ETV Bharat / bharat

स्मशानभूमीतच काळाचा घाला; छत कोसळल्याने 25 जणांचा मृत्यू

गाझियाबादमध्ये निर्माणाधीन छत कोसळून 25 जणांचा मृत्यू झाला आहे. गाझियाबादमधील मुरादनगर भागातील स्मशानभूमीत ही घटना घडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांनी दुःख व्यक्त केले. योगी आदित्यनाथ यांनी मृताच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाखांची मदत जाहीर केली आहे.

गाझियाबाद
गाझियाबाद
author img

By

Published : Jan 4, 2021, 7:04 AM IST

Updated : Jan 4, 2021, 11:46 AM IST

गाझियाबाद - उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये निर्माणाधीन छत कोसळून मोठी दुर्घटना घडली. या घटनेत आतापर्यंत तब्बल 25 जणांचा मृत्यू झाला आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात आले असून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गाझियाबादमधील मुरादनगर भागातील स्मशानभूमीत छत बांधण्याचे काम सुरू होते. मात्र, अंत्यसंस्कारासाठी जमलेल्या नागरिकांच्या अंगावर निर्माणाधीन छत कोसळून हा अपघात झाला आहे. रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे निर्माणाधीन छत कोसळल्याची माहिती आहे.

मुरादनगरच्या उखलारसी गावात एका वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला होता. मृत व्यक्तींवर अत्यसंस्कार करण्यासाठी नातेवाईक स्मशानभूमीमध्ये एकत्र आले होते. यावेळी जोराचा पाऊस सुरू होते. पावसापासून संरक्षण व्हावं यासाठी लोक तिथे उभे होते. यावेळी अचानक निर्माणाधीन छत कोसळ्याने अनेक लोक ढिगाऱ्याखाली दबल्या गेले. ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांनी आक्रोश केला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि एनडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखले झाले. एनडीआरएफच्या टीमने ढिगारा उपसण्याचं काम सुरू केलं. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 38 पेक्षा जास्त व्यक्तींना बाहेर काढण्यात आले आहे. तर आतापर्यंत 25 जणांचा मृत्यू झाला आहे.

ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीचा स्थानिकांशी संवाद

योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केले दुःख -

घटनेबद्दल माहिती मिळताच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दुःख व्यक्त केले असून मृताच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाखांची मदत जाहीर केली आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी दुर्घटनेचा अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीदेखील या दुर्घटनेबाबत दुःख व्यक्त केले आहे. या कठीण प्रसंगी आपण मृतांच्या नातेवाईकांच्या पाठिशी उभे असल्याची भावना दोघांनी व्यक्त केली. स्मशानभूमीत छताचे बांधकाम होऊन 2 महिने झाले आहेत. त्यांचे काही काम बाकी होते. बांधकामामध्ये निकृष्ट दर्जाच्या सामग्रीचा वापर झाल्याने छत कोसळले असावे, असे स्थानिकांनी सांगितले.

ठेकेदारासह महानगरपालिकेविरोधात गुन्हा दाखल

उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये स्मशानभूमीत निर्माणाधीन असलेले छत कोसळून मोठी दुर्घटना घडली. याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी मुरादनगर महानगरपालिकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निहारिका सिंह, जेई चंद्रपाल, बांधकामाचा सुपरवायजर आशीष, ठेकेदार अजय त्यागी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून घेतला आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत २५ जणांचा मृत्यू झाला आहे.

Last Updated : Jan 4, 2021, 11:46 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.