ETV Bharat / bharat

Parenting News : मुलांमधील आत्मविश्वास वाढवण्यासाठी पालकांनी कराव्यात 'या' गोष्टी

अनेक वेळा मुलं आयुष्यातील अनेक चांगल्या संधी केवळ आत्मविश्वासाच्या अभावामुळे गमावतात. त्यामुळे लहानपणा पासुनच त्यांच्यातील आत्मविश्वास (increase self confidence in their children) वाढविणे, त्यासाठी विशेष: कार्य करणे (These are things parents should do) गरजेचे असते.

author img

By

Published : Nov 26, 2022, 5:19 PM IST

Parenting News
मुलांमधील आत्मविश्वास वाढवा

प्रत्येक पालकाला लहानपणापासूनच आपल्या मुलामध्ये आत्मविश्वास वाढवायचा असतो. आत्मविश्वासाने भरलेले मूल आयुष्यातील प्रत्येक परीक्षेत सहज उत्तीर्ण होऊ शकते. अनेक वेळा मुलं आयुष्यातील अनेक चांगल्या संधी केवळ आत्मविश्वासाच्या अभावामुळे गमावतात. अशा परिस्थितीत आपल्या मुलांमध्ये आत्मविश्वास (increase self confidence in their children) कमी पडू देऊ नये, ही प्रत्येक पालकाची जबाबदारी (These are things parents should do) बनते. चला जाणून घेऊया त्या प्रभावी टिप्स, ज्यांच्या मदतीने तुम्ही तुमच्या मुलांमध्ये नवीन आत्मविश्वास निर्माण करु शकता.

मुलांची स्तुती करा : मूल जेव्हा चांगले काम करेल तेव्हा त्याची स्तुती करा. तुम्ही असे केल्याने त्याला पुढच्या वेळी अधिक चांगले काम करण्यास प्रवृत्त होईल. तो प्रत्येक कार्य अधिक चांगले करण्याचा प्रयत्न करेल, ज्यामुळे त्याचा आत्मविश्वास वाढेल.

मुलांवर प्रेम करा : तुमचा रागीट टोन आणि बोलण्यासाठी वापरली जाणारी भाषा, यामुळे मुलाला अस्वस्थ वाटू शकते. अशा परिस्थितीत तुमच्या मुलांसाठी वेळ काढा आणि त्यांच्याशी प्रेमाने बोला. त्यांच्या प्रश्नांची उत्तरे द्या. त्यांचे शब्द आवडीने ऐका. यामुळे मुले नेहमी आत्मविश्वासू राहतील.

नकारात्मक विचारांपासून दूर राहा : मुले नकळत त्यांच्या आजूबाजूच्या वातावरणातून खूप काही शिकतात. अशा परिस्थितीत मुलांना नकारात्मक वातावरणापासून दूर ठेवणे ही पालकांची जबाबदारी बनते. तसेच त्यांच्यासमोर कधीही नकारार्थी शब्द वापरू नका, तुम्हाला जमणार नाही, तुम्ही पडाल, तुम्हाला दुखापत होईल इत्यादी. असे केल्याने मुलावर नकारात्मक परिणाम होतो.

मुलांची तुलना करु नका : अनेकदा पालकच आपल्या मुलांची इतर मुलांसोबत तुलना करत असतात. खासकरुन शाळेतील मार्क्स किंवा इतर अॅक्टीव्हिटीमध्ये ही तुलना आवर्जुन होत असल्याचं पाहायला मिळतं. पालकांच्या या वर्तनामुळे मुलांमधील नकारात्मकता वाढीस लागते. त्यातूनच मग मुले चिडचिड करु लगातात.

सतत चुका शोधू नका : लहान मुलं अनेक चुकांमधूनच शिकत असतं. त्यामुळे त्यांच्याकडून एखादी चूक झाली तर, त्यांना ओरडण्याऐवजी नीट समजावून सांगा. तसंच अनेक पालकांना मुलांच्या लहान लहान चुका काढण्याची सवय असते. ही सवय टाळा.

मारु नका : लहान मुलांनी हट्ट केल्यावर अनेक पालक त्यांना मारतात किंवा ओरडतात. परंतु, मुलांना मारण्यापेक्षा त्यांना प्रेमाने समजवा. अमूक गोष्ट केल्यामुळे काय होईल किंवा ती गोष्ट आता गरजेची आहे का? हे नीट त्यांना पटवून सांगा.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.