श्रीनगर ( जम्मू काश्मीर ) : दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील गोंगू क्रॉसिंगजवळ रविवारी दुपारी अतिरेक्यांनी संयुक्त नाका पार्टीवर हल्ला केल्याने ( Pulwama militant attack ) जखमी झालेल्या सीआरपीएफच्या सहाय्यक उपनिरीक्षकाचा मृत्यू झाला. "दहशतवाद्यांनी जवळच्या सफरचंदाच्या बागेतून गंगू क्रॉसिंग पुलवामा येथे नाका पार्टीवर गोळीबार केला. या दहशतवादी घटनेत 01 सीआरपीएफ जवान एएसआय विनोद कुमार गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले जेथे ते शहीद ( CRPF trooper Killed ) झाले. परिसराची नाकाबंदी करण्यात आली असून दहशतवाद्यांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, अज्ञात अतिरेक्यांनी गंगू येथे सर्कुलर रोडवर पोलीस आणि CRPF च्या संयुक्त नाका पार्टीवर गोळीबार केला ज्यात 182 Bn CRPF चे ASI विनोद कुमार जखमी झाले आणि त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले, जिथे त्यांचा मृत्यू झाला.
परिसराची नाकेबंदी : या घटनेत सीआरपीएफच्या एका जवानाला गोळी लागली आणि त्यानंतर त्याला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले. हल्लेखोरांना पकडण्यासाठी सुरक्षा दलांनी परिसराची नाकेबंदी केली आहे.
बातमी अपडेट होत आहे..
हेही वाचा : Militant Killed in Encounter : अवंतीपुरातील चकमकीत दोन अतिरेकी ठार