदी दरम्यान काही स्थानिक गुडांना अटक करण्यात आली आहे. या नाकाबंदीच्या दरम्यान ड्रग्स, दारुगोळा आणि हत्यारदेखील जप्त करण्यात आली आहेत. जोपर्यंत काश्मीर खोऱ्यातील दहशतवादाचा नायनाट पूर्णपणे होत नाही. तोपर्यंत शोध मोहिमा चालू राहतील, असे लष्कर आणि पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

हेही वाचा-

  1. Terrorist Encounter: सुरक्षा दलाने हाणून पाडला घुसखोरीचा प्रयत्न; कुपवाडा आणि राजौरी भागामध्ये दोन दहशतवादी ठार
  2. Jammu Kashmir Encounter : काश्मीरमध्ये सुरक्षा दल-दहशतवाद्यांमध्ये चकमक; तीन जवान जखमी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.