शहाडोल (मध्य प्रदेश) : मध्य प्रदेशातील शहडोल जिल्हा हा आदिवासीबहुल आहे. जिल्ह्यात उपचाराच्या नावाखाली शरीरावर डाग देण्याच्या प्रथेचे प्रमाण जास्त आहे. अलीकडेच शहडोल जिल्ह्यातील कथौटिया गाव एका निष्पाप मुलीला डाग दिल्यामुळे चर्चेत आले होते. आता पुन्हा एकदा शहडोल जिल्ह्यातील समतपूर गावातून आणखी एक निष्पाप मुलीला उपचाराच्या नावाखाली डाग दिल्याची घटना समोर आली आहे. तिच्यावर आता खासगी रुग्णालयात डॉक्टरांचे पथक उपचार करत आहे.
मुलगी खाजगी रुग्णालयात दाखल : सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या 3 महिन्यांच्या मुलीला अनेक वेळा गरम रॉडने डाग देण्यात आले. तिची प्रकृती बिघडू लागल्यानंतर तिला शहडोल मेडिकल कॉलेजमध्ये आणण्यात आले. तेथे तिची प्रकृती चिंताजनक होती. त्यानंतर कुटुंबीयांनी तिला वैद्यकीय महाविद्यालयातून उपचारासाठी खासगी रुग्णालयात नेले. तेथे तिच्यावर उपचार सुरू आहेत. या निष्पाप मुलीला श्वास घेण्यास त्रास होता. त्यावर उपचार म्हणून तिला गरम रॉडने डाग देण्यात आले. परंतु जेव्हा तिची प्रकृती बिघडू लागली तेव्हा तिच्या पालकांनी तिला ताबडतोब डॉक्टरांकडे नेले.
गावात उपचाराच्या चांगल्या सुविधा नाहीत : नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार त्यांना गावात उपचाराच्या चांगल्या सुविधा न मिळाल्याने त्यांनी तिला जवळच्या डॉक्टरकडे नेले. तेथे प्रकृतीत सुधारणा न झाल्याने ते तिला तेथून मेडिकल कॉलेजला घेऊन केले. तिच्या शरीरावर अनेक जखमा झाल्या आहेत. तिची प्रकृती अधिकच खालावल्याने नातेवाइकांनी तिला वैद्यकीय महाविद्यालयातून नेऊन खासगी रुग्णालयात दाखल केले.
जिल्हा प्रशासन गंभीर नाही : विशेष म्हणजे आरोग्य सुविधांबाबत काळ कितीही बदलला तरी गावांमध्ये आधुनिक सुविधा वाढलेल्या नाहीत. शहडोल जिल्ह्यातील खेड्यापाड्यात आजही उपचाराच्या नावाखाली अंगावर डाग देण्याची वाईट प्रथा सुरू आहे. निष्पाप मुलांना या दुष्ट प्रथेचे बळी व्हावे लागते. अशा स्थितीत प्रशासनालाही या कुप्रथेविरुद्ध कडक कारवाई करावी लागणार असल्याचे लोकांचे म्हणणे आहे. यासोबतच ग्रामीण भागातही जनजागृती करावी लागणार आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत अशाचप्रकारे डाग देण्याचे प्रकरण समोर आल्यानंतर प्रशासनाने ग्रामीण भागात जनजागृती केली होती.
हेही वाचा : Bhopal Trilok Bor : 100 वर्षे जुने दुर्मिळ बोरांचे झाड, बोरांची किंमत ऐकून व्हाल थक्क!