ETV Bharat / bharat

दोन लाखांची लाच घेताना मुंबई पोलीस दलातील अधिकाऱ्यासह तीन हवालदारांना अटक; जयपूर एसीबीची कारवाई

दोन लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी मुंबई पोलीस दलातील एका पोलीस उपनिरीक्षकासह तीन पोलीस हवालदारांना जयपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने(एसीबी) लाच घेताना रंगेहाथ अटक केली आहे.

accused
आरोपी
author img

By

Published : Nov 24, 2020, 10:27 PM IST

जयपूर(राजस्थान) - दोन लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी मुंबई पोलीस दलातील एका पोलीस उपनिरीक्षकासह तीन पोलीस हवालदारांना जयपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने(एसीबी) लाच घेताना रंगेहाथ अटक केली आहे. बोरीवली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रशांत शिंदे, हवालदार लक्ष्मण, हवालदार सचिन अशोक गुंडके आणि हवालदार सुभाष पांडुरंग नरके यांना एसीबीने जयपूरमध्ये अटक केली आहे.

mumbai police
लाच प्रकरणी मुंबई पोलीस दलातील उपनिरीक्षकासह तीन कॉन्स्टेबल पोलिसांना अटक
  • राजस्थान एसीबीच्या स्पेशल टीमची कारवाई -

राजस्थान एसीबीच्या स्पेशल टीमने जयपूरमध्ये सापळा रचून या चार आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून 89 हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत. दोन लाख रुपयांची लाच घेताना या आरोपीना रंगेहाथ पकडले आहे.

  • एका पोलीस उपनिरीक्षकासह तीन हवालदारांना अटक

दरम्यान, एका प्रकरणासंदर्भात तक्रारदाराच्या वडिलांविरोधात मुंबईतील बोरीवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. याप्रकरणात तक्रारदाराच्या वडिलांना अटक होऊ नये म्हणून बोरीवली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक व तीन हवालदारांनी दोन लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. यानंतर तक्रारदाराने याची माहिती जयपूर एसीबी कार्यालयाला दिली. यानंतर एसीबीचे एडीजी दिनेश एमएन यांच्या पथकाने सापळा रचून एका पोलीस उपनिरीक्षकासह तीन हवालदारांना अटक केली आहे.

आरोपी मुंबईतून जयपूर येथे आले. तक्रारदाराच्या वडिलांना घरातून ताब्यात घेत त्यांना जयपूर रेल्वे स्टेशनजवळील एका हॉटेलमध्ये ठेवण्यात आले होते. तक्रारदाराच्या वडिलांना अटक न करण्यासाठी लाचखोर पोलिसांना सुरुवातीला त्या कुटुंबाकडे पाच लाख रुपयांची लाच मागितली. यात तडजोड करत ही रक्कम दोन लाख रुपयांपर्यंत देण्याचे निश्चित झाले. याचवेळी हॉटेलमध्ये ठरलेली दोन लाख रुपयांची लाच घेताना मुंबई पोलीस दलातील एक पोलीस उपनिरीक्षकासह तीन पोलीस हवालदारांना अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा - सिंधुदुर्गात उभे राहणार नवे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मंत्रिमंडळाचा निर्णय

हेही वाचा - महाविकास आघाडीकडून धानउत्पादक शेतकऱ्यांना 700 रुपये बोनस - वडेट्टीवार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.