ETV Bharat / bharat

Missiles Misfire In Pokharan : पोखरण फायरिंग रेंजवरून तीन मिसाइल मिसफायर, कोणतीही जीवितहानी नाही

जैसलमेरमधील पोखरण फील्ड फायरिंग रेंजवरून शुक्रवारी जमिनीवरून हवेत मारा करणारी तीन क्षेपणास्त्रे मिसफायर झाली. या अपघातात कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र क्षेपणास्त्रांच्या लँडिंगमुळे भूभागात मोठा खड्डा पडला आहे.

Missiles Misfire In Pokharan
पोखरण फायरिंग रेंजवरून मिसाइल मिसफायर
author img

By

Published : Mar 25, 2023, 8:50 AM IST

पोखरण (राजस्थान) : भारतीय लष्कराकडून शुक्रवारी राजस्थानमधील पोखरण फील्ड फायरिंग रेंजवरून चुकून तीन क्षेपणास्त्रे डागली गेली. यापैकी एका क्षेपणास्त्राचे अवशेष आजसर गावाजवळील कछाब सिंगच्या शेतात फील्ड फायरिंग रेंजच्या बाहेर सापडले आहे, तर दुसऱ्याचे अवशेष सत्याया गावापासून दूर एका निर्जन ठिकाणी सापडले आहे. तिसऱ्या क्षेपणास्त्राच्या अवशेषांचा शोध घेणे सध्या सुरू आहे.

कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली नाही : अपघातग्रस्त क्षेपणास्त्रांचे अवशेष बाहेर काढण्यासाठी पोलीस आणि लष्कराचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. या अपघातात कोणतीही वित्त किंवा जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. लष्कराचे जनसंपर्क अधिकारी अमिताभ शर्मा यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. पोखरण फील्ड फायरिंग रेंज येथे लष्कराच्या तुकडीचा वार्षिक सराव सुरू असताना ही घटना घडली, अशी माहिती काही अधिकाऱ्यांनी दिली.

भूभागात मोठा खड्डा पडला : संरक्षण प्रवक्त्याने सांगितले की, 'शुक्रवारी लष्कराच्या तुकडीचे वार्षिक फील्ड फायरिंग सुरू असताना ही घटना घडली.' ते म्हणाले की, क्षेपणास्त्र सुरक्षितपणे नष्ट केले गेले आहे. मात्र, ढिगारा शेजारील शेतात पडला आहे. ते पुढे म्हणाले की, 'या घटनेत कर्मचारी किंवा मालमत्तेचे कोणतेही नुकसान झाले नाही. या प्रकरणाची चौकशी केली जात आहे'. दोन्ही क्षेपणास्त्रांच्या लँडिंगमुळे भूभागात मोठा खड्डा पडला आहे.

घटनेची चौकशी होणार : माहितीनुसार, लष्कराच्या तुकडीचा वार्षिक सराव सुरू असताना ही घटना घडली. या प्रकारची ही पहिलीच घटना आहे, त्यामुळे अपघाती प्रक्षेपण रोखण्यासाठी असलेल्या सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या बेजबाबदारपणाचे नेमके कारण शोधण्यात अद्याप अधिकाऱ्यांना यश आलेले नाही, परंतु त्यांनी आश्‍वासन दिले आहे की, ते या प्रकरणी सर्व अंगाने सखोल चौकशी करतील आणि दोषींना योग्य ती शिक्षा दिल्या जाईल.

हे ही वाचा : Kejriwal Supports Rahul Gandhi: राहुल गांधींच्या समर्थनार्थ उतरले केजरीवाल.. म्हणाले, 'अहंकारी हुकूमशहा, कमी शिकलेल्यांपासून देशाला वाचवायचंय'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.