होशंगाबाद (मध्य प्रदेश) - दोन दिवसांपूर्वी सातपुडा टायगर रिझर्वमधील चूराना जंगलात एक वाघिण तिच्या तीन बछड्यांसोबत टूरिस्ट बससमोर आली होती. मुंबईहून आलेल्या पर्यटकांना जवळून वाघ पाहण्याचा आनंद लुटता आला. निसर्गप्रेमी अली राशिद यांनी त्यावेळी वाघिण आणि बछड्यांना कॅमेऱ्यात कैद केले.
अनेकवेळा वाघाचे दर्शन
या वाघिणीने काही वर्षांपूर्वी तीन बछड्यांना जन्म दिला होता. आता ती बछड्यांसह जंगलात फिरते आहे. चार वाघ सोबत पाहून पर्यटकांनीही आनंद व्यक्त केला. याशिवाय आणखी दोन ठिकाणी वाघ दिसले आहेत. ऑक्टोबरपासून एसटीआरचे पर्यटन सुरू झाले आहे. तेव्हापासून अनेकवेळा वाघ दिसले आहेत. काही दिवसांपूर्वी सातपुडा टायगर रिझर्वमधील जंगलात फॉरेस्ट चेक पोस्टच्या जवळ वाघ आले आहेत. जवळपास अर्धा तास हे वाघ चेक पोस्टजवळ होते. बचावासाठी शेजारच्या खोलीत थांबलेल्या कर्मचाऱ्यांनी खिडकीतून वाघांचा व्हिडिओ रेकॉर्ड केला होता. तो व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
हेही वाचा - 'जैश'च्या दोन संशयित दहशतवाद्यांना अटक; दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाची कारवाई
सातपुडा टायगर रिझर्वचे डेप्युटी डायरेक्टर अनिल शुक्ला यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या खापा आणि जहर घाट परिसरात वाघ दिसत आहेत. तर चौकीच्या आसपासही वाघ दिसत असून चौकीजवळचा परिसर सुरक्षित असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
हेही वाचा - कानपुरमध्ये सहा वर्षांच्या चिमुकलीची अंधश्रद्धेतून हत्या, अत्याचार केल्याचेही निष्पन्न