ETV Bharat / bharat

Meat Lovers Survey : नॉनव्हेज खाण्यात तेलंगाणा देशात नंबर वन, महाराष्ट्र 15 व्या स्थानी

एका अभ्यासानुसार तेलंगणा हे देशातील सर्वाधिक मांस खाणारे ( Meat Lovers ) राज्य आढळून ( Telangana is Most Meat Consuming State ) आले आहे. गेल्या काही काळात या राज्यात मांसाचा वापर ( Increase in Meat Consumption ) प्रचंड वाढला आहे. शेळीच्या ( Meat Consumption in Telangana State has Increased Tremendously ) मांसाची मागणी सर्वसामान्यांमध्ये वाढत असल्याने प्रतिकिलो मांसाचा भावही ८०० रुपयांवरून १०८० रुपयांपर्यंत वाढला आहे.

Meat Lovers Survey
तेलंगणा हे देशातील सर्वाधिक मांस खाणारे राज्य
author img

By

Published : Nov 28, 2022, 6:48 PM IST

हैदराबाद : एका अभ्यासानुसार तेलंगणा हे देशातील सर्वाधिक मांस खाणारे ( Meat Lovers ) राज्य ( Telangana is Most Meat Consuming State ) आहे. गेल्या काही काळात राज्यात मांसाचा वापर प्रचंड वाढला ( Increase in Meat Consumption ) आहे. राज्यातील लोकांच्या खाण्याच्या सवयी बदलत आहेत. जिथे एका ( Meat Consumption in Telangana State has Increased Tremendously ) आठवड्यात फक्त 2-3 मांसाहारी जेवण खाल्ले जाते. शेळीच्या मांसाची मागणी सर्वसामान्यांमध्ये वाढत असल्याने प्रतिकिलो मांसाचा भावही ८०० रुपयांवरून १०८० रुपयांपर्यंत वाढला आहे.

तेलंगणामध्ये देशात सर्वाधिक मांसाहार करणाऱ्यांची झली नोंद : गेल्या चार वर्षांत राज्यात 9.75 लाख टन मेंढ्या आणि शेळीच्या मांसाचे उत्पादन आणि विक्री झाली. सरासरी 600 रुपये प्रति किलो असा हिशोब केला, तर राज्यातील नागरिकांनी मांसाहारावर 58,500 कोटी रुपये खर्च केले आहेत. नॅशनल रिसर्च सेंटर ऑन मीटने केलेल्या अभ्यासात असे दिसून आले आहे की, मेंढी आणि बकरीचे एक किलो मांस सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात 600 रुपयांना मिळत असले तरी राज्यातील किरकोळ बाजारात ते 1000 रुपयांपर्यंत विकले जात आहे.

Meat Lovers Survey
तेलंगणा हे देशातील मांसाहारात अग्रेसर राज्य

महाराष्ट्र 15 व्या नंबरवर : केंद्र शासनाच्या 21 राज्यांच्या एका सर्व्हेमध्ये मांसाहार खाण्यात तेलंगणा अग्रेसर असल्याचे आढळले. तर महाराष्ट्र यामध्ये 15 व्या नंबरवर ( Maharashtra is at Number 15 in Meat Lovers ) आहे. महाराष्ट्रामध्येसुद्धा मासेमारी, मेंढीपालन, शेळीचे पालन हे उद्योग व्यवसाय आहेत. परंतु, मांसाहार करण्याचे प्रमाण इतर राज्यांच्या तुलनेत कमी आहे. महाराष्ट्रात अधिक करून लोक शाकाहाराला पसंती देत असल्याचे निदर्शनास आले.

देशातील सर्वात जास्त मेंढ्यांची संख्या तेलंगणामध्ये : तेलंगणामध्ये मेंढ्यांची संख्या ९० लाख कोटींहून अधिक आहे. मांसाच्या वाढत्या मागणीमुळे मेंढ्या-मेंढ्यांनी भरलेल्या सुमारे 80 ते 100 लॉरीज दररोज तेलंगणात पोहोचत असल्याचे समोर आले आहे. तेलंगणा राज्य मेंढी आणि शेळी विकास सहकारी फेडरेशन लिमिटेडने मेंढ्यांची पैदास, त्यांची विक्री आणि राज्यातील मांसाची वाढती मागणी यावर अभ्यास केला आहे. मांसाची वाढती मागणी आणि मेंढीपालनाचे महत्त्व यावर एक सर्वसमावेशक अहवाल सरकारला सादर करण्यात आला.

या अहवालानुसार : तेलंगणात 2015-16 मध्ये मेंढी आणि शेळीच्या मांसाचे उत्पादन 1.35 लाख टन होते. तर 2020-21 पर्यंत ते 3.03 लाख टन इतके वाढले आहे. 2022 मध्ये 3.50 लाख टनांहून अधिक विक्री होईल असा अंदाज आहे. लोक मांसाच्या वापरावर 31 हजार कोटींहून अधिक खर्च करतील. पुढील वर्षअखेरीस या मांस बाजाराचे मूल्य ३५ हजार कोटी रुपयांवर पोहोचेल, असे संकेत आहेत.

देशात मेंढ्या आणि शेळीच्या मांसाचा दरडोई वार्षिक वापर केवळ 5.4 किलो : भारतात, मेंढ्या आणि शेळीच्या मांसाचा दरडोई वार्षिक वापर केवळ 5.4 किलो आहे. परंतु, तेलंगणाने 21.17 किलोग्रॅमची सर्वोच्च पातळी गाठली आहे. मेंढ्या वितरण योजनांमुळे रु.7920 कोटींची नवीन संपत्ती निर्माण झाल्याचे महासंघाने स्पष्ट केले आहे. 82.74 लाख मेंढ्या इतर राज्यांतून विकत घेऊन गोल्ला आणि कुरुमा समुदायांना वाटण्यात आल्या आणि 1.32 कोटी कोकरू जन्माला आले. या माध्यमातून वार्षिक उत्पादनात एक लाख अकरा हजार टनांनी वाढ झाली आहे.

तेलंगणातून इतर राज्यांतील तामिळनाडू, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील व्यापारी करतात मेंढ्या आणि बकरींची खरेदी : सध्या, तामिळनाडू, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील मांस व्यापारी रविवारी तेलंगणातून मेंढ्या आणि बकऱ्या खरेदी करीत आहेत. फेडरेशनचे अध्यक्ष, दुडीमेटला बलराजू यांनी 'ईटीव्ही भारत'ला सांगितले की, सरकारने दुसऱ्या टप्प्यात 6125 कोटी रुपये खर्चून गोल्ला आणि कुरुमा समुदायातील 3.50 लाख लोकांना 73.50 लाख मेंढ्या वितरित करण्याच्या योजनेला मंजुरी दिली आहे. ते पुढे म्हणाले की, लोकांना दर्जेदार मांसाची विक्री करण्यासाठी महासंघाच्या वतीने थेट विक्री केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.