ETV Bharat / bharat

Amethi Crime News : तांत्रिकाच्या नादाला लागून दिला चिमुरड्याचा बळी, 'हे' आहे कारण - सावत्र आईने मुलाला मारले

उत्तर प्रदेशच्या अमेठीमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका सावत्र आईने तांत्रिकाच्या नादाला लागून 4 वर्षांच्या चिमुरड्याचा बळी दिला. पोलिसांनी या प्रकरणी महिला व तांत्रिकासह 4 जणांना अटक केली आहे.

Amethi Crime News
अमेठीमध्ये बालकाचा बळी
author img

By

Published : Jun 14, 2023, 6:22 PM IST

अमेठी (उत्तर प्रदेश) : अमेठी जिल्ह्यात अंधश्रद्धेतून एका बालकाचा बळी देण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जामो पोलीस स्टेशन हद्दीत रविवारी एका मुलाचा मृतदेह आढळून आला होता. तो मृतदेह मुलाच्या सावत्र आईनेच तंत्र-मंत्रांच्या नादाला लागून फेकून दिला होता. या घटनेत सहभागी चार जणांना पोलिसांनी अटक करून तुरुंगात पाठवले आहे.

  • #amethipolice थाना जामो पुलिस द्वारा हत्या का खुलासा, घटना में प्रयुक्त 01 अदद गमछा(आलाकत्ल), तंत्र-मंत्र में प्रयुक्त सामान व मोटर साइकिल के साथ 04 अभियुक्त/अभियुक्ता गिरफ्तार । pic.twitter.com/NEbybS2v9S

    — AMETHI POLICE (@amethipolice) June 14, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

मुलाला गावाबाहेर नेऊन मारले : 12 तारखेला जामो पोलीस स्टेशन हद्दीतील रेशी गावात तलावाच्या काठावर एका 4 वर्षाच्या मुलाचा मृतदेह सापडला होता. पोलिसांनी या प्रकरणी तात्काळ गुन्हा नोंदवून घटनेचा तपास करण्यासाठी पथके तयार केली. अतिरिक्त पोलिस अधीक्षकांनी सांगितले की, आई-वडिलांसह सावत्र आई आणि तांत्रिक दयाराम यादव यांनी मुलाचा बळी दिला होता. सावत्र आई रेणूला मूल होत नव्हते. यावर तांत्रिक दयाराम यादव यांनी सांगितले की, जर एखाद्या मुलाचा बळी दिला तर तुम्हाला मूल होईल. ही इच्छा पूर्ण करण्यासाठी चौघांनी मिळून 11 जूनच्या रात्री मुलाला गावाबाहेर नेले. येथे प्रथम त्याला अगरबत्ती आणि कापूरने जाळण्यात आले आणि नंतर गळा दाबून त्याचा खून करण्यात आला.

घटनेत वापरलेले साहित्य झुडपांतून जप्त : या घटनेत सहभागी मंगरू प्रजापती, प्रेमा देवी तांत्रिक दयाराम यादव, सावत्र आई रेणू आणि पत्नी जितेंद्र प्रजापती यांना अटक करून तुरुंगात पाठवण्यात आले आहे. घटनास्थळाजवळील झुडपांतून तंत्र-मंत्राचे भांडे, लिंबू, जायफळ आदी साहित्य जप्त करण्यात आले आहे. तांत्रिकाच्या जुन्या नोंदींची छाननी सुरू असल्याचे अतिरिक्त पोलिस अधीक्षकांनी सांगितले.

नाल्याजवळ मृतदेह आढळून आला : जामो पोलीस स्टेशन हद्दीतील रेशी गावातील रहिवासी जितेंद्र प्रजापती यांचा चार वर्षांचा मुलगा सत्येंद्र उर्फ ​​दीपू याचा अर्धा जळालेला मृतदेह सोमवारी सापडला होता. मुलाच्या अंगावर ठिकठिकाणी भाजण्याच्या खुणा होत्या. मुलाचा बळी देताना अंधश्रद्धेपोटी कोणीतरी जाळून मारल्याची भीती वडील जितेंद्र यांनी व्यक्त केली होती.

हेही वाचा :

  1. UP Crime News : धक्कादायक! पतीने पत्नीला मिठी मारून पाठीत गोळी झाडली, दोघांचाही मृत्यू
  2. Daughter Kills Mother : मुलीने आईचा गळा दाबून केला खून; मृतदेह सूटकेसमध्ये भरुन गाठले पोलीस ठाणे, पोलीस चक्रावले
  3. Mumbai Crime News : मजुराने डोक्यात हातोडा मारून केला दुसऱ्या मजुराचा खून

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.