ETV Bharat / bharat

A Tunnel Found In Samba : जम्मू काश्मीरच्या सांबा मध्ये पाकिस्तानी सीमेवर सापडला बोगदा

author img

By

Published : May 5, 2022, 8:58 AM IST

बीएसएफ- बॉर्डर सिक्युरिटी फोर्स (border security force) ने बुधवारी जम्मू आणि काश्मीरच्या सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेजवळ (international border) एक भूमिगत बोगदा (underground Tunnel ) शोधून काढला, ज्याचा वापर दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदच्या (Jaish-e-Mohammed) दोन आत्मघाती हल्लेखोरांनी केल्याचा संशय आहे. गेल्या दशकात अशा बोगद्यांची संख्या 11 झाली आहे. गेल्या वर्षी,हिरानगर सेक्टरमध्ये सैन्याने जानेवारीमध्ये दोन बोगदे शोधले होते.

A tunnel was found at Samba
सांबा येथे बोगदा सापडला

जम्मू: बीएसएफला (border security force) बुधवारी जम्मू आणि काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात एक संशयित भूमिगत सीमा ओलांडणारा बोगदा सापडला. सुरक्षा दलांनी जैश-ए-मोहम्मद (Jaish-e-Mohammed) संघटनेच्या दोन आत्मघाती हल्लेखोरांना पंधरा दिवसांपूर्वी पाकिस्तानातून घुसखोरी करताना ठार केले तेव्हा हा बोगदा सापडला आहे. बीएसएफ उपमहानिरीक्षक एसपीएस संधू यांनी सांगितले की, सांबा येथील कुंपणाजवळील एका सामान्य भागात हा संशयास्पद बोगदा सापडला.

A tunnel was found at Samba
सांबा येथे बोगदा सापडला

बीएसएफ जम्मूचे जनसंपर्क अधिकारी संधू यांनी सांगितले की अंधारामुळे अधिक शोध घेणे शक्य झाले नाही. सकाळच्या उजेडात तपशीलवार शोध घेतला जाईल. त्यांनी संशयास्पद बोगद्याचे काही फोटोही शेअर केले आहेत. तथापि, बीएसएफच्या सूत्रांनी सांगितले की, चक फकिरा येथील सीमा चौकी परिसरात संध्याकाळी 5.30 वाजता सुरुंगविरोधी कारवाईदरम्यान सैन्याने संशयास्पद बोगदा शोधून काढला. एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, पाकिस्तानी चौकी चमन खुर्द (फियाज) समोर, आंतरराष्ट्रीय सीमेपासून 150 मीटर अंतरावर आणि सीमेच्या कुंपणापासून 50 मीटर अंतरावर नव्याने खोदलेला बोगदा शोधण्यात आला आहे. जो भारतीय बाजूपासून 900 मीटर अंतरावर आहे.

A tunnel was found at Samba
सांबा येथे बोगदा सापडला

सूत्रांनी सांगितले की, सुंजवान चकमकीत सहभागी असलेल्या दहशतवादी साथीदारांच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीच्या आधारे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गेल्या महिन्यात जम्मू दौऱ्याच्या दोन दिवस आधी, आम्ही सांबा जिल्ह्यात पाकिस्तानातून येणाऱ्या दहशतवाद्यांचा पिकअप पॉईंट ओळखू शकलो. या बोगद्याबाबत तब्बल दोन आठवडे शोध घेतल्यानंतर आज तो सापडला आहे. असा आणखी एक बोगदा असण्याची शक्यता नाकारता येत नाही. ते म्हणाले की त्याची सुरुवात सीमा चौकी चक फकिरा पासून सुमारे 300 मीटर आणि शेवटच्या भारतीय गावापासून 700 मीटर अंतरावर आहे.

जम्मूच्या सुंजवान भागात 22 एप्रिल रोजी झालेल्या चकमकीनंतर बीएसएफने आंतरराष्ट्रीय सीमेवर (आयबी) बोगदे शोधण्यासाठी मोठ्या प्रमाणावर ऑपरेशन सुरू केले आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (CISF) जवानांना घेऊन जाणाऱ्या बसवर हल्ला केल्यानंतर आत्मघाती जॅकेट घातलेल्या जैश-ए-मोहम्मदच्या दोन सशस्त्र दहशतवाद्यांना चकमकीत ठार करण्यात आले. गेल्या दशकात सापडलेल्या अशा बोगद्यांची संख्या 11 झाली आहे. गेल्या वर्षी, कठुआ जिल्ह्यातील हिरानगर सेक्टरमध्ये सैन्याने जानेवारीमध्ये दोन बोगदे शोधून काढले होते.

BSF soldiers on Indo Pak border : भारत-पाक सीमेवर जवानांची सहनशक्ती पाहा.. कडक उन्हात ठेवलेला पापड एका मिनिटात भाजतो!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.