आग्रा - अज्ञात व्यक्तिने फोन करून ताजमहाल मध्ये स्फोटके ठेवली असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर सुरक्षा दलांनी ताजमहालाची पाहणी केली. यावेळी ताजमहालात कोणत्याही प्रकारची स्फोटके आढळली नाहीत. ही माहिती केवळ अफवा असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
ताजमहालात स्फोटके ठेवल्या अज्ञात व्यक्तिचा फोन आला होता. त्यानंतर प्रशासनाने पर्यटकांसाठी ताजमहाल बंद केला होता. तसेच तेथील उपस्थित पर्यटकांना बाहेर काढण्यात आले. ताजमहलाचे दोन्ही दरवाजे बंद करण्यात आले होते. या स्फोटकांसंदर्भातील फोनची माहिती मिळताच सीआईएसएफ आणि स्थानिक पोलिसांनी सतर्कता बाळगत ताजमहल परिसरात शोध कार्य सुरू केले. मात्र, स्फोटके असल्याची केवळ अफवा असल्याची माहिती पोलीस महानिरीक्षक सतीश गणेश यांनी दिली.
एका तरुणांने केला होता फोन-
पोलीस महानिरीक्षत सतिश गणेश म्हणाले की, ताजमहालात कोणत्याही प्रकारची स्फोटके आढळून आलेली नाहीत. फिरोजाबाद येथील एका मुलाने अशा प्रकारचा अफवेचा फोन केला होता.