ETV Bharat / bharat

SC Hearing on MLA : आमदार अपात्रता प्रकरणावरुन सुप्रीम कोर्टानं झापलं, म्हणाले कोर्टाच्या निकालाची बूज राखायला विधानसभा अध्यक्षांना कोणीतरी सांगा - सुनावणीला सुप्रीम कोर्टात सुरुवात

SC Hearing on MLA : आमदार अपात्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर विलंब करत असल्याचा आरोप उद्धव ठाकरे गटाकडून करण्यात आला होता. यानंतर शरद पवार गटाकडूनही हाच आरोप करण्यात आलाय. या संदर्भात दोन महिन्यांत निर्णय घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं विधानसभा अध्यक्षांना दिले आहेत.

SC Hearing on MLA
संग्रहीत छायाचित्र
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 13, 2023, 1:06 PM IST

Updated : Oct 13, 2023, 1:48 PM IST

नवी दिल्ली SC Hearing on MLA : आमदार अपात्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे विलंब करत असल्याचा आरोप ठाकरे गटानं केला होता. यानंतर राष्ट्रवादीच्या पवार गटाकडूनही हाच आरोप करण्यात आलाय. त्यामुळं शिवसेना आणि राष्ट्रवादीचं प्रकरण सारखंचं असल्यानं ठाकरे गट आणि शरद पवार गटाच्या या मागणीबाबतच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टानं आज एकत्रीत सुनावणी घेणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानुसार या याचिकेवर आज एकत्रित सुनावणी झाली. या प्रकरणावर मंगळवारी पुढील सुनावणी होणार आहे.

कोणीतरी अध्यक्षांना सांगा : सर्वोच्च न्यायालयात आज विधानसभा अध्यक्षांच्या विलंब प्रकरणावर सुनावणी पार पडली. ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही याचिकांवर सर्वोच्च न्यायालयानं एकत्र सुनावणी घेतली. विधानसभा अध्यक्षांनी किमान दोन महिन्यात निर्णय घेणं आवश्यक असल्याचं सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी या सुनावणीत म्हटलंय. तसंच, हे प्रकरण गांभीर्यानं घेण्याची गरज आहे, असं विधानसभा अध्यक्षांना कोणीतरी सांगावं असंही सरन्यायाधीश म्हणाले. यावेळी सरन्यायाधीशांनी अत्यंत कडक शब्दांत राहुल नार्वेकरांना सुनावलंय.

विधानसभा अध्यक्षांचे वेळापत्रक अमान्य : विधानसभा अध्यक्षांची सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडणाऱ्या सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनाही सरन्यायाधीशांनी स्पष्ट शब्दांत सुनावलंय. तसंच, अपात्रता प्रकरणावरील सुनावणीसाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी ठरवलेलं वेळापत्रक मान्य नसल्याचं सरन्यायाधीशांनी यावेळी सांगितलंय. तुम्हाला बसवून कायदा शिकवावा लागेल, असंही सरन्यायाधीश सुनावणीदरम्यान म्हणाले. विधानसभा अध्यक्षांचं पद हे संसदीय सरकारचा भाग आहे, हे आम्हाला माहीत आहे. त्यामुळंच आम्ही कुठलीही टाईमफ्रेम देत नाही. पण ते वेळेत निर्णय देत नसतील तर त्यांनाच जबाबदार धरावं लागेल, असं यावेळी सरन्यायाधीशांनी म्हटलंय. जर विधानसभा अध्यक्षांकडून निश्चित वेळापत्रक आलं नाही, तर आम्हालाच आदेश द्यावे लागतील आणि त्यानंतर ठरवून दिलेल्या मर्यादेत अध्यक्षांना निर्णय द्यावाच लागेल, अशा शब्दांत सरन्यायाधीशांनी विधानसभा अध्यक्षांना सुनावलंय.

हेही वाचा :

  1. MLA Disqualification Hearing : तब्बल तीन तास झाली आमदार अपात्रतेची सुनावणी; 'या' मागणीवरुन मतभेद
  2. MLA Disqualification Hearing : शिवसेना आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी उद्या - राहुल नार्वेकर
  3. Rahul Narwekar Vs Thackeray Group : राहुल नार्वेकरांचा ठाकरे गटावर गंभीर आरोप; म्हणाले, 'माझ्या निर्णय प्रक्रियेवर...'

Last Updated : Oct 13, 2023, 1:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.