ETV Bharat / bharat

Diwali 2021 : देशाच्या राजधानीत 'अशा' पध्दतीने साजरी करतात दिवाळी

author img

By

Published : Nov 1, 2021, 8:10 PM IST

उद्योग, नोकरी, शिक्षण या निमित्ताने देशभरातून सर्व लोक दिल्लीत स्थायिक झाल्याने नवीन वर्ष, बैसाखी, व्हॅलेंटाईन डे, ख्रिसमस, करवा चौथ, छठ, दुर्गापूजा, गणेश चतुर्दशी हे सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. उच्चभ्रू वसाहत असू दे. किंवा झोपडपट्टीतील मजूर कुटुंब असो, सर्वजण या सणाची आतुरतेने वाट पाहतात आणि आपापल्या स्थितीनुसार दिवाळी साजरी करतात.

diwali celebrated in capital delhi
diwali celebrated in capital delhi

नवी दिल्ली - देशाच्या राजधानी म्हणजे दिल्लीत सर्व राज्यांतील लोक राहतात. इतर सणांप्रमाणेच दिवाळी हा आजही सगळ्यांचा आवडता सण आहे. दिल्लीतील लोक हा दिव्यांचा आणि समृद्धीचा सण केवळ सन्मानाने साजरा करतात. तर आज दिवाळीच्या निमित्ताने दिल्लीत दिवाळी कशी साजरी केली जाते याचा आढावा घेऊया....

दशकभरापूर्वी दिल्लीत फक्त दोन-चार सण साजरे होत असत. उद्योग, नोकरी, शिक्षण या निमित्ताने देशभरातून सर्व लोक दिल्लीत स्थायिक झाल्याने नवीन वर्ष, बैसाखी, व्हॅलेंटाईन डे, ख्रिसमस, करवा चौथ, छठ, दुर्गापूजा, गणेश चतुर्दशी हे सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. उच्चभ्रू वसाहत असू दे. किंवा झोपडपट्टीतील मजूर कुटुंब असो, सर्वजण या सणाची आतुरतेने वाट पाहतात आणि आपापल्या स्थितीनुसार दिवाळी साजरी करतात.

दिल्लीतील दिवाळी
यंदा 4 नोव्हेंबर 2021 रोजी दिवाळीचा सण साजरा केला जाणार आहे. या दिवशी लोक महालक्ष्मीची पूजा करतात. नातेवाईक आणि शेजाऱ्यांना प्रसाद वाटतात. या सगळ्याशिवाय दिवाळीच्या सणाची लगबग आधीच सुरू असते. लोक या दिवसासाठी खरेदी करतात आणि विविध आणि नवीन ठिकाणांहून दिवाळीच्या वस्तू खरेदी करतात. गेली दोन वर्ष दिवाळी सणावर कोरोनाचे सावट होते. यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने बाजारात पुन्हा उत्साह संचारला आहे. दिल्लीत दिवाळीच्या खरेदीसाठी खालील बाजारपेठा प्रसिध्द आहे. चांदनी चौक जवळ असलेल्या भागीरथ बाजारपेठांमध्ये इलेक्ट्रॉनिक्सचे सामान स्वस्त मिळते. डिझायनर आणि न्यू ट्रेंडी कपडे खरेदी करण्यासाठी लाजपत नगरला सेंट्रल मार्केटला जावे लागते. सदर बाझार शोभेच्या वस्तू, सुका मेवा, लाईट, मसाले मिळतात.

दिवाळीवर प्रदूषण आणि कोरोनाचे सावट
गेल्या काही वर्षांपासून दिवाळीजवळ प्रदूषणाची समस्या लक्षात घेऊन फटाक्यांवर बंदी घालण्यात आली आहे. यावेळीही दिल्लीत दिवाळी फटाक्यांशिवाय साजरी केली जाईल. दिल्ली प्रदूषण नियंत्रण समितीने 1 जानेवारी 2022 पर्यंत राजधानीत सर्व प्रकारच्या फटाक्यांवर तसेच त्यांच्या विक्रीवरही बंदी घालण्यात आली आहे. दिल्लीत कोविडच्या तिसऱ्या एका लाटेचा धोका आहे. अशा परिस्थितीत जर फटाके फोडण्यास परवानगी दिल्यास लोक जमू शकतात. ज्यामुळे सामाजिक अंतराचे उल्लंघन होईल. तसेच हिवाळ्यात प्रदूषणामुळे सर्दीची समस्या गंभीर आहे. यामुळे या समितीने फटाक्यांवर बंदी घालण्याचा आदेश जारी केला आहे.

हेही वाचा - अनिल देशमुखांवर काय होते आरोप? किती वेळा बजावण्यात आला समन्स, वाचा सविस्तर...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.