नवी दिल्ली - तालिबानने अफगाणिस्तावर ताबा मिळवला असून देशात अराजकता पसरली आहे. भारत आणि अफगाणिस्तानदरम्यान आतापर्यंतच चांगले द्विपक्षीय संबंध होते. मात्र, आता तालिबानी हातात सत्ता गेल्यानंतर सुरक्षा आणि व्यापार याबाबतीत भारतासाठी अडचणीची परिस्थिती निर्माण झाली. तालिबानने भारतासोबत होत असलेली आयात-निर्यात बंद केली आहे. भारतीय निर्यात संघटना फेडरेशनचे डॉ. अजय सहाय यांनी ही माहिती दिली.
तालिबानने सर्व मालवाहतूक बंद केली आहे. पाकिस्तानमार्गे मालवाहतूक होत असत. तो आता बंद करण्यात आला आहे. आम्ही अफगाणिस्तानमधील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत, जेणेकरून आम्ही पुरवठा पुन्हा सुरू करू शकू. सध्या तालिबान्यांनी आयात -निर्यात बंद केली आहे, असे अजय सहाय म्हणाले.
दोन्ही देशांमध्ये मोठ्या प्रमाणात व्यवसाय -
डॉ.अजय सहाय यांच्या मते, भारत व्यापाराच्या दृष्टीने अफगाणिस्तानचा सर्वात मोठा मित्र आहे. 2021 मध्ये निर्यात 835 मिलियन डॉलर होती. तर 510 मिलियन डॉलरची आयात आहे. आयात आणि निर्यातीव्यतिरिक्त भारताने अफगाणिस्तानातही मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे. ज्यामध्ये सुमारे 400 योजनांमध्ये 3 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक आहे.
सुक्या मेव्याचे भाव वाढू वाढण्याची शक्यता -
सुका मेवा, कांदा इत्यादी अफगाणिस्तामधून आयात केले जाते. अशा स्थितीत येत्या काळात सुक्या मेव्याचे भाव वाढू शकतात. सध्या तालिबानने भारतासोबत चांगले संबंध हवे आहेत, असे जाहीर आहेत. सध्या व्यापार बंद झाल्यामुळे दोन्ही देशांमध्ये समस्या निर्माण झाल्या आहेत. पण, सरकार स्थापन झाल्यानंतर सर्व काही स्पष्ट होईल, असे तालिबानच्या प्रवक्त्याने आपल्या पत्रकार परिषदेत म्हटले होते.
हेही वाचा - Sher Mohammad Abbas Stanekzai: तालिबानच्या प्रमुख नेत्याचे उत्तराखंडच्या भारतीय लष्करी अकादमीशी जुने संबंध
हेही वाचा - '...तर गंभीर परिणाम भोगावे लागतील'; अफगाण तालिबानचा भारताला इशारा
हेही वाचा - धक्कादायक! ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या प्रवक्त्याचे तालिबानला समर्थन