ETV Bharat / bharat

महिला, दलित आणि आदिवासींना मंत्री पाहून काहींच्या पोटात दुखतयं; मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली आहे. यावेळी विरोधकांनी केंद्र सरकारला घेराव घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी नव्या केंद्रीय मंत्रीमंडळात महिला, दलित आणि आदिवासींना स्थान देण्यात आले आहे. मात्र, यामुळे काही लोक आनंदी नसल्याचे दिसत आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

Modi
मोदी
author img

By

Published : Jul 19, 2021, 1:26 PM IST

नवी दिल्ली - देशातील कोरोना संकटात संसदेचे दुसरे अधिवेशन आजपासून म्हणजे 19 जुलै रोजी सुरू झाले आहे. या अधिवेशनाचे कामकाज 19 दिवस चालणार असून ते 13 ऑगस्ट रोजी संपणार आहे. सभागृहात अधिवेशन सुरू झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी नव्या मंत्रीमंडळाची ओळख करून देण्यासाठी उभे राहिल्यावर विरोधकांनी जोरदार गोंधळ घातला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही माघार न घेता, विरोधकांना टोला लगावला. नव्या केंद्रीय मंत्रीमंडळात महिला, दलित आणि आदिवासींना स्थान देण्यात आले आहे. मात्र, यामुळे काही लोक आनंदी नसल्याचे दिसत आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

केंद्रीय मंत्रीमंडळाच्या विस्तारात दलित, आदिवासी मंत्री झाले आहेत. यावेळी कृषी आणि ग्रामीण भागातील आमच्या सहयोगींना संधी देण्यात आली आहे. ओबीसी समुदायाच्या प्रतिनिधींना मंत्रीमंडळात स्थान दिले. यामुळे संसदेत उत्साह असेल, असे मला वाटले होते. मात्र, देशातील महिला, ओबीसी आणि शेतकऱ्यांच्या मुलांना मंत्री होण्याची संधी दिल्याने काही जण आनंदी नसल्याचे दिसत आहे. यामुळे त्यांची ओळख करुन देण्याची परवानगी ते देत नाही आहेत, असे मोदी म्हणाले.

नव्या मंत्रीमंडळाचा परिचय करून देताना विरोधकांनी गोंधळ घातल्याने संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी विरोधकांवर टीका केली. पंतप्रधान नव्या मंत्र्यांची ओळख करून देताना, जो गोंधळ विरोधकांकडून घातला जात आहे. हे गेल्या 24 वर्षांच्या माझ्या राजकीय अनुभवांमध्ये मी पहिल्यांदा पाहतोय. जेव्हा पंतप्रधान नव्या मंत्र्यांची ओळख करून देतात. तेव्हा संपूर्ण सभागृह शांततेत ऐकत असतो, ही परंपरा आतापर्यंत होती, असे राजनाथ सिंह म्हणाले. मात्र, तरीही विरोधक शांत होत नसल्याने लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनीही संताप व्यक्त केला. विरोधकांचे हे वागणे संसदेच्या परंपरेला धरुन नसल्याचे ते म्हणाले. अखेर दुपारी 2 वाजेपर्यंत सभागृहाचे कामकाज तहकूब केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.