ETV Bharat / bharat

Telangana Formation Day 2023 : वेगळे राज्य झाल्यानंतर तेलंगाणाचा दशकपूर्ती सोहळा, जाणून घ्या कोणते होणार कार्यक्रम

आंध्र प्रदेशातून वेगळे झालेल्या तेलंगाणा राज्य आता दशकपूर्ती सोहळा साजरा करत आहे. तेलंगाणा राज्याची निर्मिती 2 जून 2014 मध्ये केंद्र सरकारने केली होती. या राज्याच्या मागणीसाठी तेलंगाणा राष्ट्र समितीने मोठा लढा उभारला होता.

Telangana Formation Day 2023
संपादित छायाचित्र
author img

By

Published : Jun 2, 2023, 7:31 AM IST

Updated : Jun 2, 2023, 8:07 AM IST

हैदराबाद : वेगळे राज्य झाल्यानंतर तेलंगाणा राज्याने देशभरात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वात तेलंगाणा राज्याने मोठ्या प्रमाणात विकासही केला आहे. आज दशकपूर्ती सोहळ्यासाठी तेलंगाणा राज्य सज्ज झाले आहे. वेगळ्या राज्याच्या निर्मितीला नऊ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त राज्यभर भव्य सोहळा होणार आहे. मुख्यमंत्री चंद्रशेखर राव आज सचिवालयात या सोहळ्याचे उद्घाटन करणार आहेत. राज्यभरातील गावोगावात २१ दिवस दररोज एका क्षेत्राशी संबंधित कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.

तीन आठवडे विशेष सोहळा : 2 जून 2014 रोजी अस्तित्वात आलेल्या तेलंगाणा राज्य आपला दशक सोहळा साजरा करत आहेत. राज्य दहाव्या वर्षात पदार्पण करत असताना राज्य सरकारने तीन आठवडे हा विशेष सोहळा साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचे उद्घाटन मुख्यमंत्री केसीआर आज सचिवालयात करणार आहेत.

असा असेल कार्यक्रम : मुख्यमंत्री चंद्रशेखर राव हे सकाळी गनपार्क येथील शहीद स्तूपावर श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर सचिवालयात उत्सव सुरू करतील. राष्ट्रध्वज फडकवून पोलीस दलाकडून मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांना सलामी दिली जाईल. त्यानंतर केसीआर श्रोत्यांना संबोधित करतील. या कार्यक्रमाला एकूण 15 हजार नागरिकांना बसण्यासाठी खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. हैदराबादमधील टँक बंदवर शहीदांच्या स्मरणार्थ कलाकारांसोबत मोठी रॅली काढण्यात येणार आहे. राज्यभरात तीन आठवडे होणार्‍या उत्सवासाठी राज्य सरकारने १०५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. जिल्ह्याचे क्षेत्रफळ व लोकसंख्या यानुसार संबंधित जिल्ह्यांना निधीचे वाटप करण्यात आले आहे.

नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ठोकले तंबू : सचिवालयातील कर्मचारी आणि महापालिकेतील GHMC कर्मचारी आणि अधिकारी या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. त्यांच्यासाठी 300 बसची खास व्यवस्था करण्यात आली आहे. पाऊस आणि उन्हाचा त्रास होऊ नये, यासाठी तंबू ठोकण्यात आले आहेत. या उद्घाटन कार्यक्रमासाठी 1.80 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. सर्व विभागप्रमुखांना सकाळी साडेसात वाजता त्यांच्या कार्यालयात राष्ट्रध्वज फडकवून सचिवालय गाठण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

योजनांच्या लाभार्थ्यांचा होणार सत्कार : राजधानीसह सर्व जिल्ह्यांतील कार्यालये, ऐतिहासिक वास्तू, मुख्य चौक या उत्सवानिमित्त विद्युत रोषणाईने सजवण्यात आले आहेत. या महिन्याच्या 22 तारखेपर्यंत 21 दिवस राज्यभरात दशकपूर्ती सोहळा होणार आहे. प्रत्येक क्षेत्रासाठी प्रत्येक दिवसाचे वाटप केले जाईल आणि त्या क्षेत्रातील नऊ वर्षांची प्रगती स्पष्ट केली जाईल. सर्व स्तरातील नागरिक, विविध शासकीय कार्यक्रम व योजनांचे लाभार्थी यांचा सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. शेवटच्या दिवशी 22 जून रोजी हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे.

काय आहे तेलंगाणाचा इतिहास : आंध्र प्रदेशातून तेलंगाणा या राज्याची निर्मिती 2 जू 2014 ला करण्यात आली आहे. तेलंगाणा हा आंध्र प्रदेशातील समृद्ध भाग मानला जातो. मात्र हैदराबाद आणि त्याच्या शेजारील परिसराला तेंलिगा, त्रिलिंग आणि तेलिंगाण असे संबोधले जायचे. तेलंगाणा वेगळे राज्य व्हावे, यासाठी तेलंगाणा राष्ट्र समितीने अनेक वर्ष लडा दिला आहे. अखेर केंद्र सरकारने 9 डिसेंबर 2009 रोजी तेलंगाणा हे वेगळे राज्य होणार असल्याचे जाहीर केले. तेलंगाणा राज्याच्या भूभाग हा मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर कर्नाटकच्या सीमेला लागून आहे. या राज्याचे मुख्य पीक भात असून

Last Updated : Jun 2, 2023, 8:07 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.