ETV Bharat / bharat

Today Stock Market : शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स 651 अंकांनी वधारला - What is the stock market today?

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या रेपो दरात वाढ करण्याच्या निर्णयानंतर देशांतर्गत शेअर बाजार घसरला होता. NSE निफ्टी 185.65 अंकांनी वाढून 16,863.25 वर पोहोचला आहे. ( Today Stock Market News) सेन्सेक्समध्ये टेक महिंद्रा, टाटा स्टील, इन्फोसिस, स्टेट बँक ऑफ इंडिया, कोटक महिंद्रा बँक आणि एमअँडएम हे आघाडीवर होते. दुसरीकडे, नेस्ले आणि टायटन लाल तेजीत होते.

Today Stock Market
Today Stock Market
author img

By

Published : May 5, 2022, 1:12 PM IST

मुंबई - अमेरिकन बाजारातील लक्षणीय वाढ आणि इन्फोसिस, टाटा स्टील आणि स्टेट बँक ऑफ इंडिया यांसारख्या बड्या समभागांमध्ये वाढ झाल्यामुळे सेन्सेक्स गुरुवारी 651 अंकांवर वाढला आहे. (What Is The Stock Market Today?) मागील सत्रात बुधवारी सेन्सेक्समध्ये मोठी घसरण झाली होती. या दरम्यान, 30 शेअर्सचा बीएसई सेन्सेक्स सुरुवातीच्या व्यवहारात 650.9 अंकांनी वाढून 56,319.93 अंकांवर पोहोचला. तर, NSE निफ्टी 185.65 अंकांनी वाढून 16,863.25 वर पोहोचला आहे. सेन्सेक्समध्ये टेक महिंद्रा, टाटा स्टील, इन्फोसिस, स्टेट बँक ऑफ इंडिया, कोटक महिंद्रा बँक आणि एमअँडएम हे आघाडीवर होते. दुसरीकडे, नेस्ले आणि टायटन लाल तेजीत होते.

रिझर्व्ह बँकेने रेपो दरात वाढ करण्याचा निर्णय घेतल्यानंतर बुधवारी देशांतर्गत शेअर बाजारात घसरण झाली. मुख्यत: महागाई नियंत्रणात आणण्यासाठी मध्यवर्ती बँकेने रेपो दर 0.40 टक्क्यांनी वाढवून 4.40 टक्के करण्याचा निर्णय घेतला. शेवटच्या ट्रेडिंग सत्रात 30 शेअर्सवर आधारित बीएसई सेन्सेक्स 1,306.96 किंवा 2.29 टक्क्यांनी घसरून 55,669.03 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 391.50 अंकांनी म्हणजेच 2.29 टक्क्यांनी घसरून 16,677.60 वर बंद झाला आहे.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय तेल मानक ब्रेंट क्रूड 0.48 टक्क्यांनी वाढून $110.67 प्रति बॅरल झाले. शेअर बाजाराच्या तात्पुरत्या आकडेवारीनुसार, विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी बुधवारी निव्वळ आधारावर 3,288.18 कोटी रुपयांच्या समभागांची विक्री केली आहे.

हेही वाचा - Prashant Kishore PC: तुर्तास पक्ष नाही! वाचा, पत्रकार परिषदेत काय म्हणाले प्रशांत किशोर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.