ETV Bharat / bharat

Taj Mahal Security Lapse: ताजमहालच्या सुरक्षेत मोठी चूक.. अमेरिकन कंपनीने परिसरातच केले 'असं' काही

Taj Mahal Security Lapse अमेरिकन कंपनीने गुरुवारी ताजमहाल येथे श्रवणयंत्राची जाहिरात केली. या संदर्भात एएसआय आणि सीआयएसएफकडून अहवाल मागवण्यात आला आहे. ताजमहालमध्ये प्रमोशनल अॅक्टिव्हिटींवर Promotional Activity at Taj Mahal बंदी असतानाही नियमांची पायमल्ली करून जाहिरात शूट करण्यात आली.

TAJ MAHAL SECURITY LAPSE AMERICAN COMPANY LAUNCHED HEARING AID IN PREMISES
ताजमहालच्या सुरक्षेत मोठी चूक.. अमेरिकन कंपनीने परिसरातच केले 'असं' काही
author img

By

Published : Sep 16, 2022, 2:02 PM IST

आग्रा: Taj Mahal Security Lapse ताजमहाल येथे स्टारकी या अमेरिकन कंपनीच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी कंपनीचे नवीन श्रवणयंत्र लाँच Promotional Activity at Taj Mahal केले. कंपनीच्या तीन अधिकाऱ्यांनी पेटी उघडली आणि त्यांच्या हातातले श्रवणयंत्र ताजमहालासमोर दाखवले. जेव्हा कंपनीने हे फोटो आपल्या सोशल मीडिया अकाऊंट आणि मीडिया आउटलेटवर अपलोड केले. तेव्हा भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागआणि सीआयएसएफमध्ये गोंधळ उडाला.

श्रवणयंत्र पेटीसह आत कसे गेले, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ही ताजमहालच्या सुरक्षेतील त्रुटी आहे. त्यामुळे एएसआय आग्रा सर्कलच्या अधीक्षक पुरातत्वशास्त्रज्ञांनी त्यावर तपास सुरू केला असून एएसआय तसेच सीआयएसएफकडून अहवाल मागवला आहे. डॉ. सुगाता भट्टाचार्य, अमेरिकन कंपनी स्टारकीच्या ऑडिओलॉजीचे सल्लागार डॉक्टर, कंपनीचे उपाध्यक्ष आणि एशिया पॅसिफिक सेल्स ऑफिसर पॉल साइट्स, कंपनीचे भारताचे एमडी अखिल चौहान यांनी गुरुवारी ताजमहालला भेट दिली.

ताजमहाल टूरमध्ये, रॉयल गेट आणि सेंट्रल टँकजवळ ताजसमोर कंपनीच्या श्रवणयंत्राचा बॉक्स उघडून तिघांनी श्रवणयंत्र दाखवून फोटोग्राफी केली. कंपनीच्या अधिकार्‍यांनी त्यांच्या कंपनीचे उत्पादन श्रवणयंत्र ताजच्या सावलीत लॉन्च केले, तसेच त्याचा प्रचारही केला. इतकंच नाही तर कंपनीचे अधिकारी मशीनची वैशिष्ट्येही सांगत आहेत. ताजच्या सुरक्षेत तैनात असलेल्या सीआयएसएफचे जवान आणि एएसआयच्या जवानांना याची माहितीही नव्हती. यानंतर स्टार कंपनीचे तीन अधिकारी ताजमहाल पाहून निघून गेले.

स्टारकी या अमेरिकन कंपनीच्या अधिकार्‍यांनी कंपनीच्या वतीने 'हीअरिंग एड' लॉन्चचा फोटो मीडिया संस्थांना पाठवला. ज्यामध्ये कंपनीच्या तीन अधिकाऱ्यांचे पद, नाव आणि मशीनची माहिती लिहली होती. गुरुवारी सायंकाळी उशिरा हा प्रकार एएसआयच्या अधिकाऱ्यांना समजताच एकच खळबळ उडाली. कारण, परवानगीशिवाय ताजमहालमध्ये प्रचारात्मक क्रियाकलाप कसा करण्यात आला. इतकंच नाही तर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी एक नाही तर तीन बॉक्स आणि त्यात त्यांच्या कंपनीचे श्रवणयंत्र नेले. ताजमहालमध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि वस्तूंवर बंदी आहे. हे डबे चेकिंग पॉइंटवर का पकडले नाहीत, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.