ETV Bharat / bharat

Risk Of Heart Disease : सावधान! नैराश्यग्रस्त तरुणांमध्ये हृदयविकाराचा धोका अधिक - संशोधन

संशोधकांना असे आढळून आले आहे की, नैराश्यानेग्रस्त तरुणांचे हृदयाचे आरोग्य खराब असण्याची आणि त्यांना हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग होण्याची शक्यता जास्त असते. तसेच या अनेकांना या गोष्टींचा अनुभव कोविड काळात अधिक प्रमाणात आला असल्याचे, संशोधकांचे म्हणणे आहे.

Risk Of Heart Disease
तरुण प्रौढांमध्ये हृदयविकाराचा धोका अधिक
author img

By

Published : Jan 31, 2023, 6:37 PM IST

वॉशिंग्टन : निराशा किंवा नैराश्याने ग्रस्त असलेल्या तरुणांना हृदयरोग (CVD) होण्याची शक्यता असते आणि त्यांच्या हृदयाचे आरोग्य खराब असते, असे एका नवीन अभ्यासानुसार दिसून आले आहे. अभ्यासात असेही आढळून आले आहे की, ज्या तरुण प्रौढांनी स्वत: उदासीनता किंवा वाईट मानसिक आरोग्यात दिवस घालवले त्यांच्या ह्रदयाची स्थिती आणि मानसिक आरोग्य हे, समस्या नसलेल्या तरुण प्रौढांच्या ह्रदयाची स्थितीपेक्षा वाईट असते. तुलनेत हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक आणि हृदयविकाराच्या जोखीम घटकांचे प्रमाण निराशा किंवा नैराश्याने ग्रस्त असलेल्या तरुणांमध्ये जास्त असते.

18 ते 49 वयोगटातील निष्कर्ष : जॉन्स हॉपकिन्स मेडिसिनच्या संशोधकांनी या अभ्यासाचे नेतृत्व केले, ज्यांनी 18 ते 49 वयोगटातील दीड दशलक्षाहून अधिक लोकांच्या डेटाचे विश्लेषण केले. या निष्कर्षांमध्ये तरुण आणि मध्यमवयीन प्रौढांमधील नैराश्याशी CVD ला जोडणारे पुरावे वाढतात आणि या दोघांमध्ये देखील ह्रदयाशी संबंधित समस्या लवकर प्रौढावस्थेत सुरू होऊ शकतात असे सुचवले आहे, असे अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात म्हटले आहे.

खराब जीवनशैली अंगवळणी पडू शकते : 'जेव्हा तुम्ही तणावग्रस्त, चिंताग्रस्त किंवा उदास असाल, तेव्हा तुम्हाला दडपल्यासारखे वाटू शकते आणि तुमचे हृदयाचे ठोके आणि रक्तदाब वाढू शकतो. हे देखील सामान्य आहे की, निराश झाल्यामुळे धूम्रपान, दारू पिणे, कमी झोपणे आणि न झोपणे यासारख्या खराब जीवनशैली अंगवळणी पडू शकतात. त्यामुळे तुम्ही शारीरिकदृष्ट्या सक्रिय असता, मात्र नकारात्मकता तुमच्या हृदयावर परिणाम करते, असे जॉन्स हॉपकिन्स मेडिसिनच्या सहयोगी प्राध्यापक आणि अभ्यासाच्या वरिष्ठ लेखिका गरिमा शर्मा म्हणाल्या.

2017 आणि 2020 दरम्यान संशोधन : शर्मा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी 2017 आणि 2020 दरम्यान आयोजित केलेल्या वर्तणुकीशी संबंधित जोखीम घटकांवर पाळत ठेवणे , या प्रोजेक्टमध्ये सहभागी झालेल्या 593,616 (5.9 लाखांहून अधिक) प्रौढांचा डेटा पाहिला, असे अभ्यासात म्हटले आहे. या सर्वेक्षणात, त्यांना कधी औदासिन्य विकार असल्याचे सांगण्यात आले आहे का?, त्यांना मागील महिन्यात किती दिवस (0 दिवस, 113 दिवस किंवा 1430 दिवस) मानसिक आरोग्य बिघडले आहे, त्यांना हृदयविकाराचा झटका, पक्षाघात किंवा स्ट्रोकचा अनुभव आला होता का? छातीत दुखणे, आणि तसेच त्यांना हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगाचा धोका असतो का?, या प्रश्नांचा समावेश आहे, असे अभ्यासात म्हटले आहे. तसेच या अनेकांना या गोष्टींचा अनुभव कोविड काळात अधिक प्रमाणात आला असल्याचे, संशोधकांचे म्हणणे आहे.

हेही वाचा : World Leprosy Day 2023 : कुष्ठरोग हा कलंक नसून एक आजार आहे, जाणून घ्या आंतरराष्ट्रीय कुष्ठरोग दिनानिमित्त महत्त्वाच्या गोष्टी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.