हैदराबाद - सोशल मीडियावर एका व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तालिबानी सैन्याने अफगाणिस्तानच्या संसदेत प्रवेश केल्याचे दिसत आहे. तालिबानी सैन्य संसदेच्या इमारतीत शस्त्रे वापरताना या व्हिडीओतून दिसत आहे. दरम्यान, अफगाण नेते अशरफ गणी यांनी संसदेचे संयुक्त सत्र आयोजित केले होते. तेंव्हाचा हा व्हिडीओ असल्याचे बोलले जात आहे. ही इमारत भारताने बांधली आहे.
-
Taliban have entered the Parliament of Afghanistan. This building was built by India.#Kabul #Taliban #Afghanistan #KabulHasFallen pic.twitter.com/BEYowxdstA
— Wajahat Kazmi 🏴 (@KazmiWajahat) August 16, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Taliban have entered the Parliament of Afghanistan. This building was built by India.#Kabul #Taliban #Afghanistan #KabulHasFallen pic.twitter.com/BEYowxdstA
— Wajahat Kazmi 🏴 (@KazmiWajahat) August 16, 2021Taliban have entered the Parliament of Afghanistan. This building was built by India.#Kabul #Taliban #Afghanistan #KabulHasFallen pic.twitter.com/BEYowxdstA
— Wajahat Kazmi 🏴 (@KazmiWajahat) August 16, 2021
मोदींनी केले होते संसदेच उद्घाटन -
भारताने 2009 मध्ये राजधानी काबूलमध्ये 90 दशलक्ष डॉलर्स खर्चून ही इमारत बांधली होती. ही इमारत 100 एकर जागेवर बांधण्यात आली होती. 2015 मध्ये या इमारतीचे उद्धाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. तसेच त्यावेळी मोदींनी अफगाणिस्थान संसदेच्या दोन्ही सभागृहांनाही संबोधित केले होते. ही इमारत भारत-अफगाणिस्थानच्या मैत्रीची साक्ष असल्याचे अफगाणिस्थानचे पंतप्रधान अशरफ गणी यांनी म्हटेल होते. दरम्यान, 2009 मध्ये या इमारतीचे बांधकाम सुरु करण्यात आले होते. तर 2014मध्ये ते पूर्ण करण्यात आले होते.
-
From India to the Heart of Asia. Afghan Parliament ready for a historic address by PM @narendramodi pic.twitter.com/FdlThuIQSj
— Arindam Bagchi (@MEAIndia) December 25, 2015 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">From India to the Heart of Asia. Afghan Parliament ready for a historic address by PM @narendramodi pic.twitter.com/FdlThuIQSj
— Arindam Bagchi (@MEAIndia) December 25, 2015From India to the Heart of Asia. Afghan Parliament ready for a historic address by PM @narendramodi pic.twitter.com/FdlThuIQSj
— Arindam Bagchi (@MEAIndia) December 25, 2015
-
Built by India but nurtured by Afghanistan's indomitable faith in its future. PM arrives at the Afghan Parliament pic.twitter.com/WQfl7tic4Q
— Arindam Bagchi (@MEAIndia) December 25, 2015 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Built by India but nurtured by Afghanistan's indomitable faith in its future. PM arrives at the Afghan Parliament pic.twitter.com/WQfl7tic4Q
— Arindam Bagchi (@MEAIndia) December 25, 2015Built by India but nurtured by Afghanistan's indomitable faith in its future. PM arrives at the Afghan Parliament pic.twitter.com/WQfl7tic4Q
— Arindam Bagchi (@MEAIndia) December 25, 2015
तालिबानने प्रमुख शहरांवर मिळवले नियंत्रण -
दोन दशकांपर्यंत चाललेल्या युद्धानंतर अमेरिकेने आपले पूर्ण सैन्य अफगाणिस्तानातून माघारी बोलावले. यानंतर तालिबानने अफगाणिस्थानवर आपला ताबा मिळवला. बंडखोरांनी पूर्ण देशात परिस्थिती बिघडवून टाकली. येथील स्थानिक सुरक्षादलांनी शरणागती पत्करली. यामुळे काही दिवसांतच तालिबानने देशातील सर्व प्रमुख शहरांवर आपले नियंत्रण मिळवले आहे.
31 ऑगस्टपर्यंत अमेरिकन सैन्य घेणार माघार -
अफगाणिस्तानातून माघार घेण्यासाठी अमेरिकेला एक आठवड्यांचा कालावधी उरलेला आहे. अमेरिका अफगाणिस्तानातून माघार घेत असतानाच तालिबानने अफगाणिस्तानवर संपूर्णपणे ताबा मिळवला आहे. मात्र, अफगाणिस्तानातून सैन्य माघार घेण्यावर बायडेन प्रशासन ठाम आहे. तर अफगाणिस्थानमधील परिस्थितीला तेथील स्थानिक नेते जबाबदार असल्याचे अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडन यांनी म्हटले आहे.
हेही वाचा - अफगाणिस्तानातील परिस्थितीला स्थानिक नेतेच जबाबदार - अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष जो बायडेन