ETV Bharat / bharat

उद्धट बोलणे पडले महागात; केरळ महिला आयोगाच्या अध्यक्षांना द्यावा लागला राजीनामा - Kerala womens commission chief

केरळच्या नागरिकांना जोसेफाईन यांचे उद्धट वागणूक आवडली नाही. त्यांच्यावर सर्वच स्तरामधून कठोर टीका करण्यात आली आहे. सीपीएमच्या सचिवांनी शुक्रवारी केरळ महिला आयोगाच्या अध्यक्षा जोसेफाईन यांना राजीनामा देण्याची सूचना केली.

केरळ महिला आयोगाच्या अध्यक्षा एम. सी. जोसेफाईन

author img

By

Published : Jun 25, 2021, 8:44 PM IST

तिरुवनंतपुरम - कौटुंबिक हिंसाचारातील पीडितेला तुच्छतेने बोलणे केरळ महिला आयोगाच्या अध्यक्षांना महागात पडले आहे. केरळ महिला आयोगाच्या अध्यक्षा एम. सी. जोसेफाईन यांना राजीनामा द्यावा लागला आहे.

टेलिव्हिजनवरील एका कार्यक्रमात कौटुंबिक हिंसाचारीतील पीडितेने केरळ महिला आयोगाच्या अध्यक्षा एम. सी. जोसेफाईन अन्याय झाल्याचे सांगितले. त्यावर जोसेफाईन यांनी महिलेला पोलिसात तक्रार केली का, असे विचारले. त्यावर पीडितेने नाही असे उत्तर देताच महिला आयोगाच्या अध्यक्षांनी त्रास सहन करा, असे उलट पीडितेलाच सुनावले. या कार्यक्रमाचा व्हिडिओ केरळमधील समाज माध्यमांमध्ये व्हायरल झाला.

हेही वाचा-Covid 19 New Restrictions: महाराष्ट्रात पुन्हा निर्बंध लागू, जाणून घ्या नवीन मार्गदर्शक सूचना

सीपीएम केडरसह केरळमधील अनेक नागरिकांनी केली राजीनाम्याची मागणी-

केरळच्या नागरिकांना जोसेफाईन यांचे उद्धट वागणूक आवडली नाही. त्यांच्यावर सर्वच स्तरामधून कठोर टीका करण्यात आली आहे. सीपीएमच्या सचिवांनी शुक्रवारी जोसेफाईन यांना राजीनामा देण्याची सूचना केली. त्यांचा पदाचा कार्यकाळ आठ महिन्यांनी संपणा होतार. मात्र, त्यांना त्यापूर्वीच राजीनामा द्यावा लागला आहे. सीपीएम केडरसह केरळमधील अनेक नागरिकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. कठोर आंदोलनापुढे झुकत सीपीएमला कठोर निर्णय घ्यावा लागला.

हेही वाचा-मानहानी प्रकरण: कोर्टातून दिलासा मिळवण्यासाठी कंगनाने नव्याने दाखल केला अर्ज

यापूर्वीही उद्धट वागणुकीमुळे आल्या होत्या चर्चेत

यापूर्वीही जोसेफाईन यांना उद्धट वागणुकीमुळे लोकांच्या संतापाला सामोरे जावे लागले होते. मात्र, पक्षाने त्यांना अभय दिले होते. मात्र, यावेळी सीपीएमने त्यांना पदावरून दूर करण्याचा निर्णय घेतला.

नवविवाहित महिलेची आत्महत्या

केरळमधील कोल्लम जिल्ह्यात सोमवारी एका 24 वर्षीय नवविवाहित महिलेने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. एस. वी. विस्मया असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. तिचा पती एक राज्य सरकारी कर्मचारी आहे. विस्मयाच्या माहेरच्या नातेवाईकांनी तिच्या पतीवर हुंड्यासाठी खून केल्याचा आरोप केला आहे. विस्मया ही एक आयुर्वेदिक डॉक्टर होती. तिच्या मृत्यूनंतर केरळमध्ये संतापाची भावना निर्माण झाली होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.