नाशिक - सिक्कीम येथून कुटुंबियांपासून दुरावलेला चौदा वर्षांपूर्वी सिक्कीम येथून कुटुंबियांपासून दुरावलेला किशोर राय गोहाटी, आसाम, गुरुमल्ला, हरियाणा, मध्येप्रदेश भोपाळ, असा प्रवास करत महाराष्ट्रात आला होता. मागील दोन वर्षांपुर्वीच्या कोरोना काळात तो दिंडोरीत आला. आता त्याच्या घरच्यांचा शोध लागला असून तो आता आपल्या गावी परत जात आहे. भाजपचे माजी तालुकाध्यक्ष विलास देशमुख यांनी किशोरचा सांभाळ करत त्याच्या घरच्यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.
दोन वर्षांपुर्वीच्या कोरोना काळात तो दिंडोरीत आला
चौदा वर्षांपूर्वी सिक्कीम येथून कुटुंबियांपासून दुरावलेला किशोर राय गोहाटी, आसाम, गुरुमल्ला, हरियाणा, मध्येप्रदेश भोपाळ, असा प्रवास करत महाराष्ट्रात आला होता. मागील दोन वर्षांपुर्वीच्या कोरोना काळात तो दिंडोरीत आला. तेव्हा त्याची आणि भाजपचे तालुकाध्यक्ष विलास देशमुख यांच्याशी अचानक भेट झाली. देशमुख यांनीही त्याला त्यावेळी आधार दिला. त्यांनी त्याला आपल्या घरी आणले. त्यानंतर तच्या शेतातील घरात त्याची राहण्याची सोय केली.
त्यानंतर घरच्यांना आपलाच मुलगा आहे अशी खात्री पटली
खूप दिवसांपरू देशमुख हे किशोरच्या घराचा पत्ता शोध होते. मात्र, त्यामध्ये त्यांना यश येत नव्हते. परंतु त्यांनी हे प्रयत्न चालूच ठेवले. अखेर त्यांना किशोरचा पत्ता शोधण्यात यश आले आहे. त्याच्या घराचा पत्ता मिळाल्यानंतर त्याच्या कुटुंबाला किशोरबाबत माहिती दिली. तसेच, व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून संपर्क साधण्यात आला. त्यानंतर त्याच्या घरच्यांना हा आपलाच मुलगा आहे अशी खात्री पटली. त्यानंतर, सिक्कीमवरुन किशोरचे नातेवाईक दिंडोरीत आले आणि किशोरला घेऊन गेले.
किशोरसह कुटुंबाने कृतज्ञता व्यक्त केली
कुटुंबियांनी किशोरचा तब्बल चार वर्षे शोध घेतला. मात्र, तो काही भेटला नाही. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला असे समजून घरच्या लोकांनी त्याचा दशक्रिया विधी केला. किशोरचे लग्न झालेले असून त्याला एक मुलगी आहे. दरम्यान, आमच्या मुलाला आम्हाला परत केले. त्याला आपण सांभाळले याबद्दल किशोरसह कुटुंबाने कृतज्ञता व्यक्त केली.
हेही वाचा - मेक्सिकोत टोळीयुद्धात हिमाचलच्या मुलीचा मृत्यू, अमेरिकेत अभियंता म्हणून होती कार्यरत