ETV Bharat / bharat

Paddy Procurement India : जाणून घ्या, महाराष्ट्रासह विविध राज्यांमधील धान खरेदी - धान खरेदी महाराष्ट्र आकडेवारी

विपणन सत्र 2020-21 कालावधीत केंद्र सरकारने एमएसपी (Minimum Support Price) किंमत देऊन 1,69,133.26 रुपयांचे 895.83 लाख टन धान खरेदी केले आहे. भारतीय अन्नधान्य महामंडळ ( FCI Food purchase ) ही राज्यांच्या एजन्सीच्या मदतीने धान्य खरेदी करते. केंद्र सरकार शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात गहू खरेदी खरेदी करते. हे धान्य राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत गरीब लाभार्थ्यांना स्वस्त धान्य दुकानांमधून देण्यात येते.

धान खरेदी
धान खरेदी
author img

By

Published : Feb 11, 2022, 8:45 PM IST

हैदराबाद - केंद्रीय अन्नधान्य मंत्रालयाच्या ( Union Food Ministry Data ) आकडेवारीनुसार केंद्र सरकारने 2021-22 विपणन वर्षात जानेवारीपर्यंत सर्वाधिक पंजाबमधून 186य85 लाख टन धानाची खरेदी करण्यात आली आहे. तर 67.65 लाख टन धान हे छत्तीसगड, 65.54 लाख टन तेलंगाना, 55.30 लाख टन हरियाणा आणि 46.50 लाख टन धान उत्तर प्रदेशमधून खरेदी करण्यात आले आहे. धान्य खरेदीमध्ये नेहमी भ्रष्टाचार व घोटाळ्यांचे आरोप नेहमी केले जातात. शेतकऱ्यांना धान खरेदीचा उशिरा मोबदला दिला जातो. जाणून घेऊ, कोणत्या राज्यांमधून किती धान खरेदी करण्यात आली आहे.

विपणन सत्र 2020-21 कालावधीत केंद्र सरकारने एमएसपी (Minimum Support Price) किंमत देऊन 1,69,133.26 रुपयांचे 895.83 लाख टन धान खरेदी केले आहे. भारतीय अन्नधान्य महामंडळ ( FCI Food purchase ) ही राज्यांच्या एजन्सीच्या मदतीने धान्य खरेदी करते. केंद्र सरकार शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात गहू खरेदी खरेदी करते. हे धान्य राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत गरीब लाभार्थ्यांना स्वस्त धान्य दुकानांमधून देण्यात येते.

हेही वाचा-MH MPs in Parliament : जाणुन घ्या राज्यातील खासदार संसदेत काय बोलले?

उत्तर प्रदेशमध्ये धान खरेदी ( paddy procurement from UP )

देशातील सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशमधून 70 लाख मेट्रिक धान खरेदी करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. त्यापैकी 90.1 टक्के धान खरेदी करण्यात आले आहे.

बिहार राज्यामधून धान खरेदी ( paddy procurement from Bihar )

बिहार राज्यामधून आजतागायत 32.61 लाख मेट्रिक धान खरेदी करण्यात आली आहे. राज्याच्या आकडेवारीनुसार अद्याप 12.39 लाख मेट्रिक धान्य खरेदी करणे अद्याप बाकी आहे.

महाराष्ट्रमधून धान खरेदी ( paddy procurement from Maharashtra )

महाराष्ट्र राज्य सरकारने खरीप हंगामात 1.22 कोटी धान्य खरेदी करण्यात आले आहे. खाद्य आणि नागरी पुरवठा विभागाचे सचिव सुधीर तुंगर म्हणाले, की शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 1940 रुपये दर देण्यात आला आहे. 16 जिल्ह्यांमधील 2853 केंद्रांमधून धान खरेदी करण्यात आली आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांना धान खरेदीपोटी 2,600 कोटी रुपये दिले आहेत. 350 कोटी रुपये सरकारला अद्याप द्यायचे आहे. गतवर्षी शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 700 रुपये बोनस रक्कम देण्यात आली होती. यंदा धान उत्पादन अधिक होणार आहे. राज्य सरकारची आर्थिक स्थिती चांगली नाही. त्यामुळे बोनस राशी देण्यात आली नाही.

हेही वाचा-Goa Assembly Election 2022 : काँग्रेसला गोवा विधानसभा निवडणुकीत भक्कम बहुमत मिळेल- राहुल गांधी

दिल्लीमध्ये धान खरेदी ( paddy procurement from Delhi )

देशाची राजधानी दिल्लीमधील 142 गावांमध्ये पिके घेतली जातात. या गावांमधून गहु, ज्वारी, बाजरी आदी धानासहित भाजीपाल्यांचे उत्पादन घेतले जाते. मात्र, इतर राज्यांप्रमाणे दिल्ली सरकार थेट शेतकऱ्यांकडून धान खरेदी करत नाही.

हेही वाचा-Rahul Gandhi Speech in Goa : काँग्रेसशिवाय कोणीही सरकार स्थापन करू शकणार नाही - राहुल गांधी

हिमाचल प्रदेशमधून धान खरेदी ( paddy procurement from Himachal Pradesh )

मागील हंगामात प्रथमच हिमाचल प्रदेशमधून धान खरेदी करण्यात आली होती. 15 ऑक्टोबर 2021 मध्ये ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातूून धान खरेदीला सुरुवात झाली होती. सिरमौर, ऊना, कांगडा आणि सोलन जिल्ह्यातील 9 केंद्रातून धान खरेदी करण्यात येते. या माध्यमातून 2 लाख क्विंटलहून अधिक धान खरेदी करण्यात आली आहे. त्यामधून 4 हजारांहून अधिक शेतकऱ्यांना 38 कोटी रुपये मोबदला देण्यात आला आहे.

कर्नाटकमध्ये धान खरीद ( paddy procurement from Karnatak )

कर्नाटक राज्यामधून किमान आधारभूत किमतीने धान खरेदी केली जात आहे. 5 लाख मेट्रिक टन धान्य खरेदीचे कर्नाटक उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. आजतागायत 2.18 लाख शेतकऱ्यांनी धान विक्रीसाठी नोंदणी केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.