ETV Bharat / bharat

Rishikesh International Yoga Festival : आंतरराष्ट्रीय योग महोत्सव ठरला आनंदोत्सव, मल्लखांबांनी जिंकले मन

author img

By

Published : Mar 11, 2023, 3:56 PM IST

Updated : Mar 11, 2023, 4:16 PM IST

सध्या ऋषिकेश हे पवित्र शहर आंतरराष्ट्रीय योग महोत्सवाने बहरले आहे. शुक्रवारची संध्याकाळ विविध योगासनांना समर्पित करण्यात आली. विशेषत: मल्लखांबच्या कामगिरीने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

Rishikesh International Yoga Festival
आंतरराष्ट्रीय योग महोत्सवात मल्लखांबांनी जिंकले मन
आंतरराष्ट्रीय योग महोत्सव ठरला आनंदोत्सव

उत्तराखंड : योगाची राजधानी ऋषिकेशमध्ये आंतरराष्ट्रीय योग महोत्सव पूर्ण रंगात दिसत आहे. 9 तारखेला, जिथे सुफी गायक कैलाश खेर यांनी आपल्या खास शैलीत संगीताची जादू सादर केली. तिथे द्रोणाचार्य पुरस्कारप्राप्त मलखान ग्रुपनेही शुक्रवारी रात्री उशिरा आपल्या कामगिरीने सर्वांना मंत्रमुग्ध केले. ऋषिकेशमध्ये योग महोत्सव १२ मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. यामध्ये विविध देशांतील लोक सहभागी झालेले आहेत.

आंतरराष्ट्रीय योग महोत्सव : ऋषिकेशमध्ये अनेक दिवसांपासून आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जात आहे. यामध्ये पर्यटन विभाग सर्व व्यवस्था करतो आहे. योग महोत्सवाला पोहोचलेले केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनाही ऋषिकेशचा योग महोत्सव पाहून खूप आनंद झाला. ते म्हणाले की, हे पाहून मला खूप आश्चर्य वाटतं! खरंच ते अद्भुत आणि अलौकिक आहे. किंबहुना ही जागतिक घटना आहे.

केंद्रीय मंत्र्यांनी केल्कौ तुक : कॅबिनेट मंत्री म्हणाले की, 'योगामध्ये प्रेमाची शक्ती आहे. प्रेम हा योग आहे आणि तो केवळ मानवांसाठीच नाही, तर संपूर्ण मानवतेसाठी आहे. ते सर्व सजीवांसाठी आहे. योगाच्या माध्यमातून प्रत्येकाच्या हृदयात मानवता जागृत होऊ शकते'.

90 देशांतील लोक सहभागी: ऋषिकेशमध्ये सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय योग महोत्सवात यावेळी 90 देशांतील लोक सहभागी होत आहेत. 25 हून अधिक देशांतील, 1100 हून अधिक योग साधक आणि 75 हून अधिक योगाचार्य ऋषिकेशमध्ये पोहोचले आहेत.

३५ वा आंतरराष्ट्रीय महोत्सव : परमार्थ निकेतन येथे ३५ व्या आंतरराष्ट्रीय योग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सांस्कृतिक मंत्रालय, आयुष मंत्रालय, भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने G-20, अतुल्य भारत, पर्यटन मंत्रालयाच्या सहकार्याने आयोजित केला जात आहे. विशेष आध्यात्मिक सत्रात स्वामी चिदानंद सरस्वती आणि साध्वी भगवती सरस्वती यांनी योग सहभागींच्या प्रश्नांचे निरसन केले होते. कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी सुफी गायक कैलाश खेर यांनी आपल्या खास शैलीत संगीताची जादू सादर करीत लोकांचे मनोरंजन केले होते.

हेही वाचा : Kailash Kher Songs: आंतरराष्ट्रीय योग्य महोत्सवात कैलाश खेर यांच्या गाण्यांची चालली जादू.. देश -विदेशातील श्रोते मंत्रमुग्ध

Last Updated : Mar 11, 2023, 4:16 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.