ETV Bharat / bharat

Kota Student Suicide : कोटामध्ये नंदूरबारच्या विद्यार्थ्याची आत्महत्या, जेईई परीक्षेची करत होता तयारी - विद्यार्थ्याची आत्महत्या

कोटा येथे जेईई इंजिनीअरिंग प्रवेश परीक्षेची तयारी करणाऱ्या महाराष्ट्रातील एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली. घटना घडली त्या दिवशी त्याचे आई-वडील त्याला भेटण्यासाठी आले होते.

Suicide
आत्महत्या
author img

By

Published : Jun 12, 2023, 5:39 PM IST

कोटा (राजस्थान) : राजस्थानमधील कोटा येथे अभियांत्रिकीच्या प्रवेश परीक्षेची तयारी करणाऱ्या महाराष्ट्रातील एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. हा विद्यार्थी गेल्या दोन महिन्यांपासून कोटा येथे एका खाजगी कोचिंग सेंटरमध्ये कोचिंग घेत होता. सोमवारी सकाळी विद्यार्थ्याचे कुटुंबीय त्याला भेटण्यासाठी कोटा येथे आले होते. शवविच्छेदनानंतर पोलिसांनी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला आहे. सध्या आत्महत्येचे कारण समोर आलेले नाही.

2 महिन्यांपासून कोटा येथे होता : पोलिस उप अधीक्षक अमरसिंह राठोड यांनी सांगितले की, केशव राजपूत यांचा मुलगा भार्गव (18) हा नंदुरबार जिल्ह्यातील चरमखा येथील कामनाथ नगरचा रहिवासी होता. तो गेल्या 2 महिन्यांपासून कोटा येथील जवाहर नगर पोलीस स्टेशन हद्दीतील राजीव गांधी नगर येथील फलोदी रेसिडेन्सीमध्ये राहत होता. तो शहरातील एका खासगी कोचिंग संस्थेत जेईई परीक्षेची तयारी करत होता. भार्गवचे आई - वडील त्याला भेटण्यासाठी सोमवारी सकाळी 8 वाजता कोटा येथे आले होते. नाश्ता करून ते दोघे बाहेर गेले होते. परत आले असता मुलाने खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

अद्याप सुसाइड नोट मिळालेली नाही : माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेहाला रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आले होते. पोलिसांनी आत्महत्येच्या कारणाचा तपास सुरू केला आहे. सध्या घटनास्थळावरून कोणतीही सुसाइड नोट मिळालेली नाही. डीएसपी अमरसिंह राठोड यांनी सांगितले की, विद्यार्थ्याने कुटुंबीय आल्यानंतरच आत्महत्या केली, त्यामुळे ही कौटुंबिक बाब असू शकते. कोचिंगमधून विद्यार्थ्यांचे रेकॉर्डही घेतले जात आहे. या सोबतच हॉस्टेलमधूनही माहिती घेण्यात येत आहे.

हे ही वाचा :

  1. Minor Girl Suicide : खासगीतील फोटो व्हायरल करण्याची धमकी; अल्पवयीन मुलीची प्रियकराला कंटाळून आत्महत्या
  2. Mumbai Crime News: वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून पोलीस निरीक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न, रुग्णालयात उपचार सुरू
  3. Nagpur Suicide Case : धक्कादायक! क्रिकेट सट्ट्यामुळे कर्जबाजारी तरुणाची आत्महत्या, मुलाच्या मृत्यूच्या धक्क्याने आईचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.