ETV Bharat / bharat

Fighter Aircraft Sukhoi 30MKI : शत्रूंच्या मनात धडकी भरवणारे भारताचे घातक सुखोई 30 लढाऊ विमान, वाचा काय आहे या विमानाचे वेगळेपण - सुखोई 30 विमान अपग्रेड

भारताने रशियन बनावटीचे सुखोई 30 हे लढाऊ विमान 2002 ला घेतले होते. याच्या कराराला तेव्हा भाजपने अगोदर विरोध केला, मात्र त्यानंतर त्यांचा विरोध मावळला. सुखोई भारतात दाखल झाल्यानंतर त्यात अपग्रेडेशन झाले. त्यामुळे भारताची शक्ती कितीतरी पटीने वाढली आहे. सध्या सुखोई 30 एमकेआय हे भारताचे सगळ्यात घातक लढाऊ विमान आहे.

Fighter Aircraft Sukhoi 30MKI
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Jan 28, 2023, 6:01 PM IST

नवी दिल्ली : रशियन बनावटीच्या सुखोई 30 एमकेआय हे भारतीय हवाई दलातील सगळ्यात घातक विमान आहे. या विमानात हवेत इंधन भरता येण्याची क्षमता आहे. सुखोईत 12 टनांपर्यंत युद्धसामुग्री वाहून नेता येते. दुसरीकडे दुहेरी इंजिन या विमानात असल्याने त्याचा पायलटला मोठा फायदा होतो. सुखोई विमान एकावेळी 3 हजार किमी उड्डाण करु शकते. त्यामुळे युद्धात त्याचा मोठा फायदा होतो. भारताला रशियाकडून 2002 मध्ये पहिले सुखोई लढाऊ विमान मिळाले. त्यानंतरही सुखोई 30 विमान अपग्रेड केल्यानंतर तर ते आणखी घातक झाले आहे. नवीन क्षेपणास्त्रांनी ते हवाई हल्ले करण्यास सुसज्ज झाले आहे.

सुखोई 30 एमकेआयमधील एमकेआयचा काय आहे अर्थ : सुखोई 30 हे रशियन बनावटीच्या विमानाचे नाव आहे. त्याच्या भारतीय आवृत्तीचे नाव सुखोई 30 एमकेआय आहे. एमकेआय म्हणजे रशियन भाषेत त्याला (Modernizirovannyi Kommercheskiy Indiski ) तर भारतीय भाषेत त्याला ( Modernized Commercial Indian) सुखोई 30 एमकेआयची निर्मिती हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) द्वारे भारतात केली जाते. रशियाच्या सुखोई कॉर्पोरेशनने 1995 मध्ये ते बनवण्यास सुरुवात केली. त्यानंतर 1997 मध्ये एचएएलकडून परवाना घेतल्यानंतर भारतीय वायुसेनेनुसार त्यात बदल करण्यास सुरुवात केली. सुखोई 30 एमकेआय फायटर जेट हे सुखोई एसयू-२७ ची अपग्रेडेड आवृत्ती आहे.

का भरते सुखोई 30 मुळे शत्रूंच्या मनात धडकी : सुखोई 30 या विमानाची जगभरातील 10 सर्वात धोकादायक लढाऊ विमानात गणना होते. त्यावरुनच सुखोई 30 विमानाच्या ताकदीचा अंदाज लावला जाऊ शकतो. हे विमान भारत आणि रशियाने संयुक्तपणे बनवले आहे. भारताला आतापर्यंत 272 सुखोई - 30MKI विमाने हवाई दलासाठी मिळाली आहेत. हे 4.5 पिढीचे लढाऊ विमान मानले जाते. त्याची लांबी 72 फूट तर विंगस्पॅन 48.3 फूट आहे. उंची 20.10 फूट आणि वजन 18,400 किलो आहे. त्यामुळे सुखोई विमान किती अव्याढव्य आणि जबरदस्त आहे, हे समजून येते.

दोन हजार किमी प्रतितास वेग : सुखोई -30 एमकेआय विमानात ली युल्का एल-३१ एफपी आफ्टरबर्निंग टर्बोफॅन इंजिन बसवण्यात आले आहे. ती विमानाला १२३ किलो न्यूटनची ताकद देते. या विमानाचा कमाल वेग ताशी 2120 किलोमीटर आहे, तर उंचावरील श्रेणी 3000 किलोमीटर आहे. या विमानात हवेतच इंधन भरले तर सुखोई-30MKI 8000 किमीपर्यंतही जाऊ शकते. त्यानंतर विमान कमाल 56,800 फूट उंचीपर्यंत उड्डाण करू शकत असल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे.

4 रॉकेट 4 क्षेपणास्त्रे आणि 10 प्रकारचे बॉम्ब बसवता येतात : सुखोई 30 एमकेआय या लढाऊ विमानात ३० मिमी ग्रिझेव्ह-शिपुनोव्ह ऑटोकॅनन बसवण्यात आली आहे. त्यामुळे फक्त १ मिनिटात त्यातून १५० फैरी झाडू शकते. तसेच या विमानात 12 हार्ड पॉइंट्स आहेत. यामध्ये शस्त्रास्त्रे बसवली जाऊ शकतात. यामध्ये 4 प्रकारचे रॉकेट, 4 प्रकारची क्षेपणास्त्रे आणि 10 प्रकारचे बॉम्ब बसवता येतात. त्यामुळे या सगळ्यांमुळे सुखोई 30 विमानामुळे शत्रूंच्या मनात धडकी भरते.

भारताला कसे मिळाले सुखोई लढाऊ विमान : पी.व्ही. नरसिंह राव यांचे सरकार 1996 मध्ये सत्तेवर होते. त्यामुळेच 1996 मध्ये सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी राव सरकारने शेवटच्या दिवसात रशियासोबत सुखोई विमानांचा करार केला होता. तेव्हा अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली भाजप या कराराला विरोध करत होता. कारण भाजपने नरसिंह राव सरकार आपल्या शेवटच्या काळात घाईघाईने हा करार का करत आहे, असा सवाल भाजपने केला होता. पण नंतर भाजपचा सुखोई विमानाच्या कराराला असलेला विरोध मावळला. त्यानंतर अटलबिहारी वाजपेयी यांच्याशी सल्लामसलत केल्यानंतर तत्कालीन संरक्षण मंत्री मुलायम सिंह यादव यांनी या करारावर स्वाक्षरी केली. भारत आणि रशियात करार झाल्यानंतर सुखोई - 30 हे लढाऊ विमान भारतात दाखल झाले.

सुखोईत ऑटोमेटिक फ्लाइट कंट्रोल सिस्‍टम : सगळ्याच क्षेत्रात सुखोई - 30 विमान हे दर्जेदार आहे. त्याच्या लांबीपासून ते क्षेपणास्त्र वाहून नेण्याच्या क्षमतेपर्यंत सुखोई हे विमान यूएस एफ 16 पेक्षाही अधिक दर्जेदार मानले जाते. सुखोई विमान सॅटेलाइट नेव्हिगेशन सिस्टमसह सुसज्ज आहे. त्यामुळे ते दिवस आणि रात्र कोणत्याही हवामानात काम करण्यास सज्ज आहे. सुखोईत लाँग रेंज रेडिओ नेव्हिगेशन सिस्टीम आहे. यात ऑटोमेटिक फ्लाइट कंट्रोल सिस्‍टम बसवण्यात आली आहे. नेव्हिगेशन सिस्टीमला ऑटोमॅटिक सिस्टीममधून माहिती मिळताच ती विमानाच्या मार्गाशी संबंधित समस्या आपोआप सोडवते. यामध्ये लक्ष्याला नष्ट केल्यानंतर पुन्हा आपल्या तळावर परत जाण्यापर्यंतच्या सेवेचा समावेश आहे. त्यामुळे सुखोई 30 हे शत्रूंच्या उरात धडकी भरवणारे भारताचे जबरदस्त लढाऊ विमान आहे.

हेही वाचा - IAF Fighter Jets Crashed: वायूसेनेच्या दोन विमानांचा अपघात.. एक मध्यप्रदेशात तर दुसरे पडले राजस्थानात, एक वैमानिक ठार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.