लखीसराय: बिहारमधील लखीसराय जिल्ह्यातील बरहिया येथील रहिवासी सुमन कुमार यांच्या खात्यात अचानक अब्जावधी रुपये (6833 Crores Rupee Credited In Account) आले. त्यांच्या कोटक सिक्युरिटीज महिंद्रा बँकेच्या पाटणा शाखेतील खात्यात 68 अब्ज 33 कोटी 42 लाख 5 हजारांहून अधिक रक्कम जमा झाली आहे. ही रक्कम चार ते सात दिवसांपूर्वी जमा झाली आहे. अचानक सुमनने आपले खाते अपडेट केले असता त्यांना याबाबत माहिती मिळाली. एवढी मोठी रक्कम खात्यात आल्याने स्वत: खातेदार सुमन कुमार अचंबित झाले आहेत.
बऱ्हिया पोलिसांनाही माहिती नाही - सूर्यगढ पोलिस स्टेशनचे अधिकारी चंदन कुमार यांनी फोनवर सांगितले की, आम्हाला एका व्यक्तीची पाटणा येथून माहिती मिळाली आहे. परंतु अद्याप आम्हाला याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. याबाबत बँकेकडून किंवा अधिकृतपणे काही माहिती आली तर काही सांगता येईल.
डिमॅट खात्यात पैसे जमा - सुमन कुमार यांचे कोटक सिक्युरिटीज महिंद्रा बँक पाटणा शाखेत डीमॅट खाते असल्याचे सांगितले जात आहे. ते शेअर ट्रेडिंगमध्ये नेहमीच गुंतवणूक करतात. गेले 6-7 दिवस उलटून गेले तरी त्यांच्या खात्यात पैसे पडून आहेत. एवढी मोठी रक्कम बँकेत कशी आणि कुठून आली, हा तपासाचा विषय आहे. दुसरीकडे, कोणाची चूक झाली असेल, तर अनेक दिवस खात्यात पैसे का पडून आहेत, हा मोठा प्रश्न आहे.
"सुमन ट्रेडिंगचे काम मोबाईलवरून करतात. त्यादरम्यान त्यांच्या खात्यात खूप पैसे आल्याचे त्यांनी पाहिले. त्यानंतर त्यांनी अनेकांशी संपर्क साधला. कस्टमर केअरशी बोलूनही कळले की हो पैसे खरोखरच आले आहेत. येथे त्याचवेळी त्यांनी माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागितली होती, मात्र अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.'' - श्रवणकुमार, सुमन यांचे नातेवाईक