ETV Bharat / bharat

जहांगीरपुरीतील अतिक्रमण कारवाईला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती; न्यायालयाने माहिती मागवली - सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालयाने जहांगीरपुरीमध्ये शांतता ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. उद्या सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी सुनावणी होणार आहे. तर पोलिसांनी अतिक्रमण हटवण्याची कारवाई थांबवली आहे.

Supreme Court
सर्वोच्च न्यायालय
author img

By

Published : Apr 20, 2022, 11:52 AM IST

Updated : Apr 20, 2022, 4:05 PM IST

नवी दिल्ली - दिल्लीतील जहांगीरपुरी येथील बेकायदा बांधकाम पाडण्यास सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाने जहांगीरपुरीमध्ये शांतता ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. उद्या सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी सुनावणी होणार आहे. वरिष्ठ वकील दुष्यंत दवे यांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितले की, जहांगीरपुरीमधील अतिक्रमण पाडण्याचे आदेश असंवैधानिक आहे. तसेच 15 दिवसांची नोटीस आवश्यक असताना कोणतीही नोटीस दिली नाही. त्यामुळे पोलिसांनी आता कारवाई थांबवली आहे.

400 पोलिसांचा समावेश - भाजपाशासित उत्तर दिल्ली महानगरपालिकेने (NDMC) जहांगीरपुरीमध्ये अतिक्रमणविरोधी मोहीम राबवली होती. उत्तर दिल्ली महानगरपालिका ने उत्तर-पश्चिम पोलिस उपायुक्तांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की जहांगीरपुरी येथे एक विशेष संयुक्त अतिक्रमण विरोधी कार्यक्रम नियोजित आहे. त्यामुळे पोलिसांनी पुढील तीन दिवस अतिक्रमण हटाव मोहिमेत मदत करावी. तसेच कारवाईत महिला पोलिसांसह एकुण 400 पोलिसांचा ताफा उपलब्ध करूण देण्याची मागणी केली.

हेही वाचा - Jahangirpuri Violence : जहांगीरपुरी हिंसाचार! दोषींवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यानुसार कारवाई

एका समुदायाला टार्गेट - अतिक्रमण विरोधी कारवाईवर जमात-उलामा-ई-हिंद चे सचिव नैज अहमद फारूखी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, या घटनेची माहिती आम्ही महानगरपालिका, पोलीस आयुक्त आणि सचिवालयाला दिली असून कारवाई तात्काळ थांबवण्याची मागणी केली आहे. तसेच हिंसा झाल्यानंतर ही कारवाई सुरू असून या परिस्थिती कारवाई करणे नाही. केवळ एका समुदायाला टार्गेट करण्यात येत आहे. शिवाय केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील या घटनेची दखल घेण्याची मागणी त्यांनी केली आहे.

  • We've info that demolition drive underway in Jahangirpuri. We've sent a notice to North Delhi Mayor, Police, Chief Secy to stop this drive. By doing this after riots condition, you're only favouring rioters, targeting a community, govt shouldn't do this: Secy, Jamiat Ulama-i-Hind pic.twitter.com/KZRQzT8geh

    — ANI (@ANI) April 20, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

काँग्रेसकडून टीका - भाजपचा बुलडोझर लोकशाहीला चिरडण्याचा, गांधीजींना चिरडण्याचा प्रयत्न करत आहे. पण भाजप सरकार लोकशाहीला चिरडून टाकू शकणार नाही आणि गांधीजींना तर चिरडूनच शकणार नाहीत. सत्य, अहिंसा आणि न्याय पायदळी तुडवण्याचा भाजपचा डाव यशस्वी होणार नाही, असे ट्विट करत काँग्रेसने टीका केली आहे.

  • भाजपाई बुलडोजरतंत्र लोकतंत्र को कुचलने की कोशिश कर रहा है, गांधीजी को कुचलने की कोशिश कर रहा है।

    मगर भाजपाई हुकूमत न लोकतंत्र को कुचल पाएगी, न गांधीजी को।

    सत्य, अहिंसा, न्याय को रौंदने का भाजपाई षड्यंत्र कामयाब नहीं होगा। pic.twitter.com/eTyhOsM2dt

    — Congress (@INCIndia) April 20, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

मिरवणुकीवर झाली होती दगडफेक - हनुमान जयंतीच्या मिरवणुकीदरम्यान दिल्लीतील जहांगीरपुरी येथे शनिवारी दोन समुदायांमध्ये हाणामारी झाली होती. ज्यामध्ये आठ पोलीस कर्मचारी आणि एक स्थानिक रहिवासी जखमी झाले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चकमकीदरम्यान दगडफेक आणि जाळपोळ झाली आणि काही वाहनेही जाळण्यात आली.

Last Updated : Apr 20, 2022, 4:05 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.