ETV Bharat / bharat

काय सांगता! सोने, चांदी नाही, तर 8 क्विंटल शेणाची चोरी

कोरबा जिल्ह्यातील गावातून 8 क्विंटल शेणाची चोरी झाल्याची विचित्र घटना समोर आली आहे. रविवारी पोलिसांनी याबाबत माहिती दिली असून एफआयआरही नोंदवण्यात आला आहे. यापूर्वी अंबिकापूर व दुर्ग जिल्ह्यातही शेण चोरीचे प्रकरण समोर आले होते. परंतु त्यावर एफआयआर नोंदविण्यात आला नव्हता.

शेणाची चोरी
शेणाची चोरी
author img

By

Published : Jun 21, 2021, 10:17 AM IST

रायपूर - आजपर्यंत आपण सोने, चांदी आणि पैशासहित इतर वस्तू चोरीस गेल्याचे ऐकले असेल. मात्र, छत्तीसगडमधील कोरबा जिल्ह्यातील दीपका पोलीस स्टेशन परिसरात चोरीची एक रंजक घटना उघडकीस आली आहे. कोरबा जिल्ह्यातील गावातून 8 क्विंटल शेणाची चोरी झाल्याची विचित्र घटना समोर आली आहे. रविवारी पोलिसांनी याबाबत माहिती दिली असून एफआयआरही नोंदविण्यात आला आहे. यापूर्वी अंबिकापूर व दुर्ग जिल्ह्यातही शेण चोरीचे प्रकरण समोर आले होते. परंतु त्यावर एफआयआर नोंदविण्यात आला नव्हता.

छत्तीसगडमधील कोरबा जिल्ह्यात 8 क्विंटल शेणाची चोरी

शेण खताची किंमत 1600 रुपये -

गोधन योजनेअंतर्गत छत्तीसगड सरकारने शेणखताचा दर निश्चित केल्यानंतर शेण चोरीच्या घडत आहेत. दीपका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धुरेना ग्रामपंचायतीमध्ये गांडुळ खत तयार करण्यासाठी ठेवलेल्या शेणखताची अज्ञात व्यक्तीने चोरी केली. याप्रकरणी खमनसिंग कंवर यांनी तक्रार दाखल केली आहे. आपल्या गोठ्यातून 8 क्विंटल शेणाची चोरी झाल्याचे त्यांनी सांगितले. सध्या शेणखताची किंमत 1600 रुपये आहे.

2 रुपये किलोने शेणाची खरेदी -

शेतकर्‍यांकडून 2 रुपये प्रतिकिलो दराने गोबरची खरेदी केली जाते. त्यानंतर या शेणापासून गांडूळ खत तयार करुन 8 रुपये किलो दराने शेतकऱयांना विकले जाते. यामुळे शेण विक्रीतून शेतकऱ्यांना पैसे मिळत आहेत. तर दुसरीकडे शेतकर्‍यांना त्यांच्या शेतात स्वस्त खते मिळतात. या योजनेचा शेतकऱ्यांना बऱ्याच प्रमाणात फायदा होत आहे.

मोदी सरकारची गोबरधन योजना -

केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाअंतर्गत गोबरधन नावाचं पोर्टल तयार केले आहे. 2018 च्या अर्थसंकल्पात केंद्र सरकारनं गोबरधन योजनेची घोषणा केली होती. छत्तीसगडमध्ये 2 रुपये किलोनं शेणाची खरेदी केली आहे. ही योजना इतर राज्यातही लागू करण्यात येणार आहे. या योजनेमुळे सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन देण्यास मदत होत आहे. गोबरधन योजनेद्वारे ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी वाढवणे, शेणापासून कंपोस्ट खत आणि बायो गॅस तयार करणे, हा या योजनेचा उद्देश आहे. याद्वारे शेतकऱ्यांना कमाईबरोबर इतर संधी निर्माण होतील.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.