ETV Bharat / bharat

Tantra mantra to alive dead man: डॉक्टरांनी मृत घोषित केलेल्या व्यक्तीला तंत्र-मंत्राने जिवंत करण्याच अघोरी प्रकार - Tantra mantra to alive dead man

उत्तर प्रदेशात मैनपुरीमध्ये 30 तास हाय व्होल्टेज ड्रामा पाहण्यात आला. येथे डॉक्टरांनी मृत घोषित केलेल्या तरुणाला जिवंत करण्यासाठी तंत्र-मंत्र करण्यात आले. शेवटी मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

डॉक्टरांनी मृत घोषित केलेल्या व्यक्तीला तंत्र-मंत्राने जिवंत करण्याच अघोरी प्रकार

author img

By

Published : Jul 25, 2022, 12:26 PM IST

Updated : Jul 25, 2022, 12:37 PM IST

मैनपुरी: उत्तर प्रदेशातील या जिल्ह्यातील मृत तरुणाला जिवंत करण्यासाठी 30 तास मांत्रिकांनी खटपट केली. त्यासाठी ढोल-ताशे आणण्यात आले. या तरुणाचा सापाने चावा घेतला होता. त्याच जातीचा साप पकडून आणण्यात आला. मृतदेहाजवळ केळी आणि कडुलिंबाची पाने ठेवण्यात आली होती. अनेक तांत्रिकांनी तासनतास तिथे तंत्रमंत्राचा उपचार केला. यानंतरही तो तरुणाला जिवंत करू शकले नाहीत.

डॉक्टरांनी मृत घोषित केलेल्या व्यक्तीला तंत्र-मंत्राने जिवंत करण्याच अघोरी प्रकार

डॉक्टरांनी मृत घोषित केले - हे संपूर्ण प्रकरण मैनपुरीच्या जाटवान मोहल्लामधील आहे. येथे राहणाऱ्या तालिबला शुक्रवारी रात्री साप चावला. कुटुंबीयांनी त्यांना सैफई रुग्णालयात नेले. जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मात्र कुटुंबीयांनी डॉक्टरांचे म्हणणे मान्य करण्यास नकार दिला.

तांत्रिक आणि सर्पमित्रांना बोलावले: नातेवाईक म्हणाले, "असे नाही. तालिब अजून मेला नाही." त्यानंतर शनिवारी सकाळी 10 वाजता मृतदेह घरी आणला. दूरदूरवरून तांत्रिकांना बोलावण्यात आले. तांत्रिकांनी ढोल-ताशे वाजवले. सापाला पकडण्यासाठी चार सर्पमित्रांना पाचारण करण्यात आले. तसेच कडुलिंब आणि केळीची पाने मागवली. त्यातून तांत्रिकांनी त्यांचा तोडगा केला. त्यासाठी मृतदेह घरासमोर ठेवण्यात आला होता.

पुतण्याचाही सर्पदंशाने मृत्यू - ग्रामस्थांनी सांगितले की तांत्रिकांनी सुमारे 30 तास प्रयत्न केले. परंतु त्या तरुणाला जिवंत करता आले नाही. नंतर ते म्हणू लागले की आता जिवंत करता येणार नाही. शेवटी रविवारी दुपारी चार वाजता तरुणावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तालिब पंजाबमध्ये काम करायचा असे गावकऱ्यांनी सांगितले. तो 10 दिवसांपूर्वी घरी आला होता. रात्री खोलीत झोपला होता, पहाटे त्याच्या हाताला साप चावला. काही दिवसांपूर्वी तालिबच्या 10 वर्षांच्या पुतण्याचाही सर्पदंशाने मृत्यू झाला होता.

Last Updated : Jul 25, 2022, 12:37 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.