नवी दिल्ली - दोनवेळा ऑलिम्पिकमध्ये पदक मिळविलेला कुस्तीपटू सुशील कुमार हा तिहार तुरुंगात खुनाच्या आरोपाखाली अटकेत आहे. आता, तुरुंगामध्ये सुशील कुमार हा फिटनेस गुरुची भूमिका पार पाडत आहे.
कुस्तीपटू सुशील कुमारने प्रथिनयुक्त स्पेशल डायटची मागणी केली होती. मात्र, तुरुंग प्रशासनाने ही मागणी फेटाळली होती. त्यानंतर सुशील कुमारने ऑलिम्पिक पाहण्यासाठी टिव्हीचा मागणी केली होती. तुरुंग प्रशासनाने ही मागणी मान्य केली आहे. तुरुंगाचे कर्मचारी सुशीलकडून फिटनेसचे धडे घेत आहेत.
हेही वाचा-Golden Celebration: सुवर्ण कामगिरीनंतर नीरजच्या घरासमोर जल्लोष, जवानांकडून तिरंगा फडकवत आनंद साजरा
सुशील कुमारला खुन प्रकरणात अटक-
सुशील कुमार हा सागर धनकर खुन प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. तो तिहार तुरुंग क्रमांक 2 मध्ये कैदेत आहे. या ठिकाणी असलेल्या तुरुंगातील कर्मचाऱ्यांनाही सुशील कुमारसारखा फिटनेस असावा, असे वाटू लागले आहे. त्यामुळे ते सुशील कुमारकडून फिटनेससाठी टिप्स घेत आहेत.
हेही वाचा-नीरज चोप्रा : लठ्ठ मुलगा ते वजन कमी करण्याचा प्रयत्न करणारा ऑलिम्पिकचा चॅम्पियन
सुशील कुमार हा जूनपासून तुरुंगात
सुत्राच्या माहितीनुसार तुरुंगामधील फिटनेस क्लासमध्ये सुशील कुमार हा तुरुंग कर्मचाऱ्यांना फिटनेसचे धडे देत आहे. कर्तव्य बजाविताना फिटनेस किती महत्त्वाचा आहे, हे सुशील कुमार कर्मचाऱ्यांना सांगत आहे. एक सामान्य व्यक्ती ते ऑलिम्पिक पदकविजेता हा प्रवास कसा घडला हे सुशील कुमारकडून जाणून घेण्यासाठी कर्मचारी उत्सुक असतात. सुशील कुमार हा जूनपासून तुरुंगात आहे.