ETV Bharat / bharat

यूएस फेडरल रिझर्व्हने व्याजदरात केली वाढ; वाढत्या महागाईवर नियंत्रण मिळवण्याच प्रयत्न - अमेरिकी केंद्रीय बँक

अमेरिकेतील वाढत्या महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी यूएस फेडरल रिझर्व्हने व्याजदरात वाढ केली आहे. यूएस फेडरल रिझर्व्हने व्याजदरात (75)बेसिस पॉइंट्स किंवा (0.75)टक्के वाढ केली आहे. या बातमीने भारतीय बाजारालाही धक्का बसू शकतो. भारतीय चलन रुपया आणखी खाली जाऊ शकतो अशी शक्यत वर्तवली जात आहे.

यूएस फेडरल रिझर्व्ह
यूएस फेडरल रिझर्व्ह
author img

By

Published : Jun 16, 2022, 7:40 PM IST

नवी दिल्ली - अमेरिकेतील वाढत्या महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी यूएस फेडरल रिझर्व्हने व्याजदरात वाढ केली आहे. यूएस फेडरल रिझर्व्हने व्याजदरात (75)बेसिस पॉइंट्स किंवा (0.75)टक्के वाढ केली आहे. ( US Federal Reserve ) या बातमीने भारतीय बाजारालाही धक्का बसू शकतो. भारतीय चलन रुपया आणखी खाली जाऊ शकतो अशी शक्यत वर्तवली जात आहे.

1994 सालापासून व्याजदरात झालेली सर्वात मोठी वाढ - यूएस फेडरल रिझर्व्हने बुधवारी व्याजदरात वाढ केली, जी (1994)नंतरची सर्वात मोठी वाढ आहे. या वृत्तानंतर जागतिक बाजारात जोरदार हालचाल होऊ शकते. अमेरिकेतील महागाईचा दर वाढत असल्याने फेडने हा निर्णय घेतला आहे. यूएसमध्ये ग्राहक किंमत चलनवाढ (1981)पासून सर्वोच्च पातळीवर पोहोचली आहे आणि ती (8.6)टक्के आहे. अन्न आणि ऊर्जेच्या किमतीत वाढ झाल्यामुळे महागाईत ही वाढ अमेरिकेत दिसून आली आहे.

फेडने आधीच इशारा दिला होता - फेड अधिकाऱ्यांनी व्याजदरात आणखी वाढ करण्याचे संकेत दिले आहेत. कर्ज घेण्यासाठी लोकांच्या व्याजदरात वाढ होण्याचे संकेत यापूर्वीच देण्यात आले होते आणि त्याच धर्तीवर व्याजदरात ही वाढ करण्यात आली आहे. या दरवाढीचा अमेरिकन शेअर बाजारावर काय परिणाम होईल यावर लक्ष ठेवणार असल्याचेही फेडने म्हटले आहे.

अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेने व्याजदरात 0.75 टक्क्यांनी वाढ करून स्पष्ट केले आहे, की वाढत्या महागाईचा दर येथे खाली आणण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. दर वाढवण्याच्या आपल्या निवेदनात, मध्यवर्ती बँकेने स्पष्टपणे सांगितले की महागाई दर 2 टक्क्यांवर आणण्यासाठी ती कठोर पावले उचलेल. फेडने असेही स्पष्ट केले आहे, की अमेरिकेत येत्या काही दिवसांत अर्थव्यवस्था मंदावू शकते. इतकेच नाही तर देशातील बेरोजगारीचा दरही आणखी वाढू शकतो.

भारतीय बाजारांवर कसा होईल वाईट परिणाम - यूएस फेडरल रिझर्व्हच्या दरात वाढ झाल्यामुळे भारतीय बाजारांवरही वाईट परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण होऊ शकते. फेडने दर वाढवल्यानंतर डॉलरच्या दरात मोठी वाढ दिसू शकते आणि रुपयाची घसरण आणखी खोल होऊ शकते. एवढेच नाही तर भारताची मध्यवर्ती बँक रिझर्व्ह बँक ऑफ इंडियावरही धोरणात्मक व्याजदर वाढवण्याचा दबाव असू शकतो.

हेही वाचा - Rahul Gandhi: सोमवारपर्यंत चौकशी पुढे ढकलण्याची राहुल गांधी यांची ED'कडे मागणी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.