जयपूर Sukhdev Singh Gogamedi Murder Case : राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांची जयपूरमधील घरात घुसून हत्या केल्याप्रकरणी महत्त्वाची बातमी आहे. गोगामेडी यांच्या पत्नी शीला शेखावत यांनी श्यामनगर पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या एफआयआरमध्ये निवर्तमान मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि डीजीपी यांच्या नावाचाही उल्लेख आहे. त्याचवेळी शीला शेखावत यांनी रात्री आंदोलनस्थळी पोहोचून आंदोलन थांबविण्याची घोषणा केली. तसंच श्याम नगर पोलrस स्टेशनचे अधिकारी मनीष गुप्ता आणि एका बीट कॉन्स्टेबलचं निलंबन करण्यात आलं.
आज होणार अंत्यसंस्कार : एसएमएस हॉस्पिटलमध्ये सुखदेव सिंह गोगामेडी यांच्या मृतदेहाचं पोस्टमार्टम करण्यात येत आहे. गुरुवारी त्यांच्या मूळ गावी गोगामेडी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलंय. इतकंच नाही तर या संपूर्ण प्रकरणाची एनआयएमार्फत चौकशी करण्याचं मान्य करण्यात आलंय, अशी माहिती आमदार मनोज न्यांगळी यांनी दिलीय. आरोपींच्या अटकेसाठी राजपूत समाजाकडून 72 तासांचा अल्टिमेटम देण्यात आलाय. गोगामेडी यांच्या पत्नी शीला शेखावत यांनी जाहीर केलं की, महिपाल सिंग मकराना, करणी सेनेचे अधिकारी आणि पोलिस यांच्यात झालेल्या चर्चेत सर्व मागण्या मान्य झाल्या आहेत. गोगामेडी येथे अंत्यदर्शनासाठी आज पार्थिव ठेवण्यात येणार आहे.
-
#WATCH | Jaipur: Wife of the national president of Rashtriya Rajput Karni Sena, Sukhdev Singh Gogamedi, Sheela Shekhawat said, "...Rajasthan bandh has to be observed tomorrow also. I call upon the Rajputs of the entire country to come here in maximum numbers because today Sukhdev… pic.twitter.com/cLNme0GsXx
— ANI MP/CG/Rajasthan (@ANI_MP_CG_RJ) December 6, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#WATCH | Jaipur: Wife of the national president of Rashtriya Rajput Karni Sena, Sukhdev Singh Gogamedi, Sheela Shekhawat said, "...Rajasthan bandh has to be observed tomorrow also. I call upon the Rajputs of the entire country to come here in maximum numbers because today Sukhdev… pic.twitter.com/cLNme0GsXx
— ANI MP/CG/Rajasthan (@ANI_MP_CG_RJ) December 6, 2023#WATCH | Jaipur: Wife of the national president of Rashtriya Rajput Karni Sena, Sukhdev Singh Gogamedi, Sheela Shekhawat said, "...Rajasthan bandh has to be observed tomorrow also. I call upon the Rajputs of the entire country to come here in maximum numbers because today Sukhdev… pic.twitter.com/cLNme0GsXx
— ANI MP/CG/Rajasthan (@ANI_MP_CG_RJ) December 6, 2023
एफआयआरमध्ये काय म्हटलंय : एफआयआरमध्ये गोगामेडी यांच्या पत्नी शीला शेखावत यांनी आरोप करत दावा केलाय की, सुखदेव सिंह गोगामेडी यांच्या हत्येचा कट रचला जात असल्याचं 14 फेब्रुवारी 2023 रोजी पंजाब पोलिसांनी राजस्थानच्या पोलीस महासंचालकांना पत्र लिहून कळवले होतं. इतके इनपुट असूनही, राज्याचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि पोलीस महासंचालकांसह जबाबदार अधिकाऱ्यांनी जाणूनबुजून माझ्या पतीला सुरक्षा दिली नाही.
-
#WATCH | Jaipur: Mortal remains of the national president of Rashtriya Rajput Karni Sena, Sukhdev Singh Gogamedi being taken from Metro Mass hospital to SMS Hospital, where a post-mortem will be done.
— ANI MP/CG/Rajasthan (@ANI_MP_CG_RJ) December 6, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
The last rites of Sukhdev Singh Gogamedi, who was shot dead on Tuesday, will… pic.twitter.com/FvDP0Zmj8v
">#WATCH | Jaipur: Mortal remains of the national president of Rashtriya Rajput Karni Sena, Sukhdev Singh Gogamedi being taken from Metro Mass hospital to SMS Hospital, where a post-mortem will be done.
— ANI MP/CG/Rajasthan (@ANI_MP_CG_RJ) December 6, 2023
The last rites of Sukhdev Singh Gogamedi, who was shot dead on Tuesday, will… pic.twitter.com/FvDP0Zmj8v#WATCH | Jaipur: Mortal remains of the national president of Rashtriya Rajput Karni Sena, Sukhdev Singh Gogamedi being taken from Metro Mass hospital to SMS Hospital, where a post-mortem will be done.
— ANI MP/CG/Rajasthan (@ANI_MP_CG_RJ) December 6, 2023
The last rites of Sukhdev Singh Gogamedi, who was shot dead on Tuesday, will… pic.twitter.com/FvDP0Zmj8v
आरोपींवर बक्षीस जाहीर : राजस्थान पोलिसांनी आरोपींवर प्रत्येकी 5 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केले आहे. फोटोच्या आधारे राजस्थान पोलीस हत्येतील आरोपीचा शोध घेत आहेत. राजस्थान पोलीस शेजारील राज्यांच्या पोलिसांचीही मदत घेत आहेत. शेजारील राज्यांच्या पोलिसांना खून प्रकरणाची माहिती आणि आरोपींचे फोटो देण्यात आले आहेत. दोन्ही हल्लेखोरांना पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी पोलिसांची विविध पथकं विविध ठिकाणी छापे टाकत आहेत.
-
Jaipur: Sukhdev Singh Gogamedi, the national president of Rashtriya Rajput Karni Sena murder | The protest has come to an end, and a consensus has been made. Shyam Nagar Police Station SHO and beat constable have been suspended. The last rites will be performed tomorrow morning.
— ANI MP/CG/Rajasthan (@ANI_MP_CG_RJ) December 6, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Jaipur: Sukhdev Singh Gogamedi, the national president of Rashtriya Rajput Karni Sena murder | The protest has come to an end, and a consensus has been made. Shyam Nagar Police Station SHO and beat constable have been suspended. The last rites will be performed tomorrow morning.
— ANI MP/CG/Rajasthan (@ANI_MP_CG_RJ) December 6, 2023Jaipur: Sukhdev Singh Gogamedi, the national president of Rashtriya Rajput Karni Sena murder | The protest has come to an end, and a consensus has been made. Shyam Nagar Police Station SHO and beat constable have been suspended. The last rites will be performed tomorrow morning.
— ANI MP/CG/Rajasthan (@ANI_MP_CG_RJ) December 6, 2023
प्रकरण काय : जयपूरच्या श्याम नगर पोलीस स्टेशन परिसरात मंगळवारी दुपारी राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांच्यासह दोघांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. दिवसाढवळ्या हल्लेखोरांनी घरात घुसून अंदाधुंद गोळीबार केला. सुखदेव सिंग गोगामेडी यांच्यावर चार गोळ्या झाडण्यात आल्या. सुखदेव सिंग यांनी गोगामेडी यांना मानसरोवर येथील खासगी रुग्णालयात नेलं. तिथं डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. आणखी एका तरुण नवीन सिंगचाही गोळी लागल्यानं मृत्यू झालाय. त्याचवेळी सुखदेव सिंग गोगामेडी यांचे खासगी सुरक्षा कर्मचारी अजित सिंग गंभीर जखमी झाले आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हेही वाचा :