ETV Bharat / bharat

बिहारमध्ये मतदानाचा हक्क! स्थानिकांनी परस्पर सहकार्याने बागमती नदीवर बांधला पूल - बिहार बागमती नदी

हयाघाट विधानसभा मतदारसंघातील सिर्निया पंचायतीच्या घारी टोला येथील लोकांनी परस्पर सहकार्याने बागमती नदीवर लाकडाचा पूल बांधला आहे. मतदान केंद्र बागमती नदीच्या दुसर्‍या बाजूला आहे. त्यामुळे हा पूल परस्पर सहकार्याने आम्ही बांधला आहे. जेणेकरून लोक मतदानाचा हक्क बजावतील आणि सशक्त लोकशाही प्रस्थापित होईल, असे स्थानिक रहिवासी परवेझ म्हणाले.

बिहार
बिहार
author img

By

Published : Nov 7, 2020, 6:01 PM IST

दरभंगा - बिहारमध्ये तिसऱ्या टप्प्यातील मतदान सुरू असून मतदारांचा उत्साह शिखरावर आहे. सकाळपासूनच लोक मतदानाचा हक्क बजावत आहेत. हयाघाट विधानसभा मतदारसंघातील सिर्निया पंचायतीच्या घारी टोला येथील लोकांनी परस्पर सहकार्याने बागमती नदीवर लाकडाचा पूल बांधला आहे. जेणेकरून मतदारांना मतदान केंद्रात पोहोचण्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.

मतदानाचा हक्क बजावण्यासाठी नागरिकांमध्ये उत्साह

एक मजबूत सरकार निवडण्यात आपली भूमिका निभाण्यासाठी गावातील लोकांनी पूल बांधला. स्वातंत्र्यानंतर कोणत्याही लोकप्रतिनिधीने या भागाच्या विकासाकडे लक्ष दिले नाही. ज्यामुळे आपल्याला बर्‍याच समस्यांना सामोरे जावे लागत आहे. मतदान केंद्र बागमती नदीच्या दुसर्‍या बाजूला आहे. त्यामुळे हा पूल परस्पर सहकार्याने आम्ही बांधला आहे. जेणेकरून लोक मतदानाचा हक्क बजावतील आणि सशक्त लोकशाही प्रस्थापित होईल, असे स्थानिक रहिवासी परवेझ म्हणाले.

पाच विधानसभा मतदारसंघात एकूण 14 लाख 72 हजार मतदार आपला हक्क बजावणार आहेत. त्याचबरोबर हयाघाट विधानसभेत तिरंगी लढत पाहायला मिळत आहे. महागठबंधनमधील आरजेडीचे उमेदवार भोला यादव, एनडीएचे भाजपा उमेदवार रामचंद्र साह आणि जनअधिकार पार्टीचे पप्पू मैदानात आहेत.

आज तिसऱ्या टप्प्यातील मतदान -

विधानसभेच्या 78 जागांसाठी आज (शनिवार) मतदान सुरू आहे. सकाळी 7 वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली. हा निवडणुकीचा तिसरा आणि शेवटचा टप्पा आहे. 10 नोव्हेंबरला निकाल लागेल. निवडणुकीच्या या टप्प्यात 1 हजार 204 उमेदवार रिंगणात आहेत. तर पहिला टप्पा 28 ऑक्टोबरला तर दुसरा टप्पा ३ नोव्हेंबरला पार पडला. पहिल्या टप्प्यात 53.53% टक्के तर दुसऱ्या टप्प्यात 53.51 मतदानाची नोंद झाली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.