पंचांगानुसार या वर्षी 2022 मध्ये एकूण चार ग्रहण होतील. यात दोन सूर्यग्रहण आणि दोन चंद्रग्रहण आहेत. पहिले सूर्यग्रहण ( Surya Grahan 2022 ) आणि चंद्रग्रहण झाले आहे. या वर्षातील दुसरे सूर्यग्रहण २५ ऑक्टोबरला होणार आहे. यंदा वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण दिवाळीच्या दुसऱ्या दिवशीच होणार आहे. पंचांगानुसार दरवर्षी कार्तिक अमावस्येला दिवाळी साजरी केली जाते.
2022 चे शेवटचे सूर्यग्रहण केव्हा - यावेळी कार्तिक अमावस्या 24 ऑक्टोबर 2022 रोजी सायंकाळी 5:29:35 पासून असेल. 2022 चे शेवटचे सूर्यग्रहण 25 ऑक्टोबर 2022 रोजी होणार आहे. हे सूर्यग्रहण आंशिक असेल. कॅलेंडरनुसार, 2022 वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण भारतीय वेळेनुसार 25 ऑक्टोबर रोजी दुपारी 4:29 वाजता सुरू होईल आणि 5:24 वाजता संपेल.
सूर्यग्रहणचा भारतावर काय होणार परिणाम - 2022 सालचे शेवटचे सूर्यग्रहण आंशिक असेल आणि भारतात दिसणार नाही. त्यामुळे भारतावर त्याचा विशेष परिणाम होणार नाही.
वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण या देशांमध्ये दिसणार आहे - या वर्षीचे शेवटचे सूर्यग्रहण 25 ऑक्टोबर रोजी प्रामुख्याने आशियाचा नैऋत्य भाग, युरोप, आफ्रिका खंडाचा ईशान्य भाग आणि अटलांटिकमध्ये दिसणार आहे. त्यामुळे या देशांवर त्याचा विशेष परिणाम होणार आहे.
सूर्यग्रहण 2022 चा सुतक कालावधी - ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्यग्रहणाचा सुतक कालावधी ग्रहण सुरू होण्याच्या १२ तास आधी सुरू होतो आणि ग्रहण संपल्यानंतर संपतो. मुख्य म्हणजे सूर्यग्रहणाचा सुतक काळ फक्त जेथे सूर्यग्रहण दिसतो तेथेच वैध असतो. त्यामुळे हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. त्यामुळे येथे सुतक कालावधी वैध ठरणार नाही.