सूरजकुंड मेळावा पाहण्यासाठी लांबून पर्यटक येतात. हा एक अतिशय प्रसिद्ध मेळावा आहे. यावेळी 01 ते 16 फेब्रुवारी दरम्यान हा मेळावा होणार आहे. या मेळाव्यात यावेळी तब्बल 25 वर्षांनंतर ईशान्येकडील राज्यांतील खाद्यपदार्थ चाखायला मिळणार आहेत. या जत्रेत पर्यटकांना मणिपूरची चहाओ खीर, मेघालयची फ्रूट चाट आणि त्रिपुराची भांगुई बिर्याणी चाखता येणार आहे. विशेष म्हणजे हा मेळावा दरवर्षी भरवला जातो आणि पर्यटकांमध्ये याविषयी प्रचंड क्रेझ आहे. यावेळी हा ३६ वा सुरजकुंड मेळा आहे. गतवर्षीही सुरजकुंड जत्रेचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले होते. गेल्या वर्षी हा मेळा १९ मार्च ते ४ एप्रिल या कालावधीत आयोजित करण्यात आला होता. या मेळ्यात ३० हून अधिक देश सहभागी झाले होते.
इतिहास : सुरजकुंड मेळावा बाबत तुम्ही सर्वांनी ऐकले असेलच. हा भारतातील सर्वात मोठ्या मेळाव्यांपैकी एक आहे. यावेळी 1 ते 16 फेब्रुवारी दरम्यान हा मेळावा होणार आहे. सूरजकुंड हे हरियाणा राज्यातील फरिदाबाद जिल्ह्यातील गाव आहे. येथे दरवर्षी मेळावा भरतो. मेळावा भरत असल्याने हे ठिकाण भारतात प्रसिद्ध झाले आहे. 1987 मध्ये कारागीर आणि त्यांच्या अद्भूत कलाकृतींचे प्रदर्शन करण्यासाठी या जत्रेची सुरुवात झाल्याचे सांगितले जाते.
का साजरा केला जातो : स्थानिक कलांना प्रोत्साहन देणे आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, हा त्याचा मुख्य उद्देश होता. या मेळाव्यात कापड, पोर्सिलेन, टेराकोटा आदी वस्तू उपलब्ध आहेत. यावेळेस तुम्हीही फेब्रुवारीमध्ये या मेळाव्याला भेट देण्याचा विचार करत असाल तर, भारताच्या प्रादेशिक संस्कृतीची ओळख करून घेण्यासाठी तुम्ही सूरजकुंड मेळाव्याला भेट देऊ शकता. यामध्ये तुम्हाला केवळ स्थानिक कलाकुसरीची ओळख करून घेण्याची संधी मिळणार नाही, तर स्थानिक पदार्थ्यांच्या चवींचाही आस्वाद घेता येईल.
कधी आणि कुठे होणार : 36 वा सूरजकुंड आंतरराष्ट्रीय हस्तकला मेळावा 1 फेब्रुवारीपासून सुरू होणार असून यावर्षी 16 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. जर तुम्ही या मेळाव्यात येण्याचा विचार करत असाल तर, दक्षिण दिल्लीपासून सुमारे 8 किमी अंतरावर असलेल्या फरीदाबाद जिल्ह्यातील सूरजकुंड येथे दरवर्षी या मेळाव्याचे आयोजन केले जाते. जर तुम्हाला या मेळाव्याचा आनंद घ्यायचा असेल, तर हा मेळावा दुपारी 12.30 वाजता सुरू होतो आणि रात्री 9.30 वाजे पर्यंत चालतो. सुरजकुंड मेळ्याची तिकिटे दर आठवड्याला वेगवेगळी असतात. तिकीट आठवड्याच्या दिवशी 120 रुपये आणि वीकेंडला 180 रुपये असते.
सूरजकुंड मेळ्याची थीम : विशेष म्हणजे हा मेळावा दरवर्षी एक आगळी वेगळी थीम घेऊन येतो. तो कोणत्याही एका विषयावर सजलेला असतो. दरवर्षी हा मेळावा देशातील कोणत्याही राज्याच्या थीमवर भरतो. गेल्या काही वर्षांत या मेळाव्याची थीम हिमाचल प्रदेश आणि महाराष्ट्र होती. यावर्षी ईशान्येतील आठ राज्यांना थीम स्टेट बनवण्यात आले आहे. भारताची संस्कृती आणि चालीरीती जवळून जाणून घेण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे.
वर्षातील सर्वात मोठा हस्तकला मेळावा : जर तुम्हाला संपूर्ण देश एका दृष्टीकोनातून पहायचा असेल, तर सूरजकुंड मेळाव्याला अवश्य भेट द्या. सूरजकुंड मेला प्राधिकरण आणि हरियाणा पर्यटन केंद्रीय पर्यटन, वस्त्रोद्योग, संस्कृती आणि परराष्ट्र मंत्रालयांसोबत मिळून या मेळ्याचे आयोजन करतात. सूरजकुंड जत्रेत येणाऱ्या लोकांसाठी ई-टॉयलेटसोबतच पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे. जत्रेदरम्यान, ओपन एअर थिएटरमध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कलाकारांचा परफॉर्मन्स पाहण्यासारखा असतो. येथे पोहलण्यासाठी रेल्वे, मेट्रो, फ्लाईट, स्वत:ची वाहने अश्या अनेक साधनांचा वापर तुम्ही स्वत:च्या सोईनुसार करु शकता.