ETV Bharat / bharat

T20 World Cup 2022 : आयसीसीने जाहीर केली टी-20 विश्वचषक 2022ची बक्षीस रक्कम, विजेत्याला मिळणार तब्बल 'इतके' कोटी

ऑस्ट्रेलियात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषक 2022 ( T20 WORLD CUP 2022 ) जिंकणाऱ्या संघाला $1.6 दशलक्ष (सुमारे 13 कोटी रुपये) बक्षीस रक्कम मिळणार आहे. याबाबत आयसीसीने अधिकृतपणे घोषणा ( ICC Announces Prize Money ) केली आहे.

T20 WORLD CUP 2022
टी-20 विश्वचषक 2022
author img

By

Published : Sep 30, 2022, 6:59 PM IST

नवी दिल्ली: 16 ऑक्टोबरपासून टी-20 विश्वचषक 2022 ( T20 WORLD CUP 2022 ) सुरू होत आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघातील खेळाडूंनी देखील तयारी सुरू केली आहे. दरम्यान, आयसीसीने 2022 च्या टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी बक्षिसांची रक्कम जाहीर ( Prize money for T20 World Cup announced ) केली आहे. यावेळी टी-20 वर्ल्ड कपमध्ये पैशांचा पाऊस पडणार आहे. आयसीसीने केलेल्या घोषणेनुसार ( ICC Announces Prize Money ), 2022 च्या विश्वचषक विजेत्या संघाला यावेळी सुमारे 13 कोटी रुपये मिळणार आहेत.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ( ICC ) शुक्रवारी एक निवेदन जारी करून ही माहिती दिली. आयसीसीने जाहीर केले आहे की, विजेत्या संघाला एकूण $1.6 दशलक्ष दिले जातील, तर अंतिम फेरीत पराभूत होणाऱ्या संघाला विजेत्यापेक्षा निम्मी रक्कम मिळेल. टी-20 विश्वचषक स्पर्धेत एकूण 16 संघ सहभागी होत आहेत, एक प्रकारे प्रत्येक संघाला काही ना काही आयसीसीकडून रक्कम दिली जाईल, ज्याची घोषणा करण्यात आली आहे.

टी-20 विश्वचषक 2022 साठी बक्षिसांच्या रकमेची यादी ( T20 World Cup 2022 Prize Money List ) -

  • विजेता - $1.6 दशलक्ष (अंदाजे रु. 13 कोटी)
  • उपविजेता - $0.8 दशलक्ष (अंदाजे 6.5कोटी)
  • उपांत्य फेरीत पराभूत झालेले संघ - $0.4 मिलियन (अंदाजे ३.२६ कोटी)
  • सुपर 12 मध्ये प्रत्येक सामना जिंकणाऱ्या संघाला - 40 हजार डॉलर (अंदाजे 33.62 लाख)
  • सुपर 12 मधून बाहेर पडलेला प्रत्येक संघ - 70 हजार डॉलर (सुमारे 57,09 लाख)
  • पहिल्या फेरीत प्रत्येक सामना जिंकणारा संघ - 40 हजार डॉलर्स (अंदाजे 33.62 लाख रुपये)
  • पहिल्या फेरीतून बाहेर पडणारा प्रत्येक संघ - 40 हजार डॉलर्स (अंदाजे 33.62 लाख रुपये)

हेही वाचा - Jadeja Manjrekar Controversy : मांजरेकरांबद्दल जडेजाने केले मजेशीर ट्विट, जाणून घ्या दोघांमध्ये काय होता वाद

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.