मुंबई - जागतिक शेअर बाजारातून चांगले संकेत मिळत आहेत. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी आज (शुक्रवारी) भारतीय शेअर बाजाराची (शेअर मार्केट इंडिया) सुरुवात तेजीने झाली. आज सकाळी 9.16 वाजता मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 442.07 अंकांनी (0.81 टक्के) वाढून 54,694.60 वर पोहोचला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 138.30 अंकांनी (0.86 टक्क्यांनी) वाढून 16,308.50 वर व्यवहार करत आहे.
आज आशियाई बाजारात संमिश्र व्यवहार दिसत आहे. त्यामुळे SGX निफ्टीने 85 अंकांची उसळी घेतली आहे. निक्केई 0.63 टक्क्यांनी वाढून 26,772.84 वर आहे. तर, स्ट्रेट्स टाइम्सने 0.42 टक्क्यांनी उसळी घेतली. तैवानचा बाजार 1.64 टक्क्यांनी वाढून 16,231.47 वर गेला. याशिवाय हँग सेंग 2.90 टक्क्यांनी वाढून 20,700.15 वर व्यवहार करत आहे. तर कोस्पी 0.86 टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करत आहे. शांघाय कंपोझिट देखील 0.52 टक्क्यांनी वाढून 3,139.50 वर पोहोचला.
आज बाजाराची स्थिती कशी असेल बाजारात प्रचंड अस्थिरता असेल, हे लक्षात घेऊन गुंतवणूकदारांनी सावध राहण्याची गरज असल्याचे हेम सिक्युरिटीजचे मोहित निगम यांनी सांगितले. यूएस फेड आणि आरबीआयचे जूनमधील निर्णय शॉर्ट टर्ममध्ये बाजाराची दिशा ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतील असेही ते म्हणाले. निफ्टीला 16000 वर सपोर्ट तर 16400 वर रझिस्टन्स दिसत आहे. दुसरीकडे, बँक निफ्टीला 34500 वर सपोर्ट आणि 35500 वर रझिस्टन्स दिसत आहे.
गुरुवारी शेवटच्या तासात बाजारात चांगले शॉर्ट कव्हरिंग दिसले, ज्यामुळे सेन्सेक्स-निफ्टी 3 दिवसांच्या घसरणीतून सावरत हिरव्या चिन्हात बंद झाल्याचे कोटक सिक्युरिटीजचे श्रीकांत चौहान म्हणाले. यूएस FOMC चे मिनिट्स आलेत. बाजार आता संभाव्य दर वाढीसाठी सज्ज दिसत आहे. त्यामुळे एफएँडओ एक्स्पायरीच्या दिवशी जोरदार खरेदी झाली. उच्च चलनवाढीचा दर, सतत FII विक्री-ऑफ, यूएस-युक्रेन संघर्ष यामुळे आम्ही अधूनमधून विक्री दिसेल असेही ते म्हणाले.
आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?
- टाटा स्टील (TATASTEEL)
- अपोलो हॉस्पिटल (APOLLOHOSP)
- जेएसडब्ल्यू स्टील (JSWSTEEL)
- एचडीएफसी बँक (HDFCBANK)
- ए यू बँक (AUBANK)
- भारतीय कंटेनर निगम (CONCOR)
- ऑरो फार्मा (AUROPHARMA)
- श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स लिमिटेड (SRTRANSFIN)
- एम फॅसिस (MPHASIS)
हेही वाचा - देशाचे 'रोडकरी' नेते नितीन गडकरी यांचा वाढदिवस, अरुंद रस्त्याच्या महालातील गडकरी कसे झाले देशाचे नेते