ETV Bharat / bharat

हैदराबाद महापालिका निवडणुकीत तेलंगणा मराठा मंडळाचा टीआरएसला पाठिंबा; प्रचारातही आघाडी - निवडणुकीत मराठा मंडळ

हैदराबाद महानगर पालिका निवडणुकांची रणधुमाली सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर येथील तेलंगणा मराठा मंडळाने सत्ताधारी असलेल्या तेलंगणा राष्ट्र समितीला पाठिंबा जाहीर केला आहे.

तेलंगणा मराठा मंडळाचा टीआरएसला पाठिंबा
तेलंगणा मराठा मंडळाचा टीआरएसला पाठिंबा
author img

By

Published : Nov 27, 2020, 9:24 PM IST

Updated : Nov 27, 2020, 9:39 PM IST

हैदराबाद - तेलंगणा राज्याची राजधानी असलेल्या हैदराबादमध्ये सध्या महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. 150 जागेसाठी 1 डिसेंबरला मतदान होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून उमेदवारांच्या प्रचाराला रंगत चढली आहे. दरम्यान, या प्रचारात येथील मराठी भाषिक नागरिकांचा दबदबा दिसून येत आहे.

हैदाराबाद महानगर पालिकेच्या निवडणुकांचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. निजामांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हैदराबाद शहरात जवळपास 300 वर्षापासून मराठी भाषिक कुटुंबं वास्तव्यास आहेत. सद्यस्थितीत हैदरबाद शहरात जवळपास 6 लाख मराठी भाषिक मतदार आहेत. विशेषतः गवळीगुडा, काचीगुडा, दिलसुखनगर, सुलतान बाझार, शाहअलीबंडा, नल्लाकुंटा, बरकतपुरा या भागात मराठी भाषिकांचे वास्तव्य मोठ्या संख्येने दिसून येते. या मराठी लोकांना जोडून ठेवणारी तेलंगणा मराठा मंडळ ही संघटना वेगवेगळ्या पद्धतीने येथील राजकारणात आणि समाजकारणात सक्रिय राहते. त्याच प्रमाणे आता हैदराबाद महापालिकेच्या निवडणुकीतही मराठी नागरिकांचा दबदबा दिसून येत आहे.

टीआरएसला पाठिंबा-

तेलंगणा मराठा मंडळाचा या निवडणुकीत तेलंगणा राष्ट्र समिती या पक्षाला पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. तसेच मराठा मंडळाकडून टीआरएस उमेदवारांच्या प्रचाराची धुराही संभाळण्यात येत आहे. तेलंगणा प्लॅनिंग बोर्डचे व्हाईस चेअरमन बी विनोद कुमार यांच्याकडे तसे पाठिंब्याचे पत्र देऊन तेलंगणा मराठा मंडळाने आपला पाठिंबा जाहीर केला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठा मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटील यांच्यासह लक्ष्मिकांत शिंदे, निवास निकम, मदन पाटील यांच्यासह सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते हैदरबादमध्ये विभागवार जाऊन कॉर्नर सभा, बैठकांचे आयोजन करून महापालिका निवडणुकीचा प्रचार करत आहेत.

हैदराबाद शहरात वास्तव्याला असलेल्या मराठी भाषिकांमध्ये चहा विक्रते ते डॉक्टर वकील आणि शिक्षण क्षेत्रात अशा मोठ्या पदावर काम करणारे पाहायला मिळतात. या मतदारांपर्यंत पोहोचून त्यांना मराठी भाषेतूनच संवाद साधत मतदानाचे महत्व पटवून देण्याचे कार्य मराठा मंडळाकडून केले जात असल्याची माहिती मंडळाचे उपाध्यक्ष निवास निकम यांनी दिली.

तेलंगणा मराठा मंडळाचा टीआरएसला पाठिंबा
तेलंगणा मराठा मंडळाचा टीआरएसला पाठिंबा

हैदराबादमध्ये आरके पुरम, अत्तापूर, मेहंदीपट्टनम, रंगारेड्डी नगर, एलबीनगर या भागात जाऊन मराठा मंडळाच्या वतीने प्रचार करण्यात येत आहे. यामध्ये मारुतीराव गायकवाड, संतोष कुमार हिंगोलीकर, यांच्यासह असंख्य मराठी कार्यकर्ते वेगवेगळ्या भागात जाऊन मराठी भाषिकांना मतदान करण्याचे आवाहन करत आहेत.

टीआरएसची सत्ता, भाजपला ४ जागा

ग्रेटर हैदराबाद म्युनिसिपल कॉर्पोरेशनमध्ये एकूण 150 जागांसाठी एक डिसेंबरला मतदान होणार आहे. गेल्या निवडणुकीतील परिस्थितीचा आढावा घेतला असता, यामध्ये टीआरएस 99 जागेवर विजयी होऊन महापौरपदावर शिक्का मोर्तब केला. तर त्या निवडणुकीत भाजपला फक्त ४ जागेवर विजय मिळवता आला. आणि ओवैसी यांच्या एमआयएमला 44 जागा मिळाल्या होत्या. भाजप यावेळी हैदराबाद महानगर पालिका निवडणूक जिंकण्याच्या भूमिकेतून मैदानात उतरली आहे.

Last Updated : Nov 27, 2020, 9:39 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.