ETV Bharat / bharat

जम्मू आणि काश्मीर - बांदीपुरात तीन दहशतवाद्यांचा खात्मा; जवान जखमी

जखमी झालेल्या जवानाला हलविण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दहशवाद्यांची व त्यांच्या गटाची अद्याप ओळख पटू शकली नाही.

बांदीपुरात तीन दहशतवाद्यांचा खात्मा
बांदीपुरात तीन दहशतवाद्यांचा खात्मा
author img

By

Published : Jul 25, 2021, 2:29 AM IST

श्रीनगर (जम्मू आणि काश्मीर) - सुरक्षा दलाकडून दहशतवाद्यांवर मोठी कारवाई करण्यात येत आहे. बांदीपुरामधील सुमलार अरागाम परिसरात असलेल्या जंगलात दहशतवादी असल्याची पोलिसांना विशेष माहिती मिळाली. या माहितीवरून सुरक्षा दलाने संयुक्त शोधमोहिम राबविली. यावेळी करण्यात आलेल्या कारवाईत तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले. कारवाईदरम्यान सुरक्षा दलाचा जवान जखमी झाला आहे.

अधिकाऱ्याच्या माहितीनुसार सुरक्षा दल परिसरात शोधमोहिम राबवित होते. तेव्हा दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार चालू केला. सुरक्षा दलाने प्रत्युत्तरात गोळीबार करून तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. ही माहिती श्रीनगरमधील सैन्यदलाचे जनसंपर्क अधिकारी इम्रान मुसावी यांनी दिली आहे. चकमकीत सैन्यदलाचा जवान जखमी झाला आहे.

हेही वाचा-VIDEO - गगनबावडा तालुक्यात अणदूर-धुंदवडे रस्ता खचला...सुमारे २० गावांचा तुटला संपर्क

जवानावर उपचार सुरू-

जखमी झालेल्या जवानाला हलविण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दहशवाद्यांची व त्यांच्या गटाची अद्याप ओळख पटू शकली नाही. अजूनही सुरक्षा दलाकडून शोधमोहिम सुरू आहे. त्याबाबत अधिक माहितीची प्रतिक्षा असल्याचेही जनसंपर्क अधिकारी मुसावी यांनी सांगितले.

दरम्यानत, जम्मू आणि काश्मीरच्या कृष्णा घाटी सेक्टर येथे 23 जुलै 2021 रोजी झालेल्या कारवाईत कृष्णा वैद्य या जवानाला वीरमरण आले आहे.

हेही वाचा-गोव्यात 39 वर्षांनंतरचा सर्वात मोठा महापूर, पूरपरिस्थितीचा पंतप्रधान मोदींकडून आढावा

शस्त्रास्त्रांची वाहतूक करणारे ड्रोन पाडले -

अखनूर जिल्ह्यातील कनाचक भागात सुरक्षा दलाने शुक्रवारी एक पाकिस्तानी ड्रोन पाडले. या ड्रोनमधून स्फोटक साहित्य करण्यात आली आहेत. तत्पूर्वी बुधवारीही, बकरीदच्या दिवशी सतवारी भागात एक संशयास्पद ड्रोन दिसले होते. मागील काही दिवसांपासून पाकिस्तानकडून भारतीय हद्दीत शस्त्रे आणि ड्रग्ज पुरवण्यासाठी मानवरहित ड्रोनचा वापर करण्यात येत आहे. त्यामुळे भारतीय सुरक्षा दलाची डोकेदुखी वाढली आहे. काही दिवसांपूर्वीच जम्मूमधील हवाई दल स्टेशनवर ड्रोन हल्ला झाला होता. या संशयी हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीर प्रशासनाने श्रीनगरमध्ये ड्रोनच्या वापरावर बंदी घातली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.