नवी दिल्ली - तेलंगणामध्ये कॉंग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. एआयसीसी सदस्य आणि तेलंगणा कॉंग्रेसचे कोषाध्यक्ष गुडुर नारायण रेड्डी यांनी राजीनामा दिला आहे. या संदर्भात त्यांनी कॉंग्रेस प्रमुख सोनिया गांधी यांना पत्र लिहिले आहे. रेड्डी जवळपास चार दशकांपासून कॉंग्रेसमध्ये सक्रिय होते. दरम्यान, गुडुर नारायण रेड्डी यांनी भाजपात प्रवेश केला आहे. दिल्लीत पक्षाध्यक्ष जेपी नड्डा यांच्या उपस्थितीत त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
विद्यार्थी जीवनापासून ते आजपर्यंत कॉंग्रेस पक्षाची सेवा-
गुडुर नारायण रेड्डी यांनी सोमवारी सोनिया गांधी यांना पत्र लिहले. गुडुर नारायण रेड्डी म्हणाले की, त्यांनी 1981 मध्ये विद्यार्थी जीवनापासून ते आजपर्यंत कॉंग्रेस पक्षाची सेवा केली आहे. त्यांनी तेलंगणा कॉंग्रेसचे कोषाध्यक्ष, एआयसीसी सदस्य आणि पक्षाचे प्राथमिक सदस्यता या पदाचा राजीनामा देत असल्याचे पत्रात म्हटले आहे.
विजयशांती यांनीही दिला राजीनामा-
यापूर्वी तेलंगणामध्ये अभिनेत्री ते राजकारणी असा प्रवास करणाऱ्या विजयशांती यांनीही कॉंग्रेसला पक्षातून राजीनामा दिला. ते सुद्धा भाजपात जाणार आहेत. त्यांनी रविवारी गृहमंत्री अमित शहा आणि गृह राज्य मंत्री जी. कृष्ण रेड्डी यांची भेट घेतली होती.
हेही वाचा- 'भारत बंद'ला अण्णा हजारेंचा पाठिंबा; कृषी आयोग लागू करण्याची अण्णांची मागणी